नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या Hyderabad to Latur ह्या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.
Table of Contents
Hyderabad to Latur Distance

तर हैदराबाद ते लातूर हे जवळपास 250 किलोमीटरचा अंतर आहे.बरोबर दुपारी 13:00 वाजता हैदराबाद वरून फलट क्रमांक 48 इथून ही गाडी लातूर गाठण्यासाठी तयार झाली.
Hyderabad to Latur MSRTC Bus Ticket Price
हैदराबाद ते लातूर चा टिकीट दर 425 रुपये आहे. माझी ही गाडी लातूर आगाराची होती. ह्या गाडीचा मार्ग हैदराबाद पासून झहीराबाद,बिदर, भालकी,औराद,निलंगा,औसा आणि शेवटी लातूर अशाप्रकारे होता .हैदराबाद ते लातूर हा कमीत कमी आठ तासांचा प्रवास ठरला.
Hyderabad to Latur MSRTC Bus Timetable
खाली तुम्हाला Hyderabad to Latur Bus Timetable पाहायला मिळेल.हैदराबाद ते लातूर जाण्यासाठी सगळ्या गाड्या खाली दिलेल्या वेळानुसार निघतात.
| From | To | Timings | Routes |
| Hyderabad | Latur | 13:00 | Zahirabad, Bidar, Bhalki, Aurad, Nilanga, Ausa |
Latur च्या दिशेने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर धावत असताना माझी गाडी आता पट्टण चेरू या ठिकाणावरून होत नंतर सांगारेड्डी इथून पुढे सदाशिव पेठ बायपास नंतर बुधेरा इथून पुढे कामकोल टोल प्लाजा पार करत बराच काळ प्रवास केल्यानंतर आता जाहीराबाद या ठिकाणावरून होत पुढे दुपारी 3:30 वाजता हैदराबाद पासून 125 किलोमीटर प्रवास केल्यानंतर जेवण्यासाठी श्री शाही परिवार ढाबा या हॉटेलवर थांबली.
हा प्रवास करत असताना मला तीन राज्य मधून प्रवास करण्याची संधी मिळाली. जिथून मी प्रवासाला सुरुवात केली तो राज्य तेलंगणा नंतर कर्नाटक आणि अशाच प्रकारे शेवटी महाराष्ट्र हे तीन राज्य होते.
जहीराबाद बिदर या हायवेवर धावत असताना कोथूर या ठिकाणावरून होत गंगवार इथून पुढे असणारा तेलंगणा कर्नाटक सीमारेषावर चेक पोस्ट पार करत अशाप्रकारे जहीराबाद पासून 30 किलोमीटरचा अंतर गाठत आणि कर्नाटक राज्यात प्रवेश केल्यानंतर बिदर बस स्टैंड वर संध्याकाळी पाच वाजता पोहोचलो.
बिदर या ठिकाणी तेलंगणा आणि कर्नाटकची बॉर्डर चिटकून आहे.बिदर वरून धावत असताना खानापुरा या गावावरून पुढे हालबर्गा नंतर भालकी बस स्टैंड वर संध्याकाळी 5:45 वाजता पोहोचल्यानंतर आपल्या पुढचा प्रवासासाठी जगात असताना भातंब्रा इथून पुढे औराद बस स्टँडवर संध्याकाळी 6:30 वाजता पोहोचली.
औराद ही कर्नाटक राज्य ची शेवटची हद्द आहे.इथून पुढे महाराष्ट्र राज्याची हद्द सुरू होते. इथून पुढे आता माझी बस निलंगा मार्गे लातूर ठिकाण पोहोचण्यासाठी धावायला सुरू करते.
बराच काळ प्रवास केल्यानंतर आता माझी बस निलंगा बस स्टैंड वर संध्याकाळी 7:00 वाजता पाहोचली.येथून पुढे 50 किलोमीटरच्या अंतरावर लातूर हा ठिकाण स्थित आहे. ज्याला कमीत कमी दीड तासांचा कालावधी लागला.परत एकदा औसा मार्गे माझी बस निलंगा लातूर ह्या रस्त्यावर धावत शेवटी संध्याकाळी साडेसात वाजता लातूर बस स्टैंड वर पोहोचलो.
अशाप्रकारे माझा हैदराबाद ते लातूर चा प्रवास पूर्ण झाला. तुम्हाला हा प्रवास कसा वाटला याच्याबद्दल मला माहिती द्या आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद.
FAQs
What Are The Boarding Points From Hyderabad to Latur?
हैदराबाद पासून बिदर, औराद आणि निलंगा आणि शेवटी लातूर