नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला या ब्लॉगद्वारे माझा Ambejogai to Chandrapur msrtc bus ने हा जो मी प्रवास केला याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे.
चला तर मग जसं की मी नेहमी प्रमाणे बस स्टॅन्ड ला अर्धा तास लवकरच येतो. माझे बस होती Ambejogai to Chandrapur तिचा वेळ होता 6:15 वाजताचा त्यामुळे मी बस स्टॅन्ड ला 5:30 वाजताच येऊन थांबलो होतो.
Ambejogai to Chandrapur Distance

गुगल मॅप च्या नुसार Ambejogai to Chandrapur हा 450 किलोमीटरचा अंतर दाखवतो कमीत कमी नऊ तास तरी लागतील. जे खरंतर बघायला गेलं तर लांब पल्ला आहे ज्यात पूर्ण दिवस जातो प्रवासीचा.
Table of Contents
Ambejogai To Chandrapur Bus Timing
तर बरोबर सकाळी 6:15 वाजता माझी गाडी अंबेजोगाई या बस स्टँडच्या प्लॅटफॉर्मवर येऊन लागली. ही गाडी बीड विभागाची गाडी असून आंबेजोगाई ह्या आगारातली होती. Ambejogai Bus Stand Timetable पाहण्यसाठी या लिंक वर जाउ शकता.
माझी ही MSRTC Bus आंबेजोगाई,परभणी,हिंगोली, यवतमाळ आणि शेवटी चंद्रपूर असा मार्ग या मार्गे धावली.
आंबेजोगाई बस स्टँड वरून सुटल्यानंतर बाबा चौक इथे थांबलेल्या थोडेसे प्रवाशांना घेत पुढे धावायला सुरू करते.
परळी आंबेजोगाई हायवेवर गिरवली या हायवेवर लागणारे गावाजवळ थोडेफार थांबलेले प्रवाशांना घेत पुन्हा एकदा आपल्या मार्गावर धावते.
Ambejogai to Chandrapur MSRTC Bus Ticket Price
मी Ambejogai to Chandrapur आठशे रुपये तिकीट दर देऊन आपल्या जागेवर जाऊन बसतो. बराच काळ हायवेवर कान्हेरवाडी हा गाव करत पुढे परळी वैजनाथ येथे आझाद चौक पाशी होत परळी वैजनाथ बस स्टँडवर सकाळी 6:38 वाजता फलाट क्रमांक 3 वर येऊन थांबते.
परळी वैजनाथ या बस स्टॅन्ड पासून पुढे गंगाखेड हा बस स्टँड येण्याच्या अगोदर मरगळवाडी या गावावरून होत पुढे 7:30 वाजता गंगाखेड बस स्टॅन्ड ला पोहोचते.
गंगाखेड बस स्टँड पासून पुढे 36 किलोमीटरच्या अंतरावर परभणी बस स्टँड होता. माझ्या या प्रवासाचा तिसरा बस स्टँड म्हणजे परभणी बस स्टॅन्ड.
हायवेवर धावताना दुशलगाव येथे गोदावरी नदी ओलांडत दैठणा गावावरून होत पुढे पोखरणी फाटा आणि ब्राह्मणगाव फाटा या ठिकाणावरून होत परभणी बस स्टँड ला सकाळी 8:30 वाजता पोहोचली. अंबाजोगाई ते परभणी पर्यंत 91 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता तर परभणी बस स्टँड वरून हिंगोली ला आता 71 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिलेला होता.
परभणी बस स्टॅन्ड वरून सुटल्यानंतर रस्त्यावर येणारे लहान मोठे गाव जसे आसोला हा गाव पार करत नांदगाव खुर्द येथे पूर्ण नदीचा पूल ओलांडत झिशे फाटा,आडगाव, जवळा, नागेश वाडी या सगळ्या गावावरून होत औंढा नागनाथ बस स्टैंड वर सकाळी 9:41 ला पोहोचली.
औंढा नागनाथ बस स्टँडवरून आता हिंगोली 30 किलोमीटरच्या अंतरावर होती. बराच काळ हायवेवर झाल्यानंतर येहळेगाव, हिवरा या गावावरून होत पुढे हिंगोली येण्याच्या अगोदर कयधू नदीच्या पुलावरून धावत हिंगोली बस स्टॅन्ड ला सकाळी 10:13 वाजता पोहोचते.
हिंगोली बस स्टँड पासून कलमनुरी आता 19 किलोमीटरचा अंतर राहिला होता. हिंगोली बस स्टॅन्ड सोडल्यानंतर सावरखेडा आणि उमाश या गावावरून होत कळमनुरी बस स्टॅन्ड ला पाऊण तास प्रवास केल्यानंतर सकाळी 10:50 वाजता पोहोचते.
आता इथून कळमनुरी बस स्टँड पासून पुसद हा जवळपास 50 किलोमीटरचा अंतर होता. पुढे असाच भाबळे या गावावरून होत आणि कोल्हा येथे पेनगंगा नदी पार करत सांबळ पिंपरी बस स्टॅन्ड येथे 11:20 वाजता पोहोचते. हा माझा आंबेजोगाई ते परभणी चा सातवा स्टॉप होता.
सांबळ पिंपरी बस स्टँड ला पंधरा मिनिटं चहा पाणी साठी थांबल्यानंतर सांडवा हा गावावरून होत पुसद बस स्टॅन्ड ला पोहोचते. तिथून पुढे वरुड हा गावावरून होत दिग्रस बस स्टॅन्ड ला 1 वाजता पोहोचली.
गांधीनगर ह्या ठिकाणी अरुणावती नदी वरून होत दारवा बस स्टॅन्ड ला 3:00 वाजता पोहोचते. दारवा बस स्टँड वरून यवतमाळ हा 45 किलोमीटरचा अंतर होता. दारवा बस स्टँड सोडल्यानंतर पुढे वाघापूर या ठिकाणावरून जिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट झाडा पार करता पुढे यवतमाळ बस स्टैंड वर 4:00 वाजता पोहोचते.
अशाप्रकारे पुढे वाणी यवतमाळ हवेवर धावता येरद आणि जोडमहा ह्या दोन गावा करत तसंच पुढे वटबोरी आणि मेठीखेडा या दोन ठिकाणा पुढे हॉटेल हिंदुस्तानी येथे जेवणासाठी 5 वाजता थांबते.
पुढे मोहदा या गावावरून होत तसंच रुंजा आणि करंजी गावावरून होत हायवे वर लागणारा करंजी टोलनाका तिथून मारेगाव हा गाव करत वणी बस स्टॅन्ड ला 6:45 वाजता इथून पुढे परभणी 73 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.
बर सकाळ हायवेवर धावल्यानंतर आता गाडी माझी पताला येते वर्धा नदी वरून पुढे कुचना टोल नाका पार करत वरोरा बस स्टॅन्ड ला रात्री 7:36 वाजता पाहोचली.इथून पुढे 47 किलोमीटरचा अंतर राहिला होता.
वरोरा बस स्टॅन्ड सोडल्यानंतर पुढे घोडपेट या गावावरून पुढे चंद्रपूर बस स्टॅन्ड येण्याच्या अगोदर ईराई नदीच्या पुलावरून होत तसेच पुढे लखमपूर या शहरांमधून होत आपला शेवटच्या ठिकाणी चंद्रपूर बस स्टॅन्ड येथे रात्री 8:45 वाजता पोहोचते.
Ambejogai to Chandrapur MSRTC Bus Journey final
अशाप्रकारे माझा Ambejogai to Chandrapur चा जवळ पास 500 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद.