नमस्कार मित्रांनो आणि जय महराष्ट्र स्वागत आहे आपल्या ब्लोग मध्ये आणि आज मी माझा Amravati to Pune प्रवासा बद्दल माहिती देणार आहे.आता ही माझी msrtc bus संध्याकाळी 7:00 वाजता Amravati Central Bus Stand वरून निघाली.
अमरावती सेंट्रल बस स्टँड वरून १० मिनिटा मधे आता गाडी आली होती राजापेठ बस स्टँडला 7:10 वाजता.ही गाडी अमरावती पुणे बुकिंग गाडी असते. ह्या गाडीचा एकदम जबरदस्त प्रवास झाला.ही गाडी 1×1 sleeper seater अशी असते. ह्या msrtc bus चा माझा हा अनुभव चांगला होता. जर तुम्हाला msrtc Bus Timetable बद्दल अधिक माहिती हवी असेल तर या लिंक वर click करून मिळवू शकता.
Table of Contents
Amravati To Pune Distance and Ticket Price

अमरावती ते पुणे चा ticket दर बघायचं म्हणलं तर Rs.1275 असून Amravati to Pune Sleeper Bus ला ₹550 km चा डिस्टन्स आहे.
ज्या गाडीने मी प्रवास केला त्या गाडीचा नंबर होता एम एच 14 एलबी टू फोर वन टू. जी अमरावती विभागाने आगाराची गाडी होती. माझा जो प्रवास झाला होता तो विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागातून होत गेला.
या गाडीचा मार्ग अमरावती, मूर्तीजापुर, अकोला, खामगाव, चिखली, जालना आणि छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर आणि शेवटी पुणे अशाप्रकारे होता.
अमरावती अकोला हायवेवर सुसाट वेगाने धावता मुर्तीजापुर बायपास करत कुरानखेड टोल नाका पार करत 93 किलोमीटरचा अंतर गाठत अकोला बस स्टैंड वरती गाडी पोहोचली. अकोला या बस स्टॅन्ड ला दोन फलाट दिलेले आहेत.
अकोला बस स्टँड वरून पुढचा स्टॉप खामगाव असा आहे जो इथून 52 किलोमीटरचा अंतर असतो. अकोला बस स्टँड ला रात्रीच्या गाड्या फार कमी लागतात म्हणून इथे गर्दी नेहमी जास्त असते.
अकोला खामगाव हायवे नंबर एन एच 53 या हायवेवर तरोडा येथे टोल नाका पार करत खामगाव बस स्टैंड वरती रात्रीच्या 10:15 वाजता पोहोचते.
खामगाव बस स्टँड पासून पुढे आता माझी बस खामगाव चिखली या हवेवर धावताना हवेच्याकडे लागणारे लहान छोटे गाव जसे गणेशपुर या गावाच्या थोड्याच अंतरावर उंदरी या नावाच्या गावाच्या अलीकडे जे इथून चार किलोमीटरचा अंतर असून माझी हॉटेल शिव येथे जेवणासाठी रात्रीच्या 11:15 थांबते. हा जो हॉटेल आहे तो खामगाव चिखली या हायवेच्या कडेला तुम्हाला दिसेल. या हॉटेलपासून चिखली 30 किलोमीटरचा अंतरावर आहे.
इथून पुढे परत एकदा माझ्या प्रवासाची सुरुवात होते थोडाच अंतरावर मला उंदरी आणि अमडापूर अशा ह्या छोट्या गावावरून होत रात्रीच्या ह्या एक ही माणूस नसणारा रस्त्यावरून पुढे चिखली बस स्टॅन्ड ला 12:20 वाजता पोहोचते .
तिथून पुढे चिखली जालना हायवे धावता छत्रपती संभाजीनगर सर्कल हा ठिकाण करत पुढे संभाजीनगर अहमदनगर हायवे वर धावू लागते.
चिखली नंतर आता रात्रीच्या 1:45 वाजता जालना पोहोचली. इथून पुढे एक तासाचा अंतर गाठत रात्रीच्या 2:50 वाजता छत्रपती संभाजी नगर येथे पोहोचते.
ही स्लीपर बस असल्याकारणाने हायवे वरच्या सगळ्या गाड्या मागे टाकत पुढे जाताना मला फार आनंद होत होता. बराच काळ हवेवर धावल्यानंतर प्रवरा संगम या हायवे वरचा गाव करत पुढे नेवासा फाटा त्याच्यानंतर घोडेगाव या सगळ्या गावा पार करत अहमदनगर स्वास्तिक बस स्टँड ला सकाळी बरोबर 5:15 पोहोचते. इथून टोटल अंतर राहिला होता तो 120 किलोमीटर चा असा होता.
Amravati to Pune Final Destination
अहमदनगर बस स्टँड सोडल्यानंतर आता माझी गाडी अहमदनगर पुणे या हायवेवर धावत होती. हायवे च्या कडेला लागणारे जे गाव जसे कामरगाव आणि सुपा या ठिकाणा वरून होत पुढे शिरूर बायपास पार करत पुढे कोरेगाव आणि लोणीकंद या गावावरून होत पुढे पुणे शहरात शिवाजीनगर बस स्टॉप येथे सकाळी 7:50 वाजता पोहोचते.
अशा प्रकारे माझा विदर्भतून मराठवाडा आणि मराठवाडा तून पश्चिम महाराष्ट्र पर्यंत माझा हा प्रवास पूर्ण केला. या एमएसआरसी स्लीपर बसणे 13 तास चा अमरावती ते पुणे चा प्रवास करत पुण्याला पोहोचतो.