नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये माझा Chikhali to Mumbai या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.
माझा Chikhali to Mumbai हा आठ तासांचा प्रवास होता. बरोबर संध्याकाळी 4:30 वाजता माझी गाडी चिखली बस स्टँड वरून निघाली.Chikhali Bus Stand Timetable पाहण्यासाठी इथे click करा. चिखली बस स्टँडवर मला भरपूर गर्दी पाहायला मिळाली. ह्या बस स्टँडचा आवार खूप मोठा आहे.
Table of Contents
Chikhali to Mumbai MSRTC Bus Timetable
खाली तुम्हाला Chikhali to Mumbai Bus Timetable पाहायला मिळेल.चिखली ते मुंबई जाण्यासाठी सगळ्या गाड्या खाली दिलेल्या वेळानुसार निघतात.
| From | To | Timings | Routes |
| Chikhali | Mumbai | 16:00 | Buldhana, Ajantha, Fardapur, Pachora, Chalisgaon, Malegaon, Chandvad, Nashik Mahamarg, Shahapur, Bhiwandi, Kalyan Bypass, Thane CBS Khopat, Kurla Nehru Nagar, Sion, Dadar, Parel (Mumbai) (Mumbai) |
Chikhali To Mumbai Distance

चिखली पासून मुंबई चा अंतर 487 किलोमीटर आहे. चिखली शहरातून बाहेर पडल्यानंतर सिंगल रोडवर प्रवास करत केळवड या गावावरून होत तसेच पुढे बराच काळ प्रवास केल्यानंतर बुलढाणा बस स्टैंड वर संध्याकाळी 5:12 वाजता पोहोचली.बुलढाणा बस स्टँडवर प्रवाशांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली.चिखली बस स्टँड सारखाच हा बस स्टँड सुद्धा मोठा आणि महत्वाचा आहे.
ह्या गाडीचा मार्ग चिखली पासून बुलढाणा, अजंठा, चाळीसगाव, मालेगाव, नाशिक आणि तसेच शेवटी मुंबई अशा प्रकारे आहे. बुलढाणा बस स्टँड हा माझ्या मार्गावरील पहिला बस थांबा होता.सकाळी 6:00 वाजता ही गाडी पोहोचेल अशी अपेक्षित होती.
बुलढाणा बस स्टँड पासून माझी गाडी आपल्या प्रवासासाठी निघत असताना तेव्हा हायवे वर लागणारा वाढोना ह्या गावावरून होत धावडा तसेच थोडा अंतरावर असणारा शिवणा या गावावरून होत अजिंठा या ठिकाणावरून पुढे अजिंठा घाट पार करत फरदापुर जवळ असणारा Hotel K.P Park या ठिकाणी जेवणासाठी थांबा घेते.बुलढाणा नंतर रस्ते चांगले होते.
हा हॉटेल संभाजीनगर अजंठा या हायवेच्या बाजूला बांधलेला आहे. जेवण झाल्यानंतर माझी गाडी पुढच्या प्रवासासाठी सुरू होते. तसेच वाकोड या गावावरून होत पुढे गाडी 7:30 वाजता रस्त्यावर असणारा पहुर बस स्टॉप येथे थांबा घेत या ठिकाणावरून होत पुढे पाचोरा जामनेर या मार्गावर धावते.पहुर बस स्टॉप रस्त्याचा बाजूलाच आहे.
बराच काळ प्रवास करत शेंदुर्णी बस स्टॉप इथे थांबा घेत या ठिकाणावरून पुढे मलखेडा या ठिकाणावरून बराच काळ प्रवास करत पाचोरा बस स्टैंड वर रात्री 8:45 वाजता पोहोचली.
पाचोरा बस स्टँड पासून पुढे भडगाव येथे थांबा घेत या ठिकाणावरून पुढे काजगाव या गावावरून होत पातोंडा इथून पुढे चाळीसगाव बस स्टैंड वर रात्री 10:00 वाजता पोहोचली.काजगाव नंतर रस्ता थोडासा खराब होता.चाळीसगाव बस स्टॅन्डवर ह्या वेळी सुद्धा भरपूर गर्दी दिसली.आता मात्र माझी बस पूर्णपणे भरली होती.काही प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागला.
चाळीसगाव बस स्टॅन्ड सोडल्यानंतर बराच काळ धावत मालेगाव बस स्टैंड वर 11:15 वाजता पोहोचली.मालेगाव बस स्टैंड वर पण तसीच गर्दी दिसली.
मालेगाव बस स्टैंड वर दहा मिनिटांचा थांबा घेत इथून पुढे नाशिकच्या दिशेने माझी बस धावत होती.
माझी बस मुंबई आग्रा हायवेवर सुसाट वेगाने धावत होती. मालेगाव बस स्टैंड इथून पुढे रस्ता मस्त वाटला.तेव्हा हायवे वर लागणारा सौंदाना या ठिकाणावरून होत पुढे चांदवड इथून माझी बस आता पिंपळगाव बस स्टैंड वर रात्री 1:00 वाजता पोहोचली. पिंपळगाव बस स्टैंड वर ह्या गाडीचे चालक आणि वाहक ची बदली झाली. पिंपळगाव बस स्टँड पासून नाशिक 30 किलोमीटरचा अंतर आहे.
पिंपळगाव बस स्टॅन्ड वरून मुंबई अजून चार तास प्रवास शिल्लक राहिला होता. पिंपळगाव बस स्टँड सोडल्यानंतर पुढे पिंपळगाव टोल नाक्यावरून होत ओझर या ठिकाणावरून बराच अंतर पार केल्यानंतर नाशिक बस स्टैंड वर फ्लॅट क्रमांक एक वर रात्री 1:45 वाजता पोहोचली.नाशिक बस स्टैंड वर सुद्धा मला गर्दी दिसलीच. ह्या ठिकाणी बस थोड्या वेळेसाठी थांबा घेते.
नाशिक बस स्टँड वरून मुंबई हा 3:30 तासांचा प्रवास शिल्लक राहिला होता. इथून मुंबई सेंट्रल 178 किलोमीटरचा अंतर आहे. इथून पुढे थोड्याच अंतरावर असणारा नाशिक महामार्ग बस स्टँड थोड्या वेळासाठी थांबा घेत आपल्या पुढच्या प्रवासासाठी सुरू करते.
नाशिकच्या नंतर कसारा घाट पार करत चहापाणीसाठी रात्री 3:30 वाजता पंधरा मिनिटांसाठी थांबल्यानंतर आपल्या पुढचा टप्पा गाठण्यासाठी सुरू करते. फार झोप येत होती म्हणून थोडीशी चाह घ्याचा विचार झाला. 20 रुपये चहा चा चूप घेऊन मी आपला पुढचा टप्पा पार करण्यास तैयार झालो.
एक्सप्रेस हायवेवर धावत असताना शहापूर या ठिकाणावरून होत शहूर या ठिकाणावरून पुढे भिवंडी बस स्टैंड वर सकाळी 5:00 वाजता पोहोचली.
Chikhali To Mumbai Final Destination
भिवंडी बस स्टँड वरून पुढे धाऊ लागली.भिवंडी बस स्टँड सोडल्यानंतर रस्ते चांगल्याप्रकारे मस्त होते. उंच उंच बिल्डिंग पाहून मन अगदी अचंबित झाला होता.
इथून पुढे ठाणे तसेच मुलुंड ईस्ट नंतर कुर्ला नंतर परळ आणि शेवटी मुंबई शहराच्या गजबजलेल्या ट्राफिक मधून होत माझी बस मुंबई सेंट्रल बस स्टॅन्ड वर सकाळी 6:30 वाजता पोहोचली.ठाणे पार होत होता तेव्हा दिवस पूर्णपणे उजाडला होता.आता मात्र रस्ता स्पष्टपणे दिसू लागली होते.
- वेळ: संध्याकाळी 4:30
- मार्ग :Buldhana, Ajantha, Fardapur, Pachora, Chalisgaon, Malegaon, Chandvad, Nashik Mahamarg, Shahapur, Bhiwandi, Kalyan Bypass, Thane CBS Khopat, Kurla Nehru Nagar, Sion, Dadar, Parel (Mumbai) (Mumbai)
- कालावधी :12 Hours
- तिकीट : 1200 रुपये
अशा प्रकारे माझा चिखली ते मुंबई चा प्रवास झाला.जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर धन्यवाद.
FAQs
How Much Is Chikhali to Mumbai Msrtc Bus Ticket Price?
Rs.1200
How Long Does It Take To Drive From Chikhali to Mumbai?
12 Hours