Vithalwadi To Akkalkuwa MSRTC Bus Journey

नमस्कार मित्रांनो .आज मी आलो होतो ठाणे जिल्ह्यातील विठ्ठलवाडी बस स्टँडवर इथूनच मी माझा प्रवास केला तो म्हणजे Vithalwadi To Akkalkuwa. ही बस बऱ्याच पैकी सजावट केलेली बस होती.

विठ्ठलवाडी बस स्टॅड असं काही मोठं नाही एकदम छोटं बस स्टॅड आहे म्हणजे इथं बस स्टॅड डेपो एकच आहे.विठ्ठलवाडी बस स्टॅडला छोटस प्लॅटफॉर्म दिलेल्या आहेत. त्याला चिटकूनच विठ्ठलवाडी बस स्टॅडच हे वर्कशॉप आहे.

Vithalwadi To Akkalkuwa

माझी MSRTC Bus मस्तपैकी सजवलेली होती. गाडीच्या वरती छानसा झालर दिसून आलं.सजावटीच सामान म्हणजे गोंडे,रेडियम,आर्ट गाडीच्या वरची शोकेसची फुलं आणि गाडीला एकदम पिळदार पिवळी मिशी लावलेली होती.

गाडीच्या हेडलाईटच्या आउटर लेयरला सुद्धा रेडियम ने केलेला होता. मला टायरच्या बाजूला एक रिम पाहायला मिळाली ते आतापर्यंत कुठल्याच गाडीला मी बघितले नव्हतं.

गाडीच्या पाठीमागे एक लालपरी बॅजिंग पण होतं आणि त्याच्यावर छोटसं अक्षरात लिहिलेल आम्ही कल्याणकर.एकदम नादखोळा गाडी सजवलेली होती.

माझा गाडीचा जो रूट विठ्ठलवाडीवरून कल्याण, नाशिक, देवळा, सटाणा, पिंपळनेर, साखरी, नंदुरबार, हातोडा, तळोदा आणि अक्कलकोवा असा माझा गाडीचा मार्ग होता.

गाडीला स्पेशल नाव दिलेल आहे सप्तशिखरची राणी. जे शिखर आहेत त्या भागातले त्याच्या नावावरन ह्या गाडीला नाव दिलेल आहे. मी ज्या MSRTC Bus म्हणजे सप्तशिखरची राणी गाडीचा नंबर MH14 AL 4036 होता.

ही गाडी कल्याणला सकाळी 5:30 च्या दरम्यान येते आणि विठ्ठलवाडीवरून जे सुटण्याचा टायमिंग आहे ते 5:00 वाजता

विठ्ठलवाडी बस स्टॅडला चिटकूनच रेल्वे जंक्शन आहे. ह्या रेल्वे जंक्शन वरून तुम्ही बस स्टॅडला डायरेक्ट येऊ शकता किंवा बस स्टँड वरून तुम्ही डायरेक्ट जंक्शनला जाऊ शकता.

रेल्वे जंक्शन येथून फक्त 100 ते 200 मीटरच अंतरावर आहे. कल्याण बस स्टॅडला जरी उतरला तुम्ही तिथून सुद्धा रेल्वे जंक्शन तुम्हाला 500 ते 700 मीटर च्या अंतरावर आहे.

Vithalwadi To Akkalkuwa Distance

Vithalwadi To Akkalkuwa Distance

तर ह्या प्रवासाचा अंतर तो म्हणजे 400 किलोमीटर होता. तुम्हाला जर ह्या गाडीने प्रवास करायचा असेल तर ही गाडी बुकिंग मध्ये सुद्धा आहे.

विठ्ठलवाडी बस स्टैंड वर तुम्हाला Vithalwadi Bus Stand Time Table पाहायला मिळेल. जिथे सुटणाऱ्या गाड्या आणि येणाऱ्या गाड्या सर्व टायमिंग दिलेल आहे.

Vithalwadi To Akkalkuwa MSRTC Bus Ticket Price

Vithalwadi To Akkalkuwa Ticket Price Rs.790 होता.विठ्ठलवाडी आगराच छोटसं चौकशी कक्ष म्हणायचं झालं तर पलटच्या शेवटच्या टोकाला छोटस नियंत्रक कक्ष आहे. तुम्ही त्याला प्रवासी निवारा म्हणू शकतो.

तर मित्रांनो फायनली माझी गाडी पहाटे पाच वाजता रवाना झाली. आता विठ्ठलवाडी बस स्टँड इथून ही गाडी गेली कल्याण बस स्टँडला.

माझी गाडी कल्याणवरून पहाटे 5:30 निघाली. कल्याण पासून मुंबई नाशिक हायवे वर धावल्यानंतर पुढे शहापूर मध्ये माझी बस नाश्त्यासाठी बरोबर 7 वाजून 30 मिनिटानी थांबली होती.

शहापूर नंतरचा जो तुम्हाला घाट पाहायला मिळेल तो म्हणजे कसारा घाट.तर मित्रांनो बराच काळ हायवेवर धावता मी पोचलो थक्कर बाजार नवीन सीबीएस बस स्टॅडला बरोबर 9:30 वाजता. ह्या रोडला गाडी फक्त वन टाईम जेवणासाठी थांबते त्याच्यानंतर गाडीला अक्कलकुवा पर्यंत थांबा नाही.

माझी बस थांबली फलाट क्रमांक एक वरती त्या ठिकाणी नंदुरबार,सटाणा,साखरी,उंबरटी,नामपूर इकडे जाण्यासाठी बसेस लागतात.

तर मित्रांनो माझी गाडी डायरेक्ट भिवंडी बायपास करून नाशिकला पोहोचली तर इथून माझी गाडी नाशिक देवळा रोड वर देवळा ह्या ठिकाणी पोचण्यासाठी धावायला सुरू करते.

तर नाशिक ते देवळा जवळपास 75 km च अंतर आहे. सोग्रस फाटा इथून बावडबारी घाट सेक्शन पार करत देवळा ह्या ठिकाणी 11 वाजता पोहोचलो. देवळा बस स्टॅडला एकदम मस्त डिझाईन केलेल आहे.

देवळा पासून इथून आता जो पुढचा स्टॉप होता तो सटाणा.सटाणा लोकल डिस्टन्स सारखाच आहे टोटल 16 km आणि इथून जर बघायचं झालं तर गुजरातची बॉर्डर जवळ आहे. तसेच मध्यप्रदेशची बॉर्डर पण महाराष्ट्रपासून जवळ आहे.इथून महाराष्ट्रातल शेवटच शहर अक्कलकुवा आहे.देवळा सटाणा रस्त्यावर धावता पुढे गिरणा नदीच्या पुलावरून होत धावल्यावर ठेंगोडा ह्या ठिकाणावरून पुढे माझी बस नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा बस स्टँड वर 11:45 वाजता पहोचते.

सटाना बस स्टॅंड हे टोटल 15 फलाट असलेल बस स्टॅड आहे. सटाणा बस स्टँड शेजारी चिटकून सटाना डेपो आहे.सटाणा बस स्टँड खूप मोठा आहे आणि सुटसुटीत अस बस स्टॅड आहे. ह्या बस स्टॅडला वरती इथे कचरा वगैरे काही दिसणार नाही. एकदम टापटीप असा बस स्टँड आहे. ह्या बस स्टँड इथे छोटस चौकशी कक्ष दिलेला आहे. तसेच कॅनटीन पण दिलेला आहे.इथे सर्व सोई सुविधा उपलब्ध आहे.

तर अक्कलकुवा जाण्यासाठी सटाणा बस स्टँड वर फलाट क्रमांक सात इथून गाडी सुटते. ह्या बस मध्ये तुम्हाला ऑनलाईन पेमेंट सुद्धा मिळून जाईल.

सटाणा बस स्टँड पासून पुढे सटाणा ताहाराबाद ह्या रस्त्यावरून धावायला सुरू करताना करंजाड ह्या ठिकाणावरून पुढे बरोबर 12:24 वाजता ताहाराबाद बस स्टँड वर पोहोचली .

ताहाराबाद हा सातपुडा रांगामध्ये वसलेले हे विभाग आपण म्हणू शकतो.ताहाराबाद बस स्टँड पासून इथून धुळे जिल्ह्याची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर नंदुरबार शेवटचा जिल्हा असणार होता.

तर तुम्हाला ह्या रोड वरती दोन किल्ले पाहायला मिळतील. इथून गुजरातची बॉर्डर खूपच जवळ आहे. पुढे कातरवेळ इथून आता नाशिक जिल्ह्याची हद्द समाप्त झालेली होती.

इथून ज्या जिल्ह्याची हद्द चालू होते ती म्हणजे धुळे कातरवेल शेवटचा असा गाव आहे,जिथे नाशिक जिल्ह्याची हद्द समाप्त होऊन धुळे जिल्ह्याची हद्द चालू होते.

तसेच शेलबारी घाट पार करून धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर बस स्टॅडवर दुपारी 12:55 वाजता पाहोचली .

ह्या Vithalwadi To Akkalkuwa जेवढे पण जिल्हे आलेले होते ते काही अशा प्रकारे आहे ठाणे जिल्हा, नाशिक जिल्हा त्याच्यानंतर आता धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यानंतर जे शेवटचा जिल्हा लागणार आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्हा.एवढे चार जिल्हे ह्या रोडवर येतात. पिंपळनेर बसस्टँड वर टोटल आठ फलाट दिलेले आहे.पिंपळनेर बस स्टँड च्या परिसर मधे काँक्रिट चा रस्ता केलेला आहे.ह्या

भागात कांद्याच उत्पादन खूप जास्त आहे. ह्या नाशिकच्या भागात द्राक्ष कांदा आणि दूध व्यवसाय केला जातो.

पिंपळनेर बस स्थानकावर वरुण बाहेर पडल्या नंतर तुम्हाला दोन रस्ते बघायला मिळतील. एक रस्ता साखरी नंदुरबाडकर इकडे जातो आणि दुसरा रोड जातो तो सुरत चरणमाळ नवापूर सुरत ह्या दिशेने.

बराच काळ रस्त्यावरून धावल्यानंतर साखरे बस स्टैंड वर दुपारी 1:30 वाजता पोहोचली.साखरी बस स्टँडच्या आवारात कॉंक्रीट ग्राउंड पहायला मिळेल. ह्या बस स्टैंड वर एकूण चार फलट दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाच ते नऊ पर्यंत फलाट दिलेल्या आहेत .

साक्री बस स्टॅडला चिटकूनच बस स्टॅडचा डेपो आहे.इथे डिझेल वगैरे भरतात आणि इथे छोटस सुरक्षा विभाग ऑफिस आहे.तर अशा पद्धतीचा हा डेपो आहे.

ह्या भागात सगळ्यात जास्त तुम्हाला GSRTC च्या बसेस मिळेल. आपल्या सुद्धा काही महाराष्ट्रातल्या गाड्या गुजरात मध्ये जातात .

सक्री वरून नंदुरबार पर्यंत माझा जो डिस्टन्स राहिलेला होता जवळपास 63 km अंतर होता आणि फायनल स्टॉप बघायचा झाला तर अक्कलकुवा 100 km चा समथिंग आपला प्रवास राहिलेला होता.

कळमबिर ह्या गावावरून होत बराच काळ साक्री नंदुरबार ह्या हायवेवर धावल्यानंतर पुढे निजामपूर तसेच छडवेल ह्या गावावरून तसेच पुढे घाट सेक्शन पार करत आष्टा ह्या गावावरून होत नंदुरबार बस स्टैंड वर फ्लॅट क्रमांक नऊ येथे दुपारी 3:11 वाजता पोहोचली.

इथून पुढे आता नंदुरबार बस स्टँड पासून तलोदा ह्या मार्गावरून माझी गाडी नंदुरबार तलोदा ह्या रस्त्या वरून धावू लागते.

इथून महाराष्ट्र गुजरात हद्द सुरू झालेली होती.अंतुर्ली पासून फक्त 10 किलोमीटरचा अंतर गुजरात ह्या राज्य होता. हातोडा जवळ तापी नदी वरून पुढे परत एकदा महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत शिरल्यानंतर तळोदा बस स्टॅन्ड वर संध्याकाळी 4:17 वाजता पोहोचली. तळोदा बस स्टॅन्ड ला सात फलट दिलेले आहेत. तलोजा नंतर आपला शेवटचा शेवटचा टप्पा अक्कलकुवा अशा प्रकारे होता .

बुऱ्हानपूर अंकलेश्वर ह्या हायवेवर धावता आश्रवा ह्या गावावरून वाण्याविहीर ह्या ठिकाणावरून पुढे संध्याकाळी 5:30 वाजता नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा बस स्टैंड वर पोहोचली. ह्या बस स्टैंडला एकूण आठ फलाट दिलेले आहेत.

Vithalwadi To Akkalkuwa Final Destination

मी माझा हा 12 तासांचा Vithalwadi To Akkalkuwa चा प्रवास चार जिल्ह्यातून होत पूर्ण केला. दुसर्या दिवशी सकाळी हीच बस अक्कलकुवा पासून विठ्ठलवाडी साठी 6:30 वाजता निघते.

तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ह्याच्याबद्दल मला माहिती द्या आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना ह्या ब्लॉगबद्दल कृपया सांगा धन्यवाद.

1 thought on “Vithalwadi To Akkalkuwa MSRTC Bus Journey”

Leave a Comment