नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉग मध्ये Dharashiv To Panaji ह्या मार्गावरील केलेला प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.
तर नेहमीप्रमाणे मी अर्धा तास अगोदरच Dharashiv Bus Stand वर पोहोचलो होतो कारण माझी बस दुपारी 4:00 वाजता ची होती.
मी ज्या गाडीने प्रवास केला ते हिरकणी गाडी होती. ह्या गाडीचा नंबर MH 14 LB 7459 होता.
Table of Contents
Dharashiv To Panaji Distance

Dharashiv To Panaji चा अंतर जवळपास 530 किलोमीटरचा होता.ह्या गाडीचा मार्ग धाराशिव पासून तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, सांगली, कोल्हापूर, राधानगरी, फोंडा घाट, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि शेवटी पणजी अशाप्रकारे होता.
Dharashiv To Panaji MSRTC Bus Timetable
धाराशिव ते पणजी जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात
| From | To | Timings | Routes |
| Dharashiv (Usmanabad) | Panjim(Goa) | 16:00:00 (Semi Luxury) | Tuljapur, Solapur, Mohol, Pandharpur, Sangola, Miraj, Sangli, Jaysingpur, Hatkanangale, Kolhapur Bus Stand, Radhanagari, Fonda, Kankavali, Oras, Kudal, Sawantwadi, Banda, Doda Marg Mapusa |
तर बरोबर चार वाजता माझी गाडी ह्या ठिकाणावरून आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी सुरू झाली. तर जवळपास पाऊण तासांचा प्रवास करत मी आता पोहोचलो होतो Tuljapur Bus Stand वर दुपारी 4:45 वाजता.
ह्याच प्रकारे जवळपास एक तासांचा प्रवास करत मी आता तुळजापूर बस स्टॅन्ड वरून सोलापूर बस स्टैंड वर 5:40 वाजता पोहोचलो.
Dharashiv To Panaji Ticket Price
Dharashiv To Panaji ऑनलाईन बुकिंग द्वारे तिकीट दर 1120 होता जे कालांतराने कमी किंवा जास्त होऊ शकतं.
Solapur Bus Stand वरून बरोबर 6:00 वाजता माझी बस जवळपास पंधरा मिनिटं थांबा घेतल्यानंतर पुढचा टप्पा गाठण्यासाठी परत एकदा धावू लागते.
इथून पुढे आता माझी बस मोहोळ पंढरपूरच्या दिशेने धावू लागते. बराच काळ हायवेवर धावत माझी बस आता हायवे लगत असणारा Mohol Bus Stand वर संध्याकाळी 6:45 वाजता पोहोचली
इथून पुढे परत एकदा माझी बस हायवेवर धावू लागली. बराच काळ हवेवर धावत आता माझी बस चंद्रभागा नदीच्या पुलावरून होत Pandharpur Bus Stand वर 7:30 वाजता फलट क्रमांक 26 वर पोहोचली.
फलट क्रमांक 26 वरून जाणाऱ्या गाड्या पणजी, वेंगुर्ला, राजापूर, कुडाळ, देवरुख ह्या सगळ्या मार्गावर धावतात.
पंढरपूर बस स्टँडवरून आता माझी बस परत एकदा जाऊ लागली अशाच प्रकारे धावत आता माझी बस Sangola Bus Stand वर रात्री 8:30 वाजता पोहोचत पुढे हायवेवर बराच काळ धावल्यानंतर जेवण्यासाठी नागज फाटा ह्या ठिकाणी जेवणासाठी सुनील ढाबा येथे 9:30 वाजता थांबा घेते.
ह्या ठिकाणावरून कोल्हापूर जवळपास 100 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. जवळपास 20 मिनिटं थांबा घेतल्यानंतर माझी बस परत एकदा हायवेवर धावू लागली.
बराच काळ हायवेवर धावल्यानंतर माझी बस आता मिरज शहरात प्रवेश करत Miraj Bus Stand वर रात्री 10:45 वाजता पोहोचली इथून पुढे माझी बस आता कोल्हापूरच्या दिशेने धावत शेवटी कोल्हापूर बस स्टैंड वर 12:15 वाजता पोहोचली.
Kolhapur Bus Stand हा कोल्हापूर विभाग तसेच कोल्हापूर आगार अंतर्गत मोडतो.
ह्या रूटवर आतापर्यंत जेवढे विभाग कव्हर केले ते होते धाराशिव विभाग, सोलापूर विभाग, सांगली विभाग आणि आता कोल्हापूर विभाग अशा प्रकारे होते.
कोल्हापूर ह्या ठिकाणी माझ्या गाडीचे चालक आणि वाहक ची बदली झाली.कोल्हापूर बस स्टँडवरून आता पुढचा स्टॉप Radhanagari Bus Stand होता जे जवळपास 50 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.
कोल्हापूर राधानगरी हायवेवर धावत आता माझी बस हलदी ह्या ठिकाणावरून होत राधानगरी बस स्टैंड वर रात्री 2:00 वाजता पोहोचली.
इथून पुढे माझी बस हायवेवर कणकवलीच्या दिशेने धावत Kanakavali Bus Stand वर रात्री 3:30 वाजता पोहोचली.
Kanakavali Bus Stand वर एकूण आठ फलट दिलेले आहेत. इथून पुढे माझी बस आता कुडाळ सावंतवाडीच्या दिशेने धावू लागली.
कणकवली बस स्टँड हा सिंधुदुर्ग विभाग अंतर्गत मोडतो.मुंबई गोवा हायवेवर धावत माझे बस आता कसाल ह्या ठिकाणावरून होत पुढे Kudal Bus Stand वर सकाळी 4:30 वाजता पोहोचली.
इथून पुढे माझी बस आता पुढचा टप्पा गाठण्यासाठी परत एकदा रवाना झाली.कुंडाळ बांधा रस्त्यावर धावत मी आता Sawantwadi Bus Stand वर सकाळी 4:40 वाजता पोहोचली.
इथून पणजी जवळपास 58 किलोमीटरचा अंतरावर स्थित आहे. सावंतवाडी ह्या ठिकाणी मोती तलावाच्या कडून होत माझी बस बांदा ह्या ठिकाणावरून होत पुढे आसोनोरा इथे सकाळी 5:45 वाजता पोहोचत पुढे महापासा ह्या ठिकाणावरून होत नंतर अटल सेतू पुलावरून प्रवास करत तसेच पुढे मांडवी नदीच्या पुलावरून होत शेवटी सकाळी 6:30 वाजता Panaji Bus Stand वर पोहोचली.
अशाप्रकारे जवळजवळ 15 तासांचा प्रवास करत Dharashiv To Panaji चा हा प्रवास पूर्ण झाला.
FAQs
How Much Is Dharashiv To Panaji Msrtc Bus Ticket Price?
Rupees 1120
What Is Dharashiv To Panaji Distance By Road?
530 किलोमीटर
What Are The Boarding Points From Dharashiv To Panaji?
धाराशिव पासून तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, सांगली, कोल्हापूर, राधानगरी, फोंडा घाट, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि शेवटी पणजी