Chikhali To Shirdi Bus Journey

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी माझ्या ब्लॉगमध्ये माझा Chikhali To Shirdi या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.

चिखली बस स्टँड हे बुलढाणा विभागाअंतर्गत मोडतो. चिखली बस स्टॅन्ड वरून शिर्डी जाण्यासाठी सकाळी 6:00 वाजता बस असते. शिर्डी जाण्यासाठी माझी बस फ्लॅट क्रमांक 2 वर लागली होती. माझ्या गाडीचा नंबर होता MH 20 GC 2897.

माझ्या गाडीचा मार्ग चिखली पासून जालना, छत्रपती संभाजी नगर, श्रीरामपूर आणि शेवटी शिर्डी अशा प्रकारे होता.तर आता माझी बस चिखली बस स्टँड वरून बरोबर सहा वाजता सुटली होती.

Chikhali To Shirdi Distance

Chikhali To Shirdi

चिखली पासून शिर्डी चा जो अंतर ते 270 किलोमीटर अशाप्रकारे होता. आता माझी बस नागपूर ते छत्रपती संभाजी नगर हायवे वरून धावत पांबुळवाडी इथून पुढे मुरादपूर तसेच मेरा खुर्द ह्या गावावरून होत बराच काळ प्रवास केल्यानंतर सर आंबा फाटा या ठिकाणावरून पुढे देऊळगाव मही इथून सिंदखेडराजा या ठिकाणी पूर्ण नदीवर बांधलेला पुलावरून धावत बराच अंतर गाठल्यानंतर म्हणजे चिखली बस स्टँड पासून 57 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आता देऊळगाव राजा बस स्टैंड वर सकाळी साडेसात वाजता पोहोचली.

देऊळगाव राजा बस स्टॅन्ड पासून पुढे आता जो येणारा ठिकाण होतात तो म्हणजे जालना कमीत कमी 30 किलोमीटरच्या अंतरावर स्थापित होता.ह्या मार्गावरील धावत भिवगाव या ठिकाणावरून पुढे वाघरूळ इथून बराच काळ प्रवास केल्यानंतर आता माझी बस जालना बस स्टैंड वर सकाळी आठ वाजता पोहोचल्यानंतर परत एकदा जालना छत्रपती संभाजी हायवेवरून धावायला लागली.

या हायवेवर धावत असताना बदनापूर या गावावरून होत तसेच पुढे वरुडी आणि शेकटा या दोन गावावरून पुढे दुधना नदी पार करत करमाड या गावावरून होत लाडगाव या ठिकाणी असणारा टोल नाका पार करत छत्रपती संभाजी नगर ते चिकलठाणा या हायवेवरून धावत छत्रपती संभाजी नगर सिडको बस स्टैंड वर सकाळी साडेनऊ वाजता पोहोचली.

येथून पुढे छत्रपती संभाजीनगर सेंट्रल बस स्टँडवर जेवणासाठी थांबा घेते. इथून पुढे नेवासा मार्गे श्रीरामपूर आणि शेवटी शिर्डी.

छत्रपती संभाजी नगर येथे दोन ठिकाणी Sambhaji Nagar Timetable दिलेले आहे एका वेळापत्रक मध्ये येणाऱ्या गाड्या आणि जाणाऱ्या गाड्यांचा वेळ तसेच दुसऱ्या वेळापत्रक मध्ये तिकीट दर बद्दल माहिती पुरवलेली आहे.

जवळजवळ अर्धा तास जेवणासाठी थांबल्यानंतर माझी गाडी आता पुढचा प्रवासासाठी तयार झाली इथून जवळजवळ 128 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिलेला होता.

छत्रपती संभाजी नगर अहमदनगर हायवे वरून प्रवास करत वाळूज या ठिकाणावरून पुढे केटी संगम जवळ असणारा टोल नाका पार करत तसेच लिंबे जळगाव या ठिकाणावरून होत तसेच ढोरेगाव इथून पुढे गोदावरी नदीवर बांधलेल्या पुलावरून प्रवास करत पुढे प्रवरासंगम या ठिकाणावरून बराच काळ प्रवास केल्यानंतर माझी बस नेवासा बस स्टैंड वर पोहोचल्यानंतर आपल्या पुढचा टप्पा गाठण्यासाठी वाटेत लागणारा प्रवरा नदीच्या पुलावरून प्रवास करत टाकळीभान या गावावरून होत श्रीरामपूर इथे फलट क्रमांक चार वर दुपारी 12:30 वाजता पोहोचली.

या मार्गावर मला लागणारे चार जिल्हे म्हणजे बुलढाणा,जालना, संभाजीनगर आणि अहमदनगर अशा प्रकारे होता.

येथून माझी MSRTC Bus बाबळेश्वर मार्गे पुढचा टप्पा म्हणजे शिर्डी हा ठिकाण गाठण्यासाठी सुरू केली. इथून शिर्डी 36 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिलेला होता.

श्रीरामपूर बस स्टॅन्ड सोडल्यानंतर आपल्या मार्गावरील लागणारा हा एक ठिकाण खंडाळा इथून पुढे ममदापूर तसेच बाबळेश्वर बस स्टैंड वर थोड्या काळासाठी थांबा घेत पुढे बराच काळ धावल्यानंतर राहता या ठिकाणावरून होत शेवटी शिर्डी बस स्टैंड वर दुपारी दीड वाजता पोहोचली.

Chikhali To Shirdi Final Destination

अशाप्रकारे माझा Chikhali To Shirdi चा प्रवास पूर्ण झाला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपला मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद.

Leave a Comment