नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये माझा Solapur To Amravati स्लीपर बस द्वारे ह्या मार्गावर केलेल्या प्रवासा बदल माहिती देणार आहे.
तर मित्रांनो Solapur Bus Stand वर बरोबर फलट क्रमांक 13 येथून माझी बस संध्याकाळी 5:40 वाजता आपल्या प्रवासाची सुरुवात केली. सोलापूर बस स्टँडला दोन बाजूला बस स्टँड दिलेल्या आहे.
Table of Contents
Solapur To Amravati Sleeper Bus Distance

ह्या गाडीचा मार्ग सोलापूर बस स्टँड पासून लातूर, अहमदपूर, नांदेड, कळमनुरी, हिंगोली, वाशिम, मंगळूरपीर, कारंजा आणि शेवटी अमरावती अशाप्रकारे होता.सोलापूर ते अमरावतीचा अंतर जवळ जवळ 550 km होता.
Solapur To Amravati MSRTC Bus Timetable
सोलापूर ते अमरावती जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात
| From | To | Timings | Routes |
| Solapur | Amravati | 17:40 (Sleeper Bus) | Latur, Ahmadpur, Nanded, Kalmanuri, Hingoli, Washim, Mangalurpir, Karanja |
सोलापूर शहरातून सोलापूर-तुळजापूर हायवेद्वारे बाहेर निघत पुढे तमलवाडी ह्या ठिकाणावरून थोड्याच अंतरावर असणारा टोल नाका पार करून बराच काळ हायवेवर धावता माझी बस तुळजापूर घाट पार करत शेवटी Tulajapur Bus Stand वर थोडा वेळ थांबा घेतल्यानंतर आपला पुढचा प्रवास गाठण्यासाठी हायवेवर धावू लागली.
तुळजापूर नागपूर हायवेवर धावत उजनी ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे औसा इथून पुढे बराच काळ धावल्यानंतर सोलापूर पासून लातूर पर्यंत 122 किलोमीटरचा अंतर प्रवास करत माझी बस लातूर बस स्टँडवर रात्री 8:30 वाजता पोहोचली.
Solapur To Amravati Sleeper Bus Ticket Fare
लातूर बस स्टँडवर दोन बस स्टॅन्ड आहेत. माझ्या ह्या प्रवासामध्ये Solapur To Amravati चा तिकीट दर जवळपास 1200 रुपये अशाप्रकारे होता.
Solapur To Amravati च्या दरम्यान तीन विभाग अंतर्गत धावली. ह्या विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशाप्रकारे होता.
इथून पुढे माझी बस आता अहमदपूर, लोहा, आणि आणि नांदेड अशाप्रकारे होता. इथून नांदेड जवळपास 130 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.
माझी बस लातूर नांदेड हायवेवर धावत चाकूर ह्या ठिकाणावरून होत पुढे शिरूर तासबंद येथे रात्री 10:00 वाजत जेवणासाठी थांबा घेते.
जवळपास 20 मिनिटं जेवणासाठी थांबा घेतल्यानंतर माझी बस आता हायवेवर परत एकदा धावू लागली. बराच काळ धावल्यानंतर माझी बस Ahmadpur Bus Stand वर रात्री 10:45 वाजता थोड्या काळासाठी थांबल्यानंतर पुढे आपला टप्पा गाठण्यासाठी हायवेवर धावते.
बराच काळ हवेवर धावत माझी बस Nanded Bus Stand वर 12:15 वाजता पोहोचली. इथून माझी गाडी आता कळमनुरी, हिंगोली आणि वाशिम च्या दिशेने धावू लागली.
नांदेड बस स्टँड वरून वाशिम जवळपास 132 किलोमीटरचा अंतर होता. सोलापूर पासून नांदेड बस स्टँड पर्यंत जवळपास 250 किलोमीटर अंतर पार केला होता.
नांदेड बस स्टँड वरून पुढे नांदेड हिंगोली हायवेवर धावत आखारा बाळापूर येथून होत रात्री 2:15 वाजता Kalamnuri Bus Stand वर माझी बस पोहोचली.
कळमनुरी बस स्टँड वरून पुढे कन्हेरगाव नंतर दुमका ह्या ठिकाणी टोल नाका पार करत Washim Bus Stand वर 4:00 वाजता पोहोचली.
वाशिम बस स्टॅन्ड वरून 130 किलोमीटरच्या अंतरावर अमरावती बस स्टॅन्ड स्थित आहे. इथून पुढे मंगळूरपीर, कारंजा च्या दिशेने माझी बस आता पुढचा टप्पा गाठण्य्साठी सुरू करते.
मराठवाडा विभागातून आता मी विदर्भ विभागात शिरलो होतो. वाशिम मंगरूळपीर हायवेवर धावत पारडी टाकमोर ह्या ठिकाणावरून पुढे सरसी फाटा कासोला हायवेवरून प्रवास करत शेलगाव इथून होत शेवटी Manglurpeer Bus Stand वर सकाळी 4:30 वाजता पोहोचत पुढे मंगळूर पीर कारंजा हायवेवर धावत शिवणी इथून पुढे Karanja Bus Stand वर सकाळी 5:00 वाजता पोहोचली.
इथून पुढे कामरगाव मार्गे 67 किलोमीटरच्या अंतरावर असणारा अमरावती बस स्टॅन्ड गाठण्यासाठी प्रवास करायला सुरू करते.
नागपूर-छत्रपती संभाजी नगर हायवेवर धावत पुढे खेर्डा तसेच कामरगाव नंतर लोणी नंतर अमरावती जवळ असणारा बडनेर तसेच पुढे अमरावती शहरामध्ये राज पेठ ह्या ठिकाणावरून होत जवळपास एक तासांचा प्रवास केल्यानंतर अमरावती बस स्टँड वर सकाळी 6:30 वाजता पोहोचली.
अशाप्रकारे 550 किलोमीटरचा प्रवास करत आणि तीन विभागातून होत माझी बस अमरावती बस स्टँडवर पोहोचली.
जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद.
FAQs
How Long Does It Take To Drive From Solapur To Amravati Sleeper Bus?
13-14 Hours
What Are The Boarding Points From Solapur To Amravati Sleeper Bus?
सोलापूर बस स्टँड पासून लातूर, अहमदपूर, नांदेड, कळमनुरी, हिंगोली, वाशिम, मंगळूरपीर, कारंजा आणि शेवटी अमरावती
How Much Is Solapur To Amravati Sleeper Bus Msrtc Bus Ticket Price?
1200 रुपये