नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगमध्ये माझा Dhule To Surat ह्या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.
Table of Contents
Dhule To Surat Distance

तर माझी गाडी धुले बस स्टँडवरून फलाट क्रमांक सहा इथून सकाळी 7:00 वाजता निघाली.बरोबर सात वाजता माझी बस धुळे बस स्टँड पासून आपल्या पुढचा प्रवासासाठी धावायला सुरू केली. ह्या गाडीचा मार्ग धुळे पासून साक्री, नवापूर, सोनगड आणि शेवटी सुरत अशाप्रकारे आहे.Dhule To Surat हा 248 किलोमीटरचा अंतर होता. हा अंतर गाठण्यासाठी कमीत कमी सहा तास कालावधी लागतो.
Dhule To Surat Ticket Price
Dhule To Surat ह्या बसने प्रवास केल्यावर तुम्हाला कमीत कमी 300 रुपये ची तिकीट खरेदी करावी लागली.ह्या मार्गावर धावत असताना माहींदळे ह्या गावावरून होत पुढे बराच अंतर प्रवास गेल्यानंतर मोराणे या गावावरून होत तसेच पुढे खेडे ह्या गावावरून होत आणि पुढे हायवेच्या खाली सर्विस रोड वरून आत मध्ये कुसुंबा या ठिकाणी थांबा घेतल्यानंतर परत एकदा हायवेवर धावू लागली.
कुसुंबा हा हायवेच्या खाली थोडासा आत मध्ये असणारा हा एक गाव आहे.त्याच्यानंतर पुढे नेर पांजरा नदीच्या पुलावरून प्रवास करत अक्कलपाडा मल्हार सागर तलाव इथून पुढचा टप्पा म्हणजे इच्छापुर या ठिकाणावरून होत शेवाळी नंतर माझी MSRTC Bus साक्री बस स्टैंड वर 8:40 वाजता पोहोचली.Dhule to Surat Bus Timetable पाहण्यसाठी ह्या लिंक वर click करा.
आतापर्यंत धुळे वरून साक्री कमीत कमी 52 किलोमीटरचा प्रवास झाला होता. साक्री बस स्टँडवरून 185 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. साक्री बस स्टँड वरून माझी बस हायवेवर धावत असताना घोडदे या ठिकाणावरून होत तसेच दहिवेल पुढे कोंडाईबारी इथे घाट आणि डोंगर भागातून होत पुढे विसरवाडी या ग्रामीण भागातून वाट काढत चिंचपाडा या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग पार करून आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी सुरू केली.
साक्री बस स्टॅन्ड वरून बराच अंतर पार केल्यानंतर आता माझी गाडी नवापूर बस स्टैंड वर सकाळी 10:30 वाजता पोहोचली.
नवापूर बस स्टँड पासून सुरत 121 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.नवापूर बस स्टँड नंतर सोनगड हा आपल्या मार्गावरचा तिसरा थांबा होता. नवापूर बस स्टॅन्ड हा नंदुरबार जिल्हा अंतर्गत मोडतो.
नवापूर शहरातून बाहेर पडताना माझी MSRTC Bus रंगवली नदीच्या जुन्या पुलावरून सावकाशपणे होत पुढे थोड्याच अंतरावर बेदकीपाडा या ठिकाणी असणारा आरटीओ चेक पोस्ट पार करून पुढे सोनगड जवळ असणारा हॉटेल योगेश इथे जेवणासाठी माझी बस 20 मिनिट थांबा घेते.
जेवण झाल्यानंतर माझी बसा आपल्या पुढच्या टप्पा म्हणजे सोनगड बस स्टॅन्ड गाठण्यासाठी धावायला सुरू करते. या ठिकाणावरून सुरत 97 किलोमीटरचा अंतर होता.
आतापर्यंत धुळे बस स्टँडवरून 130 किलोमीटरचा टप्पा पार केलेला होता.बराच अंतर प्रवास केल्यानंतर माझी बस आता सोनगड बस स्टैंड वर थांबा घेतल्यानंतर आपल्या पुढचा टप्पा पार करण्यासाठी परत एकदा धावली.
तेव्हा खंबाला येते मंडळ टोल प्लाजा पार करून पुढे व्यारा या ठिकाणावरून होत तसेच माणिक पोर इथून पुढे बारडोली जवळ असणारा मेंढोला नदीच्या वरून होत लिंबाळा चौक इथून पुढे बारडोली बस स्टैंड वर 1:00 वाजता पोहोचली.
इथून पुढे जो शेवटचा टप्पा होता तो म्हणजे सुरत हा ठिकाण गाठण्यासाठी माझी बस परत एकदा रस्त्यावर धावत जाते.
खडोदरा इथून पुढे सारोली या ठिकाणावरून होत एक तास प्रवास केल्यानंतर सहारा दरवाजा या ठिकाणावरून होत शेवटी सुरत बस स्टैंड वर दुपारी 2:00 वाजता पोहोचली
Dhule To Surat Final Destination
अशाप्रकारे माझा धुळे ते सुरत हा प्रवास पूर्ण झाला जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपला मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद.