How I Travelled From Nanded To Shegaon By MSRTC

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे माझा Nanded To Shegaon ह्या मार्गावरील केलेला प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.

तर मित्रांनो नांदेड बस स्टँडवर नेहमीप्रमाणे मी अर्धा तास अगोदरच येऊन माझी बसची वाट पाहत थांबलो होतो.

Nanded To Shegaon Ticket Price

Nanded To Shegaon चा टिकीट दर जवळपास 450 रुपये होता.तर मित्रांनो बरोबर 6:00 वाजता फ्लॅट क्रमांक दहा वरून माझी बस आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी प्रवास करायला सुरू करते.

ह्या गाडीचा मार्ग नांदेड बस स्टँड पासून वसमत, हिंगोली, मेहकर, खामगाव, तसेच शेवटी शेगाव अशाप्रकारे आहे.

Nanded To Shegaon Distance

Nanded To Shegaon Distance

Nanded To Shegaon हा जवळपास 250 किलोमीटरचा अंतर आहे. तर मित्रांनो नांदेड बस स्टँड वरून बाहेर पडत आता माझी गाडी तरोडा खुर्द ठिकाणावरून होत तसेच पुढे कासारखेडा नंतर मालेगाव बस स्टँडवर थोडा काळ थांबल्यानंतर पुढे अर्धापूर इथून पुढे चंदगव्हाण ह्या ठिकाणी आसना नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे वसमत बस स्टँड वर सकाळी 7:15 सात वाजता पोहोचली.

वसमत बस स्टँड वरून पुढे माझी बस वसमत जिंतूर हायवेवर धावत भेंडेगाव ह्या ठिकाणावरून होत पुढे आंबानाथ तसेच पुढे शिरडशहापूर ह्या ठिकाणी पोहोचत तसेच नागेश वाडी नंतर औंढा नागनाथ बस स्टैंड वर फलाट क्रमांक दोनवर सकाळी 7:50 वाजता पोहोचली.

औंढा नागनाथ बस स्टँड हा तालुका औंढा आणि जिल्हा परभणी अंतर्गत मोडतो.औंढा नागनाथ बस स्टँड वरून पुढे आता माझी बस येहाळेगाव नंतर हिवरा जटू ह्या ठिकाणावरून होत पुढे नरसी फाटा नंतर हिंगोली जवळ नदीच्या पुलावरून होत माझी बास आता हिंगोली बस स्टँडवर फलट क्रमांक 13 वर सकाळी 8:30 वाजता पोहोचली.

हिंगोली बस स्टँडवरून पुढे सेनगाव नरसी ह्या हायवेवरून पुढे सवड नंतर नरसी नामदेव तसेच पुढे पुसेगाव ह्या ठिकाणावरून होत सेनगाव बस स्टँडवर सकाळी 9:00 वाजता पोहोचली.

पुढे कोळसा ह्या ठिकाणावरून होत माझी बस वटकळी फाटा जवळ जेवणासाठी 9:30 वाजता जैन हॉटेल टी सेंटर इथे थांबा घेते.

ह्या ठिकाणावरून रिसोड जवळजवळ 17 km चा अंतर होता. इथून पुढे पंकनेरगाव ह्या ठिकाणावरून होत वाढोना नंतर रिसोड बस स्टँडवर सकाळी 10:10 वाजता पोहोचली. ह्या ठिकाणावरून मेहकर 35 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

रिसोड हा वाशिम जिल्हा अंतर्गत मोडतो. इथून पुढे माझी बस मेहेकर च्या दिशेने मोठेगाव नंतर वाकद तसेच पुढे सोनाटी ह्या गावा करत माझी बस मेहकर बस स्टैंड वर सकाळी 11:30 वाजता पोहोचली.

मेहकर बस स्टँड हा बुलढाणा विभागांतर्गत मोडतो. मेहकर बस स्टँड वरून शेगाव हा जवळपास 84 किलोमीटरचा पल्ला शिल्लक राहिला होता.

इथून पुढे माझी बस खांदा खामगावच्या दिशेने नागपूर मुंबई समृद्धी मार्ग हायवेवर धावत जानेफळ नंतर वरवंड तसेच पुढे पारखेड नंतर देऊळगाव साखर्षा तसेच पुढे शिराळा नेमाने नंतर आंबे टाकळी नंतर विहिगाव तसेच पुढे खामगाव बस स्टैंड वर दुपारी 1:00 वाजता पोहोचत पुढे लसुरा ह्या गावावरून होत तसेच 20 किलोमीटरचा अंतर पार करत माझी एसटी आता शेगाव बस स्टैंड वर दुपारी 1:30 वाजता पोहोचली.

Nanded To Shegaon Final Destination

अशाप्रकारे माझा Nanded To Shegaon चा हा प्रवास पूर्ण झाला.

Leave a Comment