नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये.आज मी तुम्हाला माझ्या Chandrapur To Sironcha ह्या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे. हा जो प्रवास झाला तो आंतरराज्य प्रवास होता.
नेहमीप्रमाणे मी सकाळी 5:32 वाजता Chandrapur Bus Stand वर लवकर पोहोचलो माझी Chandrapur To Sironcha ही सकाळी 7:00 वाजता सुटणारी MSRTC Bus पकडण्यासाठी. Chandrapur MSRTC Bus Timetable पाहण्यासाठी ह्या लिंक वर click करू शकता.
Table of Contents
Chandrapur To Sironcha Distance

ही गाडी चंद्रपूर विभाग तसेच चंद्रपूर आगारातली होती. चंद्रपूर हा महाराष्ट्रातला सर्वात महत्त्वाचा जिल्हा आहे कारण चंद्रपूर जिल्हा हा ताडोबा जंगल साठी खूप प्रसिद्ध आहे. Chandrapur to Sironcha पर्यंतचा अंतर जवळ जवळ 212 km आहे.चंद्रपूरला काळया सोन्याची भूमीचा दर्जा पण दिलेला आहे. त्यामुळे चंद्रपूर बस स्टॅन्ड हा महाराष्ट्रातल्या सर्व मोठे बस स्टँड मधला एक असा मोठा बस स्टँड आहे.
चंद्रपूर बस स्टॅन्ड चा बांधकाम नवीन असून सर्वात जास्त पीओपी ने केलेला बांधकाम केलेला दिसून येतो.
Chandrapur To Sironcha MSRTC Bus Ticket
माझा या MSRTC Bus चंद्रपूर ते सिरोंचा पर्यंतचा तिकीट दर 350 रुपये होता.माझी ही MSRTC Bus चा मार्ग चंद्रपूर बस स्टँड पासून राजुरा,मंचेरियल,असिफाबाद, आणि शेवटी सिरोंचा अशा प्रकारे होता.
माझी गाडी आता चंद्रपूर बस स्टॅन्ड मधून बाहेर पडताना चंद्रपूरच्या रस्त्यावरून वाट काढत चंद्रपूर शहरातून बाहेर पडत होती. चंद्रपूर मंचेरियल रस्त्यावरून बराच काळ धावल्यानंतर भिमकुंड वरोरा या ठिकाणी असणारा टोल नाका पार करत पुढचा टप्पा गाठायला सुरू करते.
टोल नाका पार केल्यानंतर बराच काळ धावता बल्लारपूर बस स्टँड वर सकाळी 7:37 वाजता पोहोचली.बल्लारशा अर्थात बल्लारपूर बस स्टॅन्ड सोडल्यानंतर आता माझी गाडी बल्लारपूर राजुरा ह्या हायवेवर धावत होती.
बरंच काळ या हायवेवर धावल्यानंतर आता माझी गाडी धुडवली इथे वर्धा नदीच्या पुलावरून सावकाशपणे पार करत होती. तसेच नदी पार केल्यानंतर राजुरा बामणी या उडान पुलावरून धावायला सुरू करत राजुरा बस स्टॅन्ड वर चंद्रपूर पासून 28 किलोमीटरचा अंतर घाटात सकाळी 7:54 वाजता पोहोचते.
राजुरा बस स्टॅन्ड इथून नंतर चा जो प्रवास तो आंतरराज्य प्रवास होता. राजुरा नंतर पुढचा टप्पा आसिफाबाद होता. शेजार चा राज्य तेलंगणा जवळ असल्याकारणाने तिथल्या गाड्या या राजुरा बस स्टैंड वर फार दिसायला मिळतील. राजुर या बस स्टँडवर एकूण सहा फलाट दिलेले आहेत.
राजुरा पासून आसिफाबाद हा 53 किलोमीटरचा अंतर होता. राजुरा बस स्टँड सोडल्यानंतर आता माझी बस जंगल भागात असणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडे पार करत रस्त्यावर धावत होती.
बराच काळ जंगल भागातून प्रवास करत वरुर रोड ह्या गावावरून होत लक्कडकोट हा ठिकाणावरून होत तेलंगणा राज्य येण्याच्या अगोदर सीमारेषेवर असणाऱ्या घाट चढत वर धावता गोइगाव या ठिकाणावरून सीमारेषा वर असलेला चेक पोस्ट पार करत तेलंगणा राज्यात शिरते.
अशाच प्रकारे बराच काळ धावल्यानंतर वानकिडी या गावावरून हायवे च्या कडे असणारा तेजापूर ह्या गावावरून होत तसेच तेलंगणा राज्यात असणारा असिफाबाद बस स्टॅन्ड वर सकाळी 9:00 वाजता पोहोचते.
पुढचा टप्पा मंचेरियल अशाप्रकारे होता.आसिफा बस स्टँड पासून मंचेरियल 66 किलोमीटरचा अंतर आहे.
बराच काळ धावत्या रब्बेना या गावावरून पुढे हायवेच्या कडे असणारा तंदूर या गावावरून होत तसेच धावल्यानंतर बेलमपल्ली या ठिकाणावरून येणारा टोल नाका पार करत मंदामरी या गावावरून होत सकाळी 10:15 वाजता मंचेरियल बस स्टैंड वर पोहोचली.
मंचेरियल बस स्टँड पासून 62 किलोमीटरच्या अंतरावर सिरोंचा हा गाव आहे.
मंचेरियल बस स्टँड पासून माझी MSRTC BUS पुढचा टप्पा गाठत बराच काळ धावल्यानंतर तेलंगणा राज्यात असणारा जयपूर या ठिकाणावरून होत भीमा राम या ठिकाणावरून घनघाट जंगली भागातून प्रवास करत किस्तमपेठ ह्या गावावरून होत तसेच चेन्नूर बस स्टॅन्ड या ठिकाणावरून पुढे परत एकदा रिकाम्या हायवेवर सुसाट वेगाने धावत परत एकदा तेलंगणा महाराष्ट्र सीमारेषा पार करत गडचिरोली विभाग अंतर्गत येणारा सिरोंचा बस स्टैंड वर दुपारी 12:00 वाजता पोहोचली.
Chandrapur To Sironcha Final Destination
अशाप्रकारे Chandrapur To Sironcha जवळ जवळ पाच तास प्रवास करत आणि तसेच कमीत कमी 212 किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण केला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद.