How I Travelled From Solapur To Nashik By MSRTC

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉगद्वारे माझा Solapur To Nashik ह्या मार्गावरील केलेला प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.

Solapur To Nashik Distance

Solapur To Nashik Distance

Solapur To Nashik हा जवळपास 450 किलोमीटरचा अंतर होता. सोलापूर बस स्टॅन्ड ला दोन बाजू फलाट दिलेल्या आहेत. ह्या गाडीचा मार्ग सोलापूर पासून करमाळा, अहमदनगर, संगमनेर आणि नाशिक अशा प्रकारे होता.

तर मित्रांनो सोलापूर पासून फलट क्रमांक सात वरून बरोबर सकाळी 6:00 वाजता माझी गाडी येथून आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी प्रवासाला सुरू करते.

फलट क्रमांक सात वरून करमाळा, शिर्डी, संगमनेर, नाशिक, मालेगाव आणि धुळे ह्या मार्गावर जाणारे गाड्या सुटतात. ह्या गाडीमध्ये तुम्ही रिझर्वेशन सुद्धा करू शकता.

पुणे सोलापूर नॅशनल हायवे वर धावत सावळेश्वर टोल नाका पार करत पुढे वाडवळ ह्या ठिकाणी सीना नदीच्या पुलावरून प्रवास करत तसेच पुढे मोहोळ बस स्टैंड वर सकाळी 6:50 वाजता पोहोचली.

Solapur To Nashik Ticket Price

Solapur To Nashik चा तिकीट दर जवळपास 650 रुपये अशाप्रकारे होता जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची दाट शक्यता आहे.

बराच काळ हायवेवर धावत हिवरे ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे शेटफळ नंतर मोडनिंब बस स्टँडवर पोहोचत पुणे सोलापूर टोल नाका पार करत आता माझी गाडी टेंभुर्णी बस स्टैंड वर सकाळी 7:50 वाजता पोहोचली.

इथून पुढे माझी बस आता करमाळाच्या दिशेने अहमदनगर सोलापूर हायवेवर धावत बराच काळ प्रवास केल्यानंतर कंदर येथून पुढे जेऊर बस स्टैंड वर सकाळी 8:30 वाजता पोहोचली.

टेंभुर्णी बस स्टँड वरून पुढे परत एकदा हायवेवर धावत असताना देवळाली ह्या गावावरून होत तसेच पुढे करमाळा बस स्टैंड वर सकाळी 9:00 वाजता पोहोचली.

आतापर्यंत सोलापूर बस स्टँडवरून करमाळा जवळपास 140 किलोमीटरचा अंतर पार झाला होता. करमाळा बस स्टँडवरून अहमदनगर 98 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे.

करमाळा बस स्टँडवरून पुढे परत एकदा हायवेवर धावत चापडगाव नंतर पुढे महीजळगाव नंतर मिरजगाव बस स्टैंड वर सकाळी 10:10 वाजता पोहोचली.

मिरजगाव बस स्टँड वरून अहमदनगर दोन तासांच्या अंतरावर स्थित आहे. मिरजगाव बस स्टॅन्ड हा कर्जत तालुका तसेच अहमदनगर जिल्हा अंतर्गत मोडतो.

मिरजगाव बस स्टँडवरून परत एकदा पुढे धावत  घोगरगाव इथून अहमदनगर श्रीगोंदा हायवेवर धावत शेवटी माझी गाडी आता अहमदनगर मालीवाडा बस स्टैंड वर सकाळी 11:36 वाजता पोहोचत पुढे तारकपूर बस स्टैंड वर पोहोचली.

सोलापूर ते अहमदनगर 233 किलोमीटरचा अंतर पूर्ण झाला होता.

अहमदनगर बस स्टँड वरून पुढे आता राहुरी ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे मुळा नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस राहुरी बस स्टैंड वर पोहोचत पुढे कोल्हार ह्या ठिकाणावरून होत प्रवरा नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस आता कोल्हार बस स्टैंड वर थांबा घेत परत एकदा हायवेवर धावत लोणी बस स्टँडवर थांबा घेत तसेच पुढे निमगाव जाळी ह्या ठिकाणी दुपारी 2:15 वाजता हॉटेल शबरी इथे जवळपास 20 मिनिटं जेवणासाठी थांबा घेणे.

नाशिक ह्या ठिकाणावरून जवळपास 82 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. हा अंतर गाठण्यासाठी जवळपास अडीच तासांचा कालावधी लागला.

आता माझी बस कोकणगाव ह्या ठिकाणावरून होत पुढे संगमनेर बस स्टैंड वर दुपारी 3:10 वाजता पोहोचली.

Solapur To Nashik Final Destination

संगमनेर वरून माझी गाडी आता समृद्धी महामार्ग रोड इथून पुढे सिन्नर बस स्टँडवर दुपारी 4:00 वाजता पोहोचत पुढे परत एकदा हायवे वर धावत टोल नाका पार करत बराच काळ झाल्यानंतर आता माझी बस नाशिक महामार्ग बस स्टँड वर संध्याकाळी 5:00 वाजता पोहोचली.

अशाप्रकारे माझा Solapur To Nashik चा हा प्रवास पूर्ण झाला.

Leave a Comment