नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये माझा Nagpur to Solapur चा प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.
तर मित्रांनो नागपूर बस स्टैंड वर फ्लॅट क्रमांक 13 इथून माझी गाडी संध्याकाळी चार वाजता आपल्या प्रवासासाठी निघाली. Nagpur to Solapur MSRTC Bus चा मार्ग नागपूर पासून वर्धा, यवतमाळ, उमरखेड, नांदेड, लातूर, तुळजापूर आणि शेवटी सोलापूर अशा प्रकारे होता.
ही गाडी गणेश पेठ आगाराची असून तसेच नागपूर विभागाची होती. गाडीचा नंबर होता MH 40 CM 6078.नागपूर बस स्टैंडचा Nagpur Bus Stand Time Table पाहण्यसाठी ह्या लिंक वर click करा.
Table of Contents
Nagpur To Solapur Distance

माझा हा नागपूरचा सोलापूरचा प्रवास जवळजवळ 16 तासांचा होता तसेच ह्या मार्गावरील अंतर जवळ जवळ 700 kilometer होता.
Nagpur To Solapur MSRTC Bus Ticket Price
940 रुपये तिकीट काढून मी माझ्या प्रवासाचा या बसने सुरुवात केला.तर मित्रांनो बरोबर संध्याकाळी चार वाजता माझी गाडी नागपूर बस स्टॅन्ड मधून बाहेर निघाली. नागपूर शहरातून बाहेर जाण्यासाठी सुरुवात करत असताना बुटीबोरी म्हणजेच रोहीखैरी या ठिकाणी असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उडान पुलच्या खालून होत नागपूर तुळजापूर हायवे वर धावते.
बराच काळ हायवेवर धावल्यानंतर माझी बस आता वर्धा बस स्टैंड वर क्रमांक सहा वरती संध्याकाळी 6:15 वाजता पोहोचली. वर्धा बस स्टॅन्ड पासून पुढचा जो टप्पा होता तो यवतमाळ अशाप्रकारे होता. येथून यवतमाळ 68 किलोमीटर चा अंतर होता. आतापर्यंत नागपूरपासून 78 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला होता.
तर पुन्हा एकदा वर्धा बस स्टँड पासून सुटल्यानंतर कमीत कमी 75 किलोमीटरचा प्रवास करून जवळजवळ एक तासाच्या आत म्हणजेच 7:40 मिनिटांनी यवतमाळ बस स्टैंड वर पोहोचली. आतापर्यंत नागपूरपासून 150 किलोमीटरचा प्रवास झाला होता.
तर यवतमाळ बस स्टँड पासून आता माझी गाडी यावतमाळ दारवा या रस्त्यावर धावत धारवा या दिशेने जात असताना मध्येच 9:00 वाजता जेवणासाठी माझी गाडी थांबा घेते.
जेवण झाल्यानंतर माझी गाडी आपल्या पुढच्या प्रवासासाठी म्हणजे धारवा या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुरुवात करते. तर मित्रांनो बरोबर रात्री 9:00 वाजता माझी गाडी आता दारवा हा बस स्टैंड वर पोहोचली होती.
दारवा बस स्टॅन्ड पासून पुढे आता जवळजवळ अर्धा तासाच्या अंतरावर असणारा दिग्रस बस स्टॅन्ड वरती रात्री 10:10 मिनिटांनी पोहोचली.
तसेच रात्रीचा प्रवास असल्यामुळे बस स्टँड टू बस स्टॅन्ड प्रवास करते. अशाच प्रकारे आता माझी गाडी नांदेड बस स्टैंड वर रात्री 2:00 वाजता फलट क्रमांक 3 वर पोहोचली. या ठिकाणी गाडीचे Crew म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टर ची बदली होते.
तर मित्रांनो गाडीचे टायर वगैरे आणि सगळं काही बरोबर आहे याची खात्री केल्यानंतर दुसरे ड्रायव्हर आणि कंडक्टर पुढचा प्रवास सुरू करतात.
आता 250 किलोमीटरचा प्रवास मला पूर्ण करायचा होता. तर आता माझी गाडी आपल्या पुढच्या टप्पा गाठण्यासाठी लातूरच्या दिशेने धावायला सुरू करते.
अशाप्रकारे रात्री 3:30 वाजता अहमदपूर बस स्टैंड वर छोटासा थांबा घेत पुढे निघते आणि पहाटे 5:00 वाजता लातूर बस स्टैंड वर पोहोचते. तर लातूर बस स्टँड पासून सोलापूर 123 किलोमीटर चा अंतर शिल्लक राहिला होता.
लातूर सोलापूर हायवे वर धावत औसा या गावावरून होत पुढे उजनी या ठिकाणी हॉटेल आर्यन गावरान बासुंदी या नावाने असणारा हॉटेलवर चहा पिण्यासाठी छोटासा थांबा घेते.
चहा पाणी झाल्यानंतर माझी गाडी आता चालली तुळजापूर मार्गे सोलापूर पोहोचण्यासाठी. बराच काळ हायवेवरून धावत आता तुळजापूर बस स्टैंड वर सकाळी साडेसहा वाजता पोहोचल्यानंतर पुढचा टप्पा पार करण्यासाठी सुरुवात करते.
Nagpur To Solapur Final Destination
तुळजापूर घाट इथून प्रवास करत पुढे माझी बस आता सोलापूर बस स्टैंड वर सकाळी 7:30 वाजता पोहोचली. अशाप्रकारे माझा Nagpur to Solapur चा 700 किलोमीटरचा तसेच 16 तासांचा प्रवास पूर्ण केला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला याच्याबद्दल मला माहिती द्या आणि आपला मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना या ब्लॉगबद्दल सांगा आणि शेअर करा धन्यवाद.