नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉगद्वारे Beed To Pune या मार्गावरील केलेला हा माझा प्रवास बद्दल माहिती देणार आहे.
ठरवल्याप्रमाणे मी अर्धा तास अगोदरच बीड बस स्टैंड वर येऊन माझ्या गाडीची वाट पाहत थांबलो होतो. तसं तर माझा गाडीचा जो वेळ होता तो 8:00 वाजता चा होता.
बीड बस स्टँड चा बांधकाम फार जुना आहे तसंच बीड बस स्टॅन्ड चा आतला परिसर आहे जसे की जमीन ती आता सुद्धा मातीची आहे. त्यामुळे धूळ आणि पावसाळ्याच्या काळात चिखलचा भरपूर त्रास प्रवासांना होतो.
हा बीड बस स्टॅन्ड वर MSRTC गाड्यांची येणाऱ्याने जाणाऱ्या गाड्यांची भरपूर वाहतूक असते.
Table of Contents
Beed to Pune Distance

Beed To Pune ह्या रस्त्यावरचा अंतर होता 420 किलोमीटर आहे.बरोबर सकाळी 8:15 वाजता माझी MSRTC Bus प्रवासासाठी सुरू होते.बीड बस स्टँड वरून पुढे माझे बस ग्रामीण भागामधून धावताना राजुरी नवगण या गावावरून होत पुढे धावायला सुरु करते.
अतिशय खराब परिस्थिती असणाऱ्या रस्त्यावरून धावल्यानंतर खोकरमोहा या गावावरून होत खेड्यापाड्यातून धावत बीड विभाग अंतर्गत येणारा हा शिरूर कासार बस स्टॅन्ड येथे सकाळी 9:26 वाजता पोहोचते.
बराच काळ ग्रामीण विभागातून वाट काढत आता मी मानूर या गावावरून तसाच पुढे कारेगाव हा गाव करत इथून पुढे पुढचा टप्पा अहमदनगर विभाग अंतर्गत मोडणारा हा पाथर्डी बस स्टँड ला सकाळी 10:14 वाजता पोहोचलो. पाथर्डी हा माझ्या ह्या Beed To Pune मार्गावरील दुसरा टप्पा होता.
आतापर्यंत बीड पासून पाथर्डी पर्यंत 75 किलोमीटर चा अंतर पार केला होता.पाथर्डी बस स्टँड सोडल्यानंतर बराच काळ धावता आता माझी बस तिसगाव या ठिकाणावरून होत तसेच पुढे करंजी वरून तामिनी ह्या ठिकाणी छोटासा घाट सेक्शन पार करत पुढे निघते.
बराच काळ डोंगर भागातून आणि घाटावरून धावत माझी बस आता सकाळी 11:37 वाजता अहमदनगर या बस स्टैंड वर पोहोचते.
अहमदनगर बस स्टँड पासून पुढे परत एकदा माझी बस नागपूर पुणे या हायवेवर धावायला सुरू करते. बराच अंतर गाठल्यानंतर आता माझी बस सुपा या ठिकाणावरून होत पुढे जेवणासाठी दुपारी 12:50 वाजता महामार्ग कडे असणारा एका हॉटेलवर थांबली.
जेवण झाल्यानंतर येथून पुढे माझी बस परत एकदा रस्त्यावर धावता शिरूर बस स्टॅन्ड येथे दुपारी 1:30 वाजता पोहोचली.
अशाप्रकारे परत एकदा शिरूर बस स्टॅन्ड सोडल्यानंतर माझी गाडी आता रस्त्यावर पुणे च्या दिशेने बराच काळ धावल्यानंतर संध्याकाळी 5:00 वाजता पुणे येथे स्वारगेट बस स्टँड वर पोहोचते.
Beed to Pune Final Destination
अशाप्रकारे माझा हा Beed To Pune MSRTC Bus द्वारे केलेला हा प्रवास पूर्ण झाला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना या ब्लॉगबद्दल कळवावे धन्यवाद.