नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे माझा Jath To Hingoli ह्या मार्गावरील केलेल्या प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.
तर मित्रांनो नेहमीप्रमाणे मी माझ्या प्रवास सुरू करण्यासाठी कुठलाही बस स्टैंड वर अर्धा तास अगोदरच येऊन थांबतो जेणेकरून माझी बस चुकण्याची शक्यता कमी होते.
या गाडीचा मार्ग जत पासून चढचण, सोलापूर, लातूर, परळी वैजनाथ, परभणी आणि हिंगोली अशा प्रकारे होता.
ही गाडी सांगली विभागाचे आणि जत आगाराची आहे. या गाडीचा नंबर MH 10 DT 3308 अशाप्रकारे होता.
Table of Contents
Jath To Hingoli Distance

Jath To Hingoli चा अंतर जवळपास 500 किलोमीटरचा आहे. तर मित्रांनो बरोबर सकाळी 8:00 वाजता पलट क्रमांक तीन वरून माझी बस आपल्या प्रवासासाठी सुरुवात करते.
जत चडचण हा ग्रामीण रस्त्यावरून प्रवास करत पुढे वळसंग या गावावरून होत तसेच सरडी रस्त्यावरून होत पुढे सोरडी गावांमधून वाट काढत गुड्डापूर नंतर माडग्याळ येथून पुढे उटगी नंतर उमदी नंतर कर्नाटक राज्य च्या सीमा रेषांमध्ये प्रवास करत चडचण बस स्टैंड वर सकाळी 9:45 वाजता पोहोचली.
आतापर्यंत जवळजवळ जत बस स्टँडवरून 65 किलोमीटरचा प्रवास करत चडचण बस स्टैंड वर पोहोचलो होतो.चढचण बस स्टॅन्ड ला एकूण सहा फलट दिलेले आहेत.
Jath To Hingoli Ticket Price
Jath To Hingoli चा MSRTC द्वारे तिकीट भाडा ये 720 रुपये होता जे कालांतराने कमी किंवा जास्त होणे शक्यता आहे.
जळकी हायवे वरून धावत पुढे बरडोल नंतर लोणी बुद्रुक नंतर एलगी या गावावरून होत पुढे विजयपूर सोलापूर हायवेवरून प्रवास करत धूळखेड नंतर भीमा नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे 10:44 वाजता नाश्त्यासाठी थांबली. या ठिकाणावरून सोलापूर 30 किलोमीटर चा अंतर आहे. हा हॉटेल सोलापूर विजापूर हायवे च्या लगत तुम्हाला बघायला मिळेल.
महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट पार करत माझी बस सोलापूर बस स्टैंड वर फलाट क्रमांक 11 वर दुपारी 12:00 वाजता पोहोचली.
सोलापूर ते लातूर हा बरोबर 125 किलोमीटरचा अंतर आहे. सोलापूर बस स्टँड वरून माझी बस सोलापूर तुळजापूर हायवे वरून प्रवास करत तामलवाडी या ठिकाणावरून होत मालुंब्रा नंतर बराच काळ प्रवास करत तुळजापूर घाट पार करत माझी बस आता तुळजापूर बस स्टैंड वर दुपारी 1:15 वाजता पोहोचली.
पुढे पाचुंदा तलावाकडून होत परत एकदा तुळजापूर हायवेवरून प्रवास करत करजखेडा नंतर पुढे हायवे लगत असणारा शिवभाग्य हॉटेल इथे जेवणासाठी दुपारी 1:50 वाजता थांबली.
या ठिकाणावरून उजनी 53 किलोमीटरचा अंतरावर स्थित आहे. इथून पुढे बेलकुंड नंतर उजनी बस स्टँडवर दुपारी 2:52 वाजता पोहोचत लातूर बस स्टैंड फलाट क्रमांक दोन वर दुपारी 3:30 वाजता पोहोचली. लातूर बस स्टॅन्ड ला एकूण 12 फ्लॅट दिलेले आहेत.
लातूर बसून वरून हिंगोली हा जवळजवळ 200 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिला होता.
इथून पुढे लातूर आंबेजोगाई हायवे वरून प्रवास करत मांजरा नदीच्या पुलावरून होत तसेच पुढे रेनापुर नंतर सायगाव नंतर बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई बस स्टैंड वर दुपारी 4:50 वाजता पोहोचली.
इथून पुढे गंगाखेड आणि परभणीच्या दिशेने परळी आंबेजोगाई हायवे वरून धावत पुढे परळी वैजनाथ बस स्टैंड वर संध्याकाळी 5:30 वाजता पोहोचली.
बराच काळ हायवेवर धावत गंगाखेड बस स्टैंड वर संध्याकाळी 6:30 वाजता पोहोचली.गंगाखेड ते हिंगोली हा जवळपास 100 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.
पुढे दुसळगाव या ठिकाणी गोदावरी नदीच्या पुलावरून प्रवास करत दैठणा या ठिकाणावरून होत माझी बस आता परभणी बस स्टैंड वर रात्री 7:30 वाजता पोहोचली.
इथून पुढे परभणी हिंगोली हायवे वरून प्रवास करत झिरो फाटा कडून होत तसेच पुढे हट्टा नंतर आडगाव नंतर बराच काळ प्रवास करत जवळा बाजार कडून होत औंढा नागनाथ बस स्टँड वर रात्री 8:40 वाजता पोहोचली.
औंढा नागनाथ ते हिंगोली जवळजवळ 23 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. पुढे सुरेगाव कडून होत दिग्रस फाटा नंतर संटुक पिंपरी नंतर लिंबाळा मक्ता नंतर नरसी फाटा कडून पुढे हिंगोली जवळ कदयू नदीच्या पुलावरून प्रवास करत शेवटी माझी बस आता हिंगोली बस स्टैंड वर रात्री 9:15 वाजता पोहोचली.
हिंगोली बस स्टॅन्ड ला एकूण 16 फळात दिलेले आहेत. हिंगोली हा मराठवाडा भाग अंतर्गत मोडतो.
Jath To Hingoli Final Destination
या प्रवासामध्ये सांगली जिल्हा, विजयपूर जिल्हा, सोलापूर, धाराशिव, बीड आणि शेवटी परभणी जिल्हा या सगळ्या जिल्ह्यामध्ये माझी एसटी धावली. मराठवाड्यातील शेवटचा भाग हा हिंगोली आहे.
अशाप्रकारे माझा Jath To Hingoli हा साडेतेरा तासांचा प्रवास पूर्ण झाला.