Beed To Chiplun MSRTC Bus Journey

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझा Beed To Chiplun  ह्या मार्गावरचा प्रवास बद्दल तुम्हाला माहिती देणार आहे, चला तर मित्रांनो सुरु करूया आपला हा ब्लॉग.

जसे की तुम्हाला माहित आहे की मी नेहमीप्रमाणे अर्धा तास अगोदर बस स्टैंड वर पोहोचतो. मी ज्या गाडीने प्रवास करणार होता ती होती बीड चिपळूण आगारातली Beed To Chiplun  गाडी जी मला सकाळी 7:00 वाजता बीड बस स्टॅन्ड वरून मिळाली. जर तुम्हाला Beed to Chiplun Bus Timetable पाहण्यासाठी या लिंक वर click करून पाहू शकता.

बीड बस स्टॅन्ड तसं बघायला गेला तर मी जेव्हा हा प्रवास केला होता तेव्हा बीड बस स्टॅन्ड ची स्थिती फार खराब होती पाऊस पडल्यामुळे बीज बीड बस स्टँडवर भरपूर चिखल चा त्रास झाला तसंच बीड बस स्टँड जो बांधकाम आहे तो फार जुना आहे.

माझ्या गाडीचा जो मार्ग होता तो जामखेड, कर्जत भिगवन, बारामती, फलटण आणि सातारा अशाप्रकारे होता.

ज्या गाडीने प्रवास केला त्या गाडीचा नंबर होता MH 08 AP 6126होता.

अशी जी लांब पल्याची  गाडी असते ती नेहमी रिझर्वेशन गाडी असते. सकाळी 7:00 वाजता सुटणारी ही बीड वरून जी गाडी आहे ती संध्याकाळी 8:00 वाजता चिपळूण या ठिकाणी पोहोचते असा या गाडीचा वेळ आहे.

Beed to Chiplun Distance

Beed to Chiplun Distance

Beed To Chiplun  हा मार्गावरचा जो प्रवासाचा अंतर आहे तो जवळपास 580 किलोमीटर असून या प्रवासाला कमीत कमी 15 तासाचा वेळ लागतो.

तर मित्रांनो चला सुरू करूया आपला हा प्रवास.बरोबर सकाळी 7:30 वाजता माझी गाडी बीड बस स्टँड वरून सुटली. तसेच मार्गावर लागणारे लहान छोटे गाव जसे तळेगाव या गावावरून होत धावायला सुरू होते.

Beed To Chiplun MSRTC Bus Ticket Price

Beed To Chiplun  ह्या मार्गावरचा तिकीटचा दर 630 रुपये अशाप्रकारे आहे.

ह्या प्रवासात लहान मोठे गाव जसे की नायगाव या गावावरून होत पुढे माझी बस धावायला सुरू करते.

44 किलोमीटरचा अंतर पार केल्यानंतर आता माझी गाडी आली होती पाटोदा बस स्टँडला  सकाळी 8:51 वाजता. हा पाटोदा आपल्या Beed To Chiplun  या मार्गावरचा पहिला टप्पा होता. पाटोदा बस स्टँड तसं बघायला गेलं तर बीड विभाग अंतर्गत येणारा एक छोटासा बस स्टँड आहे.

बस स्टँड सोडल्यानंतर पुढचा जो टप्पा होता तो जामखेड अशाप्रकारे होता. खेड्यापाड्यातून फार खराब परिस्थिती असणाऱ्या रस्त्यावरून चालत सौताडा या गावावरून होत जामखेड या बस स्टँड वरती सकाळी 9:50 वाजता आपल्या या मार्गावरचा दुसरा टप्पा येथे पोहोचते.

बीड ते जामखेड चा जो माझा आंतर जवळपास 72 किलोमीटरचा मी पार केलेला होता. जामखेड बस स्टँड अहमदनगर ह्या विभागाअंतर्गत मोडतो.

बीड ते जामखेड या मार्गावर माझी जी गाडी गावातून होणाऱ्या कच्चा रस्त्यावरून आतापर्यंत धावली होती तसेच जामखेड बस स्टँडवरून आता माझी गाडी हायवेवर धावायला लागली होती.

बराच काळ धावल्यानंतर माझी गाडी अरणगाव या ठिकाणावरून होत पुढे माहीजळगाव असा हा गावावरून होत माझ्या गाडीच्या बोर्डावर असणारा एक अहमदनगर विभागात येणारा ठिकाण म्हणजे कर्जत बस स्टॅन्ड ला पोहोचते.

इथून पुढे कर्जत बस स्टँड सोडल्यानंतर कोळवाडी आणि राशीन ह्या गावावरून होत आकोणी येते भिगवन राशिन हायवेच्या कडेला लागणारा हॉटेल बिंद्रावन या ठिकाणी जेवणासाठी 11:52 वाजता थांबली.

ज्या ठिकाणी जेवणासाठी माझी बस थांबली होती तिथून भिगवन फक्त 19 किलोमीटरच्या अंतरावर होता .

जवळजवळ 20 मिनिटं जेवण्यासाठी थांबल्यानंतर माझी MSRTC Bus प्रवासात पुढचा टप्पा गाठण्यासाठी धावायला सुरू करताना खेड या गावावरून होत पुढे दोन्ही बाजूला शेती असणाऱ्या ग्रामीण विभागातून होता राजेगाव येथे भीमा नदीच्या पुलावरून सावकाशपणे चालवत रस्त्याच्या कडेला असणारा भिगवन मदनवाडी बस स्टँड येथे दुपारच्या 12:52 वाजता पोहोचते.

अशाच प्रकारे वेळोवेळी पुढचा टप्पा घेत शेठफळगडे ह्या गावावरून होत बारामती बस स्टॅन्ड ला दुपारी 2:00 वाजता पोहोचते.

बारामती बस स्टँड वरून आता 208 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.. बारामती ह्या बस स्टॅन्ड वर बस चालकांची बदली होते. दहा मिनिटं थांबल्यानंतर माझी गाडी पुढच्या प्रवासासाठी पळायला सुरू होते.

जसजसं माझी गाडी पुढे जात होती अशा प्रकारे सांगवी या गावावरून होत पुढे नीरा नदीच्य पूल ओलांडून बरच काळ धावल्यानंतर फलटण बस स्टॅन्ड ला दुपारी 2:44 वाजता पोहोचते.

फलटण बस स्टँड सोडल्या वर बाराच अंतर गाठल्यानंतर आदर्की बुद्रुक या ग्रामीण भागावरून होत पुढे हनुमंत वाडी,वाठार आणि देवूर या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग करत पुढे वडूज या ठिकाणावरून होत सातारा बस स्टॅन्ड ला संध्याकाळी 4:25 वाजता पोहोचते.

सातारा वरून चिपळूण साठी 123 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिलेला होता.

सातारा बस स्टँड सोडल्यानंतर माझी गाडी बराच काळ बेंगलोर पुणे एक्सप्रेस हायवे वर धावल्यानंतर उंब्रज या बस स्थानकात संध्याकाळी 5:10 वाजता पोहोचते.

उंब्रज हा हायवेच्या कडेला लागणारा फार छोटा बस स्टँड आहे इथून पुढे थोडाच काळ थांबल्यानंतर पुढचा टप्पा पार करण्यासाठी धावायला सुरू करताना घाटावर असणारा हा छोटासा गाव म्हणजे उरुळ या ठिकाणावरून होत तसेच घाट उतरल्यानंतर मल्हारपेठ या ठिकाणी थांबा घेत तसंच पुढे नवा रस्ता या गावावरून होत सातारा जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा तालुका पाटण बस स्टँड वर संध्याकाळी 5:45 वाजता पोहोचली.

पाटण बस स्टँड सोडल्यानंतर पुढचा जो टप्पा तो कोयना नगर मार्गे चिपळूण या ठिकाणी होता.

पाटण बस स्टॅन्ड सोडल्यानंतर मार्गावर लागणारा रासाटी हा गावावरून होत कोयनानगर बस स्टँड वर संध्याकाळी 6:40 च्या सुमारास पाच मिनिट चहापाणीसाठी थांबली.

कोयना नगर बस स्टँड पासून चिपळूण जवळजवळ 42 किलोमीटरचा अंतर राहिला होता तर हा जो परिसर आहे तो घाटावरचा ठिकाण असल्यामुळे एसटीला चढताना फार वेळ लागतो त्यामुळे 42 किलोमीटरचा अंतर गाठण्यासाठी माझी MSRTC Bus ला कमीत कमी दीड तास चा वेळ लागला. Beed To Chiplun  ह्या मार्गावर मला चिपळूण जवळ कुंभार्ली असे घाट बघायला मिळाले.

चिपळूणच्या दिशेने धावताना माझी बस वाटेत लागणारा सर्वात लांब आणि उंच असणारा कुंभरली घाटाचा अरुंद रस्त्यावर पुढे सरकत निघते. कुंभार्ली घाट चा जो नजारा आहे तो अतिशय सुंदर आणि बघण्यासारखा आहे. हाँ घाट उंच असल्यामुळे आपल्याला असं अनुभव येतो की आपण अक्षरशा ढगातून वाट काढत चाललो आहे.

कुंभार्ली घाट चडून पूर्ण झाल्यानंतर घाटाच्या पलीकडे एक गाव म्हणजे शिरगाव आणि खर्डी या दोन गावा पार केल्यानंतर माझी Beed To Chiplun MSRTC Bus आपल्या शेवटच्या ठिकाणी चिपळूण या बस स्टॅन्ड वर रात्री 8:00 वाजता पाहोचते.

Beed to Chiplun Final Destination

या Beed To Chiplun  मार्गावरील एकूण दहा मोठे मोठे बस स्टॅन्ड माझ्या समोर दिसले.

अशाप्रकारे माझा हा प्रवास मी पूर्ण केला जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर आपला मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद.

Leave a Comment