नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या या ब्लॉगद्वारे Amravati To Chindwada MSRTC Bus Timetable बद्दल तसेच या मार्गावरील केलेल्या प्रवासाबद्दल माहिती पुरवणार.
ज्या गाडीने माझा प्रवास झाला ती वरुड आगारातली तसेच अमरावती विभागाची होती याचा अर्थ असा की ही गाडी वरुड आगारातून प्रवास करत अमरावती या ठिकाणी पोहोचते. अमरावती इथून सकाळी 8:30 वाजता ही बस आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी प्रवास करते.
Table of Contents
Amravati To Chindwada MSRTC Bus Timetable
तुम्हाला Amravati To Chindwada MSRTC Bus Timetable खालील प्रमाणे बघायला मिळेल.
| From | To | Timings | Routes |
| Amravati | Chindwada | 8:30,9:00,16:45 | Morshi, Warud, Pandhurna, Sausar |

Amravati To Chindwada Distance By Road

अमरावती ते छिंदवाडाचा अंतर 220 km आहे. अमरावती बस स्टँडच्या बाहेर तुम्हाला एका रांगेत नाश्ता करण्यासाठी स्टॉल दिसतील.
Amravati To Chindwada MSRTC Ticket Price
अमरावती ते छिंदवाडा चा तिकीट दर जवळपास 350 रुपये आहे जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
विदर्भातील सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थ कचोरी स्पेशल आहे जे तुम्हाला या स्टॉलवर खायला मिळेल.
या गाडीचा मार्ग अमरावती वरून मोर्शी, वरूड ,पांडुर्णा ,सौंसर आणि शेवटी छिंदवाडा अशा प्रकारे आहे. या गाडीचा नंबर MH 14 MH 1951आहे.
अमरावती बस स्टँड मधून बाहेर पडत माझी बस शहराच्या रस्त्यावरून प्रवास करत पुढे अमरावती मोर्शी हायवे वरून धावत पुढे माहुली या ठिकाणावरून होत पुढे बराच काळ हायवे वरून प्रवास करत मोर्शी बस स्टॅन्ड वर सकाळी 9:40 वाजता अमरावती पासून 53 किलोमीटरचा अंतर गाठत पोहोचलो होतो.
मोर्शी बस स्टॅन्ड फार सुंदर आणि स्वच्छ आहे. हा बस स्टॅन्डचा बांधकाम नवीन आहे त्यामुळे तुम्हाला ह्या बस स्टँड मध्ये सिमेंटचे रस्ते दिसून येईल. मोर्शी बस स्टैंड वर बरोबर मध्यभागी चौकशी कक्ष उभारला गेलेला आहे. मोर्शी बस स्टँड लगत मोर्शी डेपो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल.
माझी गाडी आता 33 किलोमीटरचा अंतर पार करण्यासाठी वरुड च्या दिशेने धावू लागली. या भागातले रस्ते फार सुंदर आणि काँक्रीटचे आहेत.
बराच काळ हायवेवरून प्रवास केल्यानंतर बेनोडा नंतर वरुड बस स्टैंड वर सकाळी 10:30 वाजता पोहोचली. वरुड बस स्टँड च्या बाजूलाच वरुड डेपो आहे. जिथून सगळे गाडी डिझेल भरून आपला पुढचा टप्पा पार करण्यासाठी निघतात.
या ठिकाणी माझी गाडी डिझेल भरण्यासाठी वरुड डेपो मध्ये दाखल झाली. वरुड बस स्टँड चा परिसर फार स्वच्छ आणि सुंदर तसेच काँक्रीटचा रस्ता दिलेला आहे त्यामुळे या बस स्टँडची सुंदरता अजून उभरून दिसते. या बस स्टैंड वर एकूण सहा फ्लॅट दिलेला आहेत तसे बस स्टॅन्ड चा बांधकाम जुनाच म्हणावा लागेल.
हा बस स्टॅन्ड महाराष्ट्रातील शेवटचा बस स्टँड म्हणू शकता इथून पुढे मध्य प्रदेश राज्याची हद्द सुरू होते.अमरावती पासून 90 किलोमीटरचा अंतर पार करत मी आता वरुड बस स्टैंड वर पोहोचलो होतो.
इथून पुढे छिंदवाडा पार करण्यासाठी जवळजवळ 125 किलोमीटर चा अंतर शिल्लक राहिला होता. वरुड हा शहराला संत्रानगरी सुद्धा ओळखला जातो कारण या ठिकाणी संत्रा ची उत्पादन जास्त आहे.
महाराष्ट्रातील शेवटचा ठिकाण महेंद्री आहे तसेच मध्य प्रदेश राज्यातील पहिला गाव बनगाव आहे.वरुड परतवाडा मोर्शी या ठिकाणी सर्वात जास्त उत्पादन केली जात.
इथून पुढे पुसला नंतर वरुड पुंढर्णा हायवेवरून प्रवास करत पुढे जाऊ लागली. या हायवेवर तुम्हाला रस्त्याचे दोन्ही ठिकाणी संत्र्याची झाड बघायला मिळतील.
थोड्याच अंतरावर पुढे वर्धा नदी पार करत माझी गाडी आता मध्य प्रदेश राज्यात दाखल झाली.मध्य प्रदेश भागातील सर्वात पहिला ठिकाण बनगाव या ठिकाणावरून होत पुंढर्णा गावात प्रवास करू लागली .
जसं माझी गाडी मध्य प्रदेश राज्यात दाखल झाली तसेच मला खराब रस्ते पहायला मिळालं.
या भागात रस्त्यांची अवस्था फार बेकार आहे. बराच काळ हायवेवरून प्रवास केल्यानंतर माझी बस आता दुपारी 12:00 वाजता बस स्टैंड वर पोहोचली. जवळपास दहा मिनिटं चहा पाणी साठी थांबल्यानंतर माझी गाडी परत एकदा पुढे प्रवास करण्यासाठी सुरू करते. या ठिकाणी मध्य प्रदेश राज्याची बस सेवा सुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल.
काश्मीर कन्याकुमारी हायवे वरून प्रवास करत पुढे पिंपळा गावावरून होत सौंसर बस स्टँड वर दुपारी 1:00 वाजता पोहोचत पुढे रामकोणा नंतर छिंदवाडा हायवे वरून धावू लागले.
ह्या रस्त्यावरचे वैशिष्ट्य तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट झाड किंवा जंगली पाहायला मिळतील. इथून पुढे सिलेवनी घाट पार करत माझी बस छिंदवाडा शहरात दाखल होऊन बस स्टैंड वर दुपारी 2:00 वाजता पोहोचली.
- वेळ: 8:30
- मार्ग : मोर्शी, वरूड ,पांडुर्णा ,सौंसर
- तिकीट : 350 रुपये
- एकूण कालावधी :6 Hours
- पाहोचण्याचा वेळा : 2:00 pm
- अंतर : 220 Km
अशाप्रकारे अमरावती ते छिंदवाडा हा आंतरराज्य प्रवास सहा तासांचा पूर्ण झाला.
FAQ
What is Amravati To Chindwada Distance By Road?
220 Km
How much is Amravati To Chindwada MSRTC Ticket Price?
350 रुपये