Ahmednagar Tarakpur Bus Stand To Kalyan MSRTC Bus

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे  आपल्या या ब्लॉग मध्ये. आज मी तुम्हाला माझ्या या ब्लॉगमध्ये माझा प्रवास Ahmednagar Tarakpur Bus Stand to Kalyan याच्या बद्दल मी आज माहिती देणार आहे.

Ahmednagar Tarakpur Bus Stand To Kalyan distance

Ahmednagar Tarakpur Bus Stand to kalyan distance
Ahmednagar Tarakpur Bus Stand to kalyan distance

Ahmednagar Tarakpur Bus Stand to Kalyan हा २१५ किलोमीटरचा माझा प्रवास झाला. मी Ahmednagar Bus Stand वर सकाळी ६:०० वाजता हजर झालो.माझी जी गाडी होती ती ६:३० वाजता ची होती.माझ्या या गाडी अगोदर ६:०० वाजताची एक गाडी निघालेली.

Ahmednagar Tarakpur Bus Stand to Kalyan जायचं असेल तर माळशेज घाट हे एक मार्ग आहे. ह्या बस स्टॅन्ड ला अजून एक नाव आहे. Tarakpur Bus Stand. ह्या बस स्टँड वर दोन बाजू प्लॅटफॉर्म दिलेले आहेत एका बाजूला ६ प्लॅटफॉर्म आहेत आणि दुसऱ्या बाजूला ६ ते १२ प्लॅटफॉर्म आहेत. मी ज्या गाडीने प्रवास केला त्या गाडीचा नंबर प्लेट होता MH20 GC 3753.तुम्हाला जर Ahmednagar to kalyan st bus timetable पहायचं असेल तर ह्या लिंक वर click करू शकता.

प्रवास करताना मी ही खात्री करतो की मला नेहमी ड्रायव्हरची मागची सीट मिळावी जी सोयस्कर असते. गाडीचा जे मार्ग आहे ते Ahmednagar,Alephata,Otur आणि Kalyan Bus Stand.

बसची जी सीट होती ती ऍडजेस्टेबल होती म्हणजे तुम्ही seatला पुढे मागे करू शकता आणि पुष्कळ कम्फर्टेबल seat होते या गाडीचे.

अहमदनगर या जिल्ह्यामध्ये तीन बस स्टँड आहेत. पहिला बस स्टँड नाव आहे Tarakpur Bus Stand दुसऱ्या बस स्टँडचे नाव आहे Maliwada Bus Stand आणि तिसरा बस स्टँडचा नाव आहे Swastik Bus Stand या बस स्टँडचा दुसरा नाव आहे Pune Bus Stand कारण इथून  भरपूर गाड्या पुण्याला जातात.

गाडीत  चढणारा मी पहिला माणूस होता. जेव्हा मी गाडीत शिरलो तेव्हा गाडीत कोणीही नव्हते.

गुगल मॅप अनुसार ह्या मार्ग म्हणजे Ahmednagar Tarakpur Bus stand to Kalyan चा ४ तासाचा timing धाखावतो.पण माझ्या अनुभवा प्रमाणे मला सहा तास लागले या प्रवासाला.

बरोबर सहा वाजता माझी गाडी Ahmednagar Tarakpur Bus stand timetable इथून सुरू झाली. याच्यानंतर जे दुसरा बस स्टॅन्ड होता ते होता अहमदनगर मध्येच माळीवाडा बस स्टँड.

Ahmednagar To Kalyan Bus Ticket Price?

अहमदनगर तारकपूर बस स्टँड ते कल्याण ticket दर 315 रुपये आहे. हा मालीवाडा बस स्टॅन्ड अहमदनगर मध्ये तारकपूर नंतर दुसरा महत्त्वाचा बस स्टँड आहे.या बस स्टँडवरून माझा लांबचा प्रवास सुरू झाला. माझ्या ह्या Ahmednagar Tarakpur Bus Stand to Kalyan या प्रवासामध्ये जे गाव मला दिसले ते होतं जखानगाव,टाकळी खामगाव,भाळवणी,धोत्रे बु. ढोकी टोल नाका,टाकळी ढोकेश्वर, कर्जले हर्या, सावरगाव,आने, बेल्हे, राजुरी, आळे. या सर्व गावावरून होत माझी msrtc bus सात वाजून पन्नास मिनिटांनी आळेफाटा बस स्टँड वर पोहोचते.

इथून आता माझ्या msrtc bus चा प्रवास उतूर मार्गे माळशेज घाटासाठी होता.Ahmednagar Tarakpur Bus stand  पासून जवळ जवळ आळेफाटा पर्यंत 80 किलोमीटरचा प्रवास मी केला होता आणि कल्याण पर्यंत 130 किलोमीटरचा प्रवास उरलेला होता. जसं जसं मी या प्रवासात पुढे जात होतो बस मध्ये गर्दी वाढत होती.

आळेफाटा बस स्थान वरून सुटल्यानंतर माझी msrtc bus आता पिंपरी पेंढार ह्या गाव पार करत अहमदनगर कल्याण हायवे NH 61 वर धावत होती.

नगर कल्याण टोल नाका पार करून माझी msrtc bus ओतूर बस स्टॅन्ड ला ८:११ मिनिटांनी सकाळी पोहोचते.

आळेफाटा ते ओतूर जास्त म्हणजे 15 किलोमीटरचा अंतर होता.  येथे यायला गाडीला जास्त जास्त पंधरा ते वीस मिनिटे लागली. ओतूर बस स्टँड सोडल्यानंतर आता माझी गाडी आहे माळशेज घाटा कडे जात होती. ओतूर बस स्टँडच्या बाहेर आल्यावर थोडाच अंतरावर मला मांडवी नदी दिसली जिला पार करून msrtc bus पुढे धावत गेली.

बराच काळ रस्तावर धावत आता माझी बस जुगा डयाम ब्रिज च्या वरती धावत धावता करंजाळे गाव पार केला.जिथून सुरुवात झाली माळशेज घाटचा पायथा.घाट तसा तर बघण्यासारखा आहे कारण इथे भरपूर धबधबे आणि खूप सारे वळण वगैरे होते. इकडचे नजारे बघण्यासारखा होता. कारण मी जेव्हा या घाटावरून प्रवास करत होतो तो पावसाळ्याचा काळ होता.

रविवारी या घाटावर नजारे बघण्यासाठी फार गर्दी होते.घाटावरून msrtc bus उतरल्यानंतर जे गाव मला पहिला लागला तो होता सावरणे. घाट उतरल्यानंतर माझे सकाळी ९:१५ वाजता जेवायला मोरया रेस्टॉरंट या हॉटेलवर माझी msrtc bus थांबली.

माझ्याबरोबर दुसऱ्या गाड्या पण होते कल्याण लातूर, आणि देवराई आगाराची भिवंडी ते देवराई. तिसरी गाडीची आली होती ठाणे ते अहमदनगर.

जिथे आम्ही जेवायला थांबलो होतो तिथून आता कल्याण गुगल मॅप मध्ये 71 किलोमीटर आणि  दोन तास असा दाखवत होता.

अजून एक छोटासा भोसंडे गाव,टोकवडे,सरळगाव,शेवळे या सगळ्या गावा पार करत जवळपास 40 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर बरोबर १०:३० वाजता मुरबाड बस स्टँड या शहरांमध्ये शिरते. मुरबाड बस स्टँड हा ठाणे जिल्हा अंतर्गत येतो .मुरबाड बस स्टॅन्ड वरून आता मला उरलेले 30 किलोमीटर प्रवास करायचा होता कल्याण पर्यंत.

मामणोली, रेवती अशा  छोटासा गावावरून आणि उल्हास नदीच्या पुलावरून धावत उल्हासनगर हा शहर झाल्यानंतर शहाड कल्याण या शहरांमध्ये पोहोचते. वल्डोनी नदीचा जो फुल होता तो उल्हास नदीच्या पूलानंतर दुसरा फुल होता ज्याला माझी बस पार करून पुढे जाते.

Ahmednagar Tarakpur Bus Stand To Kalyan Final Destination

अशाप्रकारे मी दुपारी १२:०० वाजता Kalyan Bus Stand ला पोचतो.कल्याण बस स्टँड लागूनच कल्याण रेल्वे स्टेशन आहे जिथून तुम्ही आपल्या रेल्वेच्या साह्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकता. अशा प्रकारे जवळजवळ ६ तास प्रवास करून मी कल्याण बस स्टॅन्ड ला पोचतो.

तुम्हाला हा ब्लोग कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या मित्र नातेवाईक ह्यांना share करा.धन्यवाद्.

FAQ

What is Ahmednagar to kalyan distance?

215 km

What is Ahmednagar to Kalyan bus ticket price?

Rs.315

Leave a Comment