How To Travel From Vijaydurg To Pandharpur By MSRTC

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे माझ्या ह्या ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला ह्या ब्लॉगद्वारे माझ्या Vijaydurg to Pandharpur गगनबावडा मार्गे ह्या मार्गावरील केलेला प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.

तर मित्रांनो विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत मोडतो. विजयदुर्ग इथून माझी गाडी बरोबर सकाळी 8:30 वाजता आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी सुरू झाली.

Vijaydurg To Pandharpur Distance

Vijaydurg To Pandharpur Distance

ह्या गाडीचा मार्ग विजयदुर्ग पासून मोड बापर्डे तळे गगनबावडा, कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला आणि शेवटी पंढरपूर अशा प्रकारे होता.Vijaydurg To Pandharpur चा अंतर जवळपास 350 किलोमीटरचा आहे.

विजयदुर्ग तळेरे ह्या मार्गावर धावत माझी बस आता पडेल कॅन्टीन ह्या ठिकाणावरून होत गावा गावातून मार्ग काढत वाडा नंतर चिंचवाडी अशा प्रकारे तळेरे बस स्टैंड वर सकाळी 10:30 वाजता पोहोचली.

विजयदुर्ग बस स्थान पासून जवळपास 55 किलोमीटरचा प्रवास करत तसेच दोन तासांचा हा प्रवास पूर्ण करत आता माझी बस तळेरे बस स्टैंड वर येऊन पोहोचली होती.

इथून पुढे माझी गाडी आता वैभववाडी आणि गगनबावडा मार्गे पुढे जाऊ लागली. तळेरे बस स्टँड पासून गगनबावडा हा जवळपास 33 किलोमीटरचा अंतर आहे.

माझी बस आता कोल्हापूर हायवे वर धावत वैभववाडी बस स्टँडवर सकाळी 11:30 वाजता पोहोचली. वैभववाडी हा सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत मोडतो.

गगनबावडा घाट पार करत माझी बस आता गगनबावडा बस स्टैंड वर दुपारी 12:15 वाजता जेवणासाठी थांबा करते. गगनबावडा बस स्टँड हा कोल्हापूर जिल्हा अंतर्गत मोडतो. तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आता मी कोल्हापूर जिल्हा मध्ये शिरलो होतो.

तब्बल 20 मिनिटं थांबा केल्यानंतर आता माझी गाडी परत एकदा पुढचा टप्पा गाठण्यासाठी धावत कोल्हापूर बस स्टँड वर दुपारी 2:20 वाजता फलट क्रमांक सहावर पोहोचली. गगनबावडा ते कोल्हापूर हा जवळपास अडीच तासांचा प्रवास झाला होता

कोल्हापूर पासून पंढरपूर हा जवळपास 185 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिला होता. हा अंतर गाठण्यासाठी जवळपास साडेतीन तासांचा कालावधी लागला.

Vijaydurg To Pandharpur Ticket Price

Vijaydurg to Pandharpur चा फुल टिकीट जवळपास 585 रुपये अशाप्रकारे होता जे कालांतराने कमी जास्त होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर बस स्टँड वरून पुढे एक तासांचा प्रवास करत माझी बस आता जयसिंगपूर बस स्टैंड वर दुपारी 3:50 वाजता पोहोचली. ह्या जयसिंगपूर बस स्टँडवर एकूण नऊ फलाट दिलेले आहेत.

जयसिंगपूर बसून वरून पुढे सांगली बस स्टैंड वर दुपारी 4:10 वाजता पोहोचत पुढे कोल्हापूर पंढरपूर हायवेवर धावत जुनोनी ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे सांगोला बस स्टँडवर संध्याकाळी 7:00 वाजता पोहोचत पुढे पंढरपूर बस स्टैंड वर रात्री 8:00 वाजता पोहोचली.

अशाप्रकारे माझा Vijaydurg to Pandharpur हा 12 तासांचा प्रवास पूर्ण झाला.

Leave a Comment