नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझा Aurangabad To Ichalkaranji MSRTC Bus द्वारे केलेला हा प्रवास बद्दल माहिती देणार आहे.
माझ्या या प्रवासाची सुरुवात सिडको बस स्टँड इथून सकाळी 8:00 वाजता झाली. मला सिडको बस स्टॅन्ड वर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून ही बस मिळाली.
माझ्या या गाडीचा रूट होता औरंगाबाद, गेवराई, बीड ,बार्शी, पंढरपूर, मिरज आणि इचलकरंजी अशा प्रकारे होता. गाडी होती ती इचलकरंजी आगाराची होती.
Table of Contents
Aurangabad To Ichalkaranji MSRTC Bus Timing
बरोबर आठ वाजता माझी औरंगाबाद तो इचलकरंजी एमएसआरटीसी बस सिडको बस स्टँड बाहेर पडली. msrtc bus search या लिंक वर click करून तुम्ही msrtc आपले इच्छित गाडीचे वेळापत्र पाहू शकता.
Aurangabad to Ichalkaranji Distance and Ticket Price

माझा हा औरंगाबाद टू इचलकरंजी चा प्रवास 477 किलोमीटरचा होता. औरंगाबाद ते इचलकरंजी चा तिकीट दर 725 रुपये असा आहे .
बराच काळ रस्त्यावर धावल्यानंतर झाल्टा फाटा कडून पुढे औरंगाबाद सोलापूर हायवे वर धावायला सुरू करते. पुढे अडुळ,बक्षाचीवाडी आणि भोकरवाडी येथे टोल नाका असलेले हे गावे करत पुढे बराच काळ धावल्यानंतर पाचोड बस स्टॅन्ड ला पाहोचते .पाचोड बस स्टॅन्ड ला बराच गाड्यांची येणं जाणं आहे. पाचोड बस स्टॅन्ड ला फक्त चार फलाट दिलेले आहेत.
पाचोड बस स्टॅन्ड पासून पुढे परत एकदा माझी MSRTC Bus हायवेवर धावायला सुरू करताना हायवेवर लागणारे डोणगाव,वाडीगोद्री या दोन गावा पार करत पुढे शहागड बस स्टॅन्ड ला थोडा वेळ थांबल्यानंतर परत एकदा माझी MSRTC Bus गोदावरी नदीवर बांधलेला पुलावरून होत पुढे गेवराई बस स्टॅन्ड ला 10:00 वाजता पोहोचली.
गेवराई बस स्टॅन्ड पासून पुढे हायवेवर धावताना पाडळसिंगी येते टोल नाक्यावरून पुढे तसंच बीड बस स्टॅन्ड ला 32 किलोमीटरचा प्रवास करत बीड बस स्टॅन्ड ला सकाळी 10: 40 मिनिटांनी पोहोचलो.
पाडळसिंगे येथे हा आपल्या प्रवासाचा दुसरा टोलनाचा लागला होता.
बीड नंतर माझी MSRTC Bus येरमाळा या ठिकाणी पोहोचणार होती. बीड बस स्टॅन्ड पासून येरमाळा 80 किलोमीटर चा प्रवास शिल्लक राहिला होता. मी औरंगाबाद पासून बीड पर्यंत 123 किलोमीटर चा अंतर पार केला होता.
येरमाळा नंतर पुढचा जो टप्पा होता तो सोलापूर न जाता बार्शी अशा प्रकारे होता.
बीड बस स्टँड सोडल्यानंतर शहरातून बाहेर पडताना बिंदुसारा नदी या पुलावरून होत मांजरसुंबा बस स्टँड आणि चौसाळा बस स्टॅन्ड ह्या ठिकाणावरून पुढे हायवे वर लागणारा माझा प्रवासाचा तिसरा टोल नाका म्हणजे पारगाव येथे टोल नाका पार करत तसाच पुढे हायवे वर लागणारा सरमकुंडी फाटा येथे दुपारी 12:30 वाजता जेवण्यासाठी पंधरा मिनिटांसाठी थांबली.
सरमकुंडी फाटा येथून येरमाळा साठी २६ किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिलेला होता.
सोलापूर औरंगाबाद हैदराबाद माझी MSRTC Bus हायवे वर लागणारा गाव तेरखेडा हा गाव पार करत येरमाळा बस स्टँड ला दुपारच्या 1:00 वाजता पोहोचली. येरमाळा बस स्टँड इथून बार्शी हा 28 किलोमीटरचा अंतर मला पार करायचा होता.
बराच काळ माझी बस बस धावता धानोरे या गावापाशी होत पुढे कुसळंब आणि जामगाव दोन गावाच्या आत मधून प्रवास करत बार्शी या शहराच्या बस स्टँड वरती दुपारी 1:30 वाजता पोहोचते.
तसं बघायला गेला तर बीड बस स्टॅन्ड वरून बार्शी हा 108 किलोमीटरचा माझा प्रवास मी केलेला होता. इथून पुढे इचलकरंजी चा जो प्रवास होता तो बहुतेक 230 किलोमीटरचा असा होता.
बार्शी वरून पुढचा टप्पा होता तो पंढरपूरचा जो 87 किलोमीटर चा प्रवास होता.
बार्शी या बस स्टैंड वर ड्रायव्हर आणि कंडक्टर ची ड्युटी बदली झाल्यानंतर पुढचं प्रवास करायला सुरू करते. बार्शी बस स्टँड पासून पुढे शेंद्री हा गाव पार करत तसंच पुढे कुर्डूवाडी बस स्टँड वर दुपारी 2:41 वाजता पोहोचते.
कुर्डूवाडी बस स्टँड पासून पुढे परत एकदा माझी बस धावायला सुरू केल्यावर आढीव ह्या गावावरून पुढे विसावा हा गाव करत पंढरपूर येण्याच्या अगोदर चंद्रभागा नदीच्या पुलावरून धावत दुपारी 3:30 वाजता पोहोचते.
पंढरपूर बस स्टॅन्ड वरून इचलकरंजीसाठी अजून 160 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिलेला होता. आतापर्यंत मी 320 किलोमीटरचा अंतर चा प्रवास करत पंढरपूर बस स्टँड वर पोहोचलो होतो.
पंढरपूर बस स्टँड सोडल्यानंतर खर्डी या गावावरून होत सांगोला येथे पंढरपूर ते सांगोला पर्यंत 35 किलोमीटरचा प्रवास करत सांगोला बस स्टँड वर 4:22 वाजता पोहोचते. सांगोला बस स्टँड वरून इचलकरंजीचा जो आंतर राहिला होता तो 135 किलोमीटरचा असा होता.सांगोला बस स्टॅन्ड ला एकूण 11 फलाट दिलेले आहेत.
सांगोला बस स्टँड पासून पुढे बराच काळ हायवे वर धावल्यानंतर हायवे वर लागणारा गोडसेवाडी हा गाव करत अंकढल येथे टोल नाका पार करत पुढे जुनोनी या गावावरून होत तसाच पुढे नागज फाटा येथे पोहोचल्यानंतर शिरढोण या गावावरून नंतर अग्रणी नदी चा फुल पार करत बोरगाव येथे टोलनाक्यावरून तसंच पुढे सिद्धेवाडी या ठिकाणावरून होत तासगाव फाटा येथे पोहोचते.
थोड्याच अंतरावर तासगाव फाटा सोडल्यानंतर माझी MSRTC Bus संध्याकाळी 6:20 वाजता मिरज या बस स्टैंड वर पोहोचते.
मिरज बस स्टँड पासून पुढे आता इचलकरंजी 35 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.
मिरज बस स्टॅन्ड सोडल्यानंतर बराच काळ हायवेवर धावल्यानंतर अंकली या ठिकाणावरून पुढे जयसिंगपूर बस स्टैंड वर संध्याकाळी 6:47 वाजता पोहोचते.
अशाप्रकारे जयसिंगपूर बस स्टँड पासून पुढे इचलकरंजी येथे एक ठिकाण राजवाडा हा ठिकाण करत तसाच पुढे माझा या Aurangabad to Ichalkaranji चा प्रवासाचा शेवटचा टप्पा म्हणजे इचलकरंजी येथे बरोबर रात्री 8:00 वाजता पोहोचते.
Aurangabad to Ichalkaranji Final Destination
अशा पद्धतीने माझा जवळ पास 430 किलोमीटरचा आणि जवळजवळ साडेनऊ तास चा हा प्रवास पूर्ण झाला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला याच्याबद्दल मला कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्र आणि मैत्रिणींना आणि नातेवाईकांना या ब्लॉग बद्दल सांगा धन्यवाद.