How I Traveled From Khed To Nanded

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे Khed To Nanded ह्या मार्गावरील केलेल्या प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.

Khed to Nanded Distance

Khed To Nanded Distance

Khed To Nanded चा अंतर 600 किलोमीटर होता.तर मित्रांनो खेळ बस स्टॅन्ड हा रत्नागिरी जिल्हा अंतर्गत मोडतो. जर तुम्हाला Khed To Nanded चा हा पूर्ण प्रवास करण्याची इच्छा झाली तर तुम्ही रिझर्वेशन करून प्रवास करा.

Khed To Nanded MSRTC Bus Timetable

Khed Bus Stand वरून Nanded जाण्यासाठी ह्या वेळानुसार निघतात.

FromToTimingsRoutes
KhedNanded18:00Chiplun, Karad, Vita, Atpadi, Pandharpur, Solapur, Tuljapur, Ujani, Latur, Ahilyanagar (Ahmednagar), Loha

तर बरोबर 6:00 वाजता संध्याकाळी माझी बस Khed बस स्टँडवरून बाहेर पडली. ह्या गाडीचा मार्ग खेड पासून चिपळूण, कराड, विटा, आटपाडी, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, उजनी, लातूर, अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, लोहा आणि शेवटी नांदेड अशाप्रकारे आहेत.

त्या गाडीचा नंबर MH 08 AP 6130 होता. हा माझा संपूर्णपणे रात राणी प्रवास होता.

तर मित्रांनो मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करत दाभिळ ह्या ठिकाणावरून होत पुढे परशुराम घाट पार करत माझी बस चिपळूण बस स्टैंड वर संध्याकाळी 7:10 वाजता पोहोचली.

Khed पासून चिपळूण हा 33 किलोमीटरचा अंतर पूर्ण झाला होता.इथून पुढे कराड चिपळूण हायवेवरून प्रवास करत अलोरे नंतर शिरगाव नंतर पुढे कुंभार्ली घाट पार करत माझी बस आता कोयनानगर बस स्टैंड वर रात्री 9:15 वाजता पोहोचली.

कोयना नगर हा सातारा जिल्हा अंतर्गत मोडतो. कोयना नगर ते कराड हा 57 किलोमीटरचा अंतर आहे. इथून पुढे माझी बस कराड च्या दिशेने धावू लागली.

Khed To Nanded Ticket Price

Khed To Nanded तिकीट भाडं 1000 रुपये होता. कराड चिपळूण हायवेवरून प्रवास करत असताना पाटण ह्या ठिकाणावरून रात्री 10:30 वाजता पोहोचत पुढे कराड बस स्टैंड वर रात्री 11:15 वाजता पोहोचली.

इथून पुढे माझी बस विटा आटपाडी पंढरपूर मार्गे धावू लागली. कराड ते पंढरपूर जवळ जवळ 150 किलोमीटरचा अंतर आहे.

कराड बस स्टँड पासून बाहेर पडत आता माझी बस सुरली घाट पार करत बराच काळ प्रवास केल्यानंतर पंढरपूर बस स्टैंड वर रात्री 2:15 वाजता पोहोचली.

Khed पासून पंढरपूर हा जवळ जवळ 300 किलोमीटरचा टप्पा पार झाला होता. आतापर्यंत रत्नागिरी जिल्हा सातारा जिल्हा आणि सोलापूर जिल्हा ह्या सगळ्या जिल्ह्यामधून माझा प्रवास पूर्ण झाला होता. इथून पुढे धाराशिव लातूर आणि नांदेड हे तीन जिल्हे मधून माझा प्रवास शिल्लक राहिला होता. अशा प्रकारे ह्या गाडीचा प्रवास सहा जिल्ह्यामधून होतो.

इथून पुढे 320 km चा अंतर शिल्लक राहिला होता.माझी बस आता मोहोळ मार्गे सोलापूर गाठण्यासाठी परत एकदा धावू लागली.

चंद्रभागा नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस पंढरपूर सोलापूर हायवे वरून धावत तुंगत ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे लांबोटी नंतर सोलापूर बस स्टैंड वर रात्री 3:45 वाजता पोहोचली.

इथून पुढे सोलापूर तुळजापूर हायवे वरून प्रवास करत तमलवाडी ह्या ठिकाणावरून होत पुढे टोलनाका पार करत तसेच तुळजापूर घाट ओलांडून माझी बस आता सकाळी 4:30 वाजता तुळजापूर बस स्टैंड वर पोहोचली होती.

इथून पुढे तुळजापूर नागपूर हायवे वरून प्रवास करत पुढे उजनी नंतर औसा नंतर लातूर बस स्टैंड वर पहाटे 6:00 वाजता पोहोचली. लातूर हा मराठवाड्यातील एक स्थळ आहे. मराठवाड्यातील शेवटचा भाग म्हणजे नांदेड आहे. इथून पुढे विदर्भ सुरू होतो.

लातूर बस स्टँडवरून 130 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.

लातूर बस स्टँड वरून बाहेर पडल्यानंतर लातूर नांदेड एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करत भातखेडा ह्या ठिकाणी मांजरा नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे बराच काळ प्रवास केल्यानंतर चाकूर नंतर शिरूर ताजबंद बस स्टँडवर सकाळी 6:00 वाजता पोहोचली.

इथून पुढे परत एकदा एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करत अहमदपूर बस स्टैंड वर सकाळी 7:30 वाजता पोहोचली. अहमदपूर हा एकूण सहा फुलाट असणारा बस स्टँड आहे.हा बस स्टँड लातूर विभाग अंतर्गत मोडतो.

इथून पुढे लोहा मार्गे माझी बस आता नांदेड गाठण्यासाठी परत एकदा हायवे वरून धावू लागली. सांगवी ह्या ठिकाणी मनार नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे लोहा बस स्टैंड वर सकाळी 8:00 वाजता पोहोचली. लोहा बस स्टैंड वर एकूण चार फलाट दिलेले आहेत.

लोहा बस स्टँड पासून नांदेड जवळजवळ 32 किलोमीटरचा अंतर राहिलेला होता.

इथून पुढे परत एकदा एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करत सोनखेड इथून पुढे नांदेड जवळ गोदावरी नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस आता नांदेड बस स्टैंड वर सकाळी 9:15 वाजता पोहोचली. हीच गाडी दुसऱ्या दिवशी 3:30 वाजता निघते.

अशाप्रकारे Khed To Nanded चा हा 15 तासांचा प्रवास पूर्ण झाला.

FAQs

Khed To Nanded Distance by road?

600 Km

What are the boarding points from Khed To Nanded?

चिपळूण, कराड, विटा, आटपाडी, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, उजनी, लातूर, अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, लोहा

What is the minimum bus ticket fare from Khed To Nanded?

1000 रुपये

Leave a Comment