नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉग मध्ये Ganagapur To Shirdi पर्यंत केलेला जे प्रवास आहे ह्या च्याबद्दल माहिती देणार आहे.
गाणगापूर हा कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्हा अंतर्गत आढळणारा एक तीर्थ ठिकाण आहे.ज्या गाडीने मी प्रवास केला त्याचा नंबर होता MH 14 MH 0340.
ह्या गाडीचा मार्ग गाणगापूर पासून अक्कलकोट नंतर सोलापूर नंतर करमाळा नंतर अहमदनगर आणि शेवटी शिर्डी अशा प्रकारे आहे.
Ganagapur To Shirdi MSRTC Bus Timetable
गणगापूर ते शिर्डी जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात
| From | To | Timings | Routes |
| Ganagapur | Shirdi | 6:00 | Akkalkot,Solapur,Karmala,Ahmednagar |
Table of Contents
Ganagapur To Shirdi Ticket Price
माझी गाडी बरोबर सकाळी 6:00 वाजता Ganagapur Bus Stand वरून आपला प्रवास गाठण्यासाठी निघाली. ही गाडी कोपरगाव आगारातले आहे.गाणगापूर ते शिर्डीचा तिकीट दर 815 रुपये आहे.
गाणगापूर वरून आता माझी बस Sindagi Kalburgi Highway वर धावत Afzalpur Bus Stand वर सकाळी 6: 37 वाजता पोहोचली. Afzalpur Bus Stand हा माझ्या मार्गावरील पहिला टप्पा होता.Afzalpur Bus Stand हा कर्नाटक राज्य अंतर्गत मोडतो.
Afzalpur Bus Stand वरून पुढे हवेवर धावत दुधनी ह्या ठिकाणावरून होत Akkalkot Bus Stand वर सकाळी 7:45 वाजता पोहोचली.Akkalkot Bus Stand हा सोलापूर जिल्हा अंतर्गत मोडतो.
Ganagapur To Shirdi Distance By Bus

Ganagapur To Shirdi चा अंतर जवळपास पाचशे किलोमीटर आहे. Akkalkot Bus Stand वरून बाहेर पडत माझी बस आता अक्कलकोट सोलापूर हायवेवर बराच काळ धावत Solapur Bus Stand वर सकाळी 8:45 वाजता गाणगापूर पासून सोलापूर पर्यंत 115 किलोमीटरचा अंतर गाठत ह्या ठिकाणी पोहोचली होती.हा 115 km चा अंतर गाठण्यासाठी मला जवळपास साडेतीन तासांचा कालावधी लागला.
सोलापूर बस स्टॅन्ड ला दोन भाग केलेले आहे एक मध्यवर्ती बस आणि दुसरा म्हणजे सोलापूर मराठवाडा बस स्टॅन्ड.ह्या दोन्ही बस स्टँडवरून वेगवेगळ्या बसेस सुटतात.
सोलापूर बस स्टँडवरून पुढे आता माझी बस टेंभुर्णी आणि मोहोळच्या दिशेने धावू लागली. सोलापूर ते टेंभुर्णी चा अंतर जवळपास 87 किलोमीटरचा अंतर आहे.
सोलापूर पुणे हवेवर धावत असताना लांबोटी ह्या ठिकाणावरून पुढे होत मोहोळ बस स्टैंड वर सकाळी 9:30 वाजता थोड्या काळासाठी थांबा घेतल्यानंतर आपल्या पुढचा प्रवासासाठी परत एकदा हवेवर धावत Tembhurni Bus Stand वर 10:30 वाजता पोहोचली.
इथून पुढे माझी बस आता कंदर, जेऊर आणि करमाळा ह्या दिशेने धावत जाते. करमाळा हा ह्या ठिकाणापासून 47 किलोमीटरचा अंतर आहे.
सोलापूर अहिल्यानगर हायवेवर धावत माझी बस कंदर ह्या ठिकाणावरून होत पुढे जेऊर बस स्टैंड वर सकाळी 11:15 वाजता एक छोटासा थांबा घेत परत एकदा आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी हायवेवर धावत Karmala Bus Stand वर 11:30 वाजता पाहोचली.
माझ्या मार्गावरील करमाळा बस स्टँड हा जेवणासाठी अधिकृत थांबा दिलेला होता.करमाळा बस स्टँड वरून आता माझी गाडी अहमदनगर च्या दिशेने बराच काळ धावत Mirajgaon Bus Stand वर 1:00 वाजता थांबा घेत आपल्या पुढच्या टप्पा गाठण्य्साठी परत एकदा माझी बस हायवेवर धावत Ahmednagar Maliwada Bus Stand वर दुपारी 2:00 वाजता पोहोचली.
मालीवाडा बस स्टँड वरून माझी बस Tarakpur Bus Stand वर 2:30 वाजता फलट क्रमांक 10 वर पोहोचली.
इथून शिर्डी पर्यंतचा जो अंतर होता ते जवळपास 85 किलोमीटरचा शिल्लक राहिला होता.
माळीवाडा बस स्टँड वरून पुढे माझी बस अहिल्यानगर मनमाड हायवेवर धावत Rahuri Bus Stand वर दुपारी 3:30 वाजता पोहोचल्यानंतर आपल्या पुढचा प्रवासासाठी धावत बाबळेश्वर बस स्टँडवर दुपारी 4:00 वाजता पोहोचली.
बाबळेश्वर बस स्टँडवरून जवळपास अर्धा तासांचा प्रवास करत Rahata Bus Stand वर दुपारी 4:30 वाजता पोहोचली.
इथून पुढे माझी बस आता धावत Shirdi Bus Stand वर 4:37 वाजता फलाट क्रमांक सातवर पोहोचली.
Ganagapur To Shirdi Final Destination
अशाप्रकारे माझा गणगापूर ते शिर्डी चा बारा तासांचा प्रवास पूर्ण झाला. ह्या मार्गावरील कर्नाटकातील कलबुर्गी तसेच महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर अशाप्रकारे तीन जिल्हे ह्या मार्गावर बघायला मिळाले.
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ह्या च्याबद्दल मला माहिती द्या आणि कमेंट मध्ये सांगा धन्यवाद.
FAQs
How Much Is Ganagapur To Shirdi Msrtc Bus Ticket Price?
815 रुपये
What Are The Boarding Points From Ganagapur To Shirdi?
अक्कलकोट नंतर सोलापूर नंतर करमाळा नंतर अहमदनगर आणि शेवटी शिर्डी
How Much Time Does It Take To Travel From Ganagapur To Shirdi?
12 Hours