नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉगद्वारे Panaji To Kurundwad ह्या मार्गावरील केलेला प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.
Table of Contents
Panaji To Kurundwad Distance

Panaji to Kurundwad चा अंतर जवळपास 216 kilometer आहे.ह्या गाडीचा मार्ग पणजी पासून मापसा, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, गगनबावडा, कोल्हापूर, जयसिंगपूर आणि नरसिंगवाडी तसेच कुरुंदवाड अशा प्रकारे होता.
Panaji To Kurundwad Ticket Price
पणजी कुरुंदवाड चा तिकीट दर जवळपास 415 रुपये अशाप्रकारे होता जे कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे.ह्या गाडीचा नंबर MH 14 BT 3782 अशाप्रकारे होता.
तर मित्रांनो बरोबर माझी गाडी आता 9:00 वाजता पणजी बस स्टॅन्ड वरून बाहेर पडल्यानंतर माझी बास आता धावत पणजी ते मांडवी नदीच्या पुलावरून प्रवास करत महापसा ह्या ठिकाणावरून होत पुढे महापसा बस स्टैंड वर पोहोचत परत एकदा धावत चापोरा नदीच्या पुलावरून प्रवास करत मुंबई गोवा हायवे वरून पुढे बराच काळ झाल्यानंतर महाराष्ट्र गोवा बॉर्डर पार करत मी आता पोहोचलो होतो बांधा बस स्टैंड वर सकाळी 10:00 वाजता.
इथून मुंबई गोवा हायवेवर धावत बांदा येथे तेरेखोल नदीच्या पुलावरून प्रवास करत इन्सुलि ह्या गावावरून होत माझी बस आता सावंतवाडी बस स्टैंड वर सकाळी 10:30 वाजता पोहोचली होती. पणजी ते सावंतवाडी हा जवळपास 61 किलोमीटरचा प्रवास माझा पूर्ण झाला होता.
इथून पुढे माझी बस आता भोम ह्या ठिकाणावरून होत तसेच झाराप नंतर मांडकोळी ह्या गावा करात पुढे माझी बस कुडाळ बस स्टँडवर बरोबर सकाळी 11:00 वाजता पोहोचली.
इथून पुढे 35 किलोमीटरच्या अंतरावर असणारा कणकवलीच्या दिशेने धावत हायवे लागत असणारा औरस बस स्टॅन्ड येथे सकाळी 11:30 वाजता पोहोचत पुढे कसाल बस स्टैंड वर थोड्या काळासाठी थांबा घेत परत एकदा हायवेवर धावत वागदे ह्या ठिकाणावरून होत तसेच कणकवली जवळ गड नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस आता कणकवली बस स्टैंड वर दुपारी 12:00 वाजता पोहोचली .
तिथून पुढे परत एकदा धावत नांदगाव ह्या ठिकाणावरून होत तसेच तळेरे बस स्टैंड वर थोडा काळासाठी थांबा घेत इथून पुढे कुणकेश्वर तळेवाडी हायवे वर धावत नरकरवाडी येथे रेल्वे क्रॉसिंग पार करत माझी बस आता वैभववाडी बस स्टँडवर दुपारी 1:15 वाजता पोहोचत पुढे जामदारवाडी ह्या ठिकाणावरून गगनबावडा घाट पार करत पुढे गगनबावडा बस स्टैंड वर जेवणासाठी दुपारी 2:00 वाजता थांबा करते.
इथून पुढे माझे बस आसळद इथून पुढे साळवण येथून नागदेववाडी कडे पंचगंगा नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस आता कोल्हापूर बस स्टैंड वर दुपारी 3:40 वाजता पोहोचली.
आतापर्यंत पणजी ते कोल्हापूर 226 किलोमीटरचा अंतर पार झाला होता. इथून पुढे कुरुंदवाड हा जवळपास 56 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिला होता ज्याला कमीत कमी दीड ते दोन तासांचा कालावधी लागला.
कोल्हापूर बस स्टँड वरून पुढे आता पंचगंगा नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस आता हातकणंगले बस स्टैंड वर पोहोचत पुढे जयसिंगपूर बस स्टैंड वर पोहोचली.
Panaji to Kurundwad Final Destination
जयसिंगपूर बस स्टँड वरून कुरुंदवाड हा जवळपास 15 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. इथून पुढे शिरोळ बस स्टैंड वर थांबा घेत पुढे नरसिंहवाडी बस स्टँडवर थोडा काळासाठी थांबल्यानंतर परत एकदा कुरुंदवाडच्या दिशेने धावत पंचगंगा नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस आता कुरुंदवाड बस स्टैंड वर संध्याकाळी 5:15 वाजता पोहोचली. कुरुंदवाड बस स्टँड हा कोल्हापूर विभाग अंतर्गत मोडतो.