How To Travel From Amravati To Pandharpur By MSRTC

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये माझा Amravati To Pandharpur ह्या प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.

Amravati To Pandharpur ही गाडी रिझर्वेशन गाडी असते जर तुम्हाला ह्या मार्गावर प्रवास करायची इच्छा झाली तर तुम्ही रिझर्वेशन करून सुद्धा प्रवास करू शकता.

Amravati To Pandharpur Distance

Amravati To Pandharpur Distance

Amravati To Pandharpur हा जवळपास 550 किलोमीटरचा प्रवास होता. मी ज्या गाडीने प्रवास केला त्या गाडीचा नंबर MH 20 MH 3781.

ह्या बसचा मार्ग अमरावती ते कारंजा, लाड, वाशिम, हिंगोली, परभणी, गंगाखेड, आंबेजोगाई, बार्शी, कुर्डूवाडी आणि पंढरपूर अशा प्रकारे होता.

अमरावती पासून पंढरपूर हा रुपये तिकीट दर लागला जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची दाट शक्यता आहे.

तर बरोबर 5:30 वाजता माझी गाडी अमरावती बस स्टँड वरून बाहेर पडली आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी. अमरावती शहरातून बाहेर पडत असताना अमरावती शहरात अजून एक बस स्टँड राजापेठ बस स्टँड ह्या ठिकाणी 5:35 वाजता फलट क्रमांक तीन वर पोहोचली ह्याचा अर्थ ह्या दोन बस स्टँडच्या दरम्यान नुसतं पाच मिनिटांचा कालावधी लागतो.

राजापेठ अमरावती बस स्टँड वरून माझी बस बडनेरा बस स्टँडवर थोड्या काळासाठी थांबा घेत परत एकदा पुढे नागपूर छत्रपती संभाजी हायवे वर धावत कामरगाव इथून पुढे खेर्डा बुद्रुक तसेच पुढे कारंजा लाड बस स्टैंड वर संध्याकाळी 7:00 वाजता पोहोचली.

इथून पुढे माझी बस बराच काळ धावल्यानंतर शिवणी तिथून पुढे मंगळूरनाथ बस स्टैंड वर फ्लॅट क्रमांक पाचवर 7:45 वाजता पोहोचली.

येथून पुढे दस्तापुर ह्या ठिकाणावरून होत माझी बस आता वाशिम बस स्टैंड वर रात्री 8:30 वाजता पोहोचली. अमरावती पासून वाशिम बस स्टँड पर्यंत जवळजवळ 130 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता.

इथून पुढे माझी बस आता हिंगोली जिल्हा मध्ये प्रवास सुरू करते. वाशिम बस स्टँड वरून आता माझी बस हिंगोलीच्या दिशेने धावत चालली हा अंतर जवळपास 53 किलोमीटरचा अंतर आहे.

माझी बस आता वाशिम हिंगोली हायवेवर धावत राजगाव तिथून पुढे कन्हेरगाव ह्या ठिकाणी पेनगंगा नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे थोडाच अंतरावर हॉटेल राजधानी ढाबा ह्या ठिकाणी माझी बस जेवण्यासाठी रात्री 9:15 वाजता थांबा घेते.

ह्या ठिकाणावरून हिंगोली जवळपास 36 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. हा अंतर गाठण्य्साठी जवळपास एक तासांचा कालावधी लागला.

जेवण झाल्यानंतर जवळपास 15 ते 20 मिनिटं थांबा घेतल्यानंतर आता माझी बस परत एकदा हायवेवर धावत रात्री 10:15 वाजता हिंगोली बस स्टैंड वर थोड्या काळासाठी थांबा घेत परत एकदा आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी माझी बस आता हिंगोली परभणी हायवेवर धावत संदूक पिंपरी इथून पुढे येहाळेगाव ह्या ठिकाणावरून होत पुढे औंढा नागनाथ ह्या ठिकाणी रात्री 10:40 वाजता पोहोचत पुढे बराच काळ हायवेवर धावत माझी बस परभणी बस स्टैंड वर रात्री 11:45 वाजता पोहोचली.

परभणी बस स्टैंड वर ह्या गाडीचे चालक आणि वाहक दोघांची बदली झाली. आतापर्यंत अमरावती पासून परभणी 260 किलोमीटरचा अंतर पार झाला होता. इथून पुढे पंढरपूर 280 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करायचा शिल्लक राहिला होता.

इथून पुढे माझी बस आता गंगाखेड, आंबेजोगाई, बार्शी, कुर्डूवाडी आणि तसेच पंढरपूर च्या मार्गावर धावली.

परभणी बस स्टैंड वर गाडीचे चालक आणि वाहक झाल्यामुळे बराच काळ इथे परभणी बस स्टैंड वर गाडी थांबली होती. तब्बल अर्धा तास परभणी बस स्टॅन्ड वर माझी गाडी थांबल्यानंतर परत एकदा पुढचा प्रवास गाठण्यासाठी परभणी गंगाखेड हायवे वर धावत पुढे दैठणा ह्या ठिकाणावरून होत तसेच रात्री 1:15 वाजता गंगाखेड बस स्टैंड वर पोहोचत तसेच पुढे परळी वैजनाथ ह्या ठिकाणी रात्री 2:00 वाजता पोहोचत बराच काळ धावल्यानंतर माझी बस आता आंबेजोगाई बस स्टैंड वर रात्री 2:30 वाजता पोहोचली.

आंबेजोगाई बस स्टँड हा बीड जिल्हा अंतर्गत मोडतो. इथून पुढे माझी बस परत एकदा आंबेजोगाई कळंब हायवेवर धावत पुढे कळंब ह्या ठिकाणी रात्री 3:30 वाजता पोहोचली.

Amravati To Pandharpur Final Destination

बराच काळ हायवेवर धावत माझी बस आता बार्शी बस स्टैंड वर सकाळी 4:30 वाजता पोहोचत पुढचा टप्पा गाठण्यासाठी परत एकदा बार्शी कुर्डूवाडी हायवे वर धावत माझी बस सकाळी 5:30 वाजता कुर्डूवाडी बस स्टैंड वर पोहोचत पुढे कुर्डूवाडी पंढरपूर हायवे वरून धावत शेटफळ ह्या ठिकाणावरून होत तसेच आष्टी इथून पुढे पंढरपूर जवळ चंद्रभागा नदीच्या पुलावरून प्रवास करत सकाळी 6:30 वाजता पोहोचली.

अशाप्रकारे अमरावती पासून पंढरपूर हा 13 तासांचा तसेच 400 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता.

Leave a Comment