How To Travel From Jath To Hyderabad By MSRTC

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझा Jath To Hyderabad  ह्या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.

तर माझा ह्या गाडीचा मार्ग जत पासून सोलापूर, चडचण, उमरगा, जहीराबाद आणि शेवटी हैदराबाद अशा प्रकारे होता.

माझ्या गाडीचा नंबर होता MH 10 DT 3280 . जत हा सांगली विभाग अंतर्गत मोडतो.

Jath To Hyderabad Distance

Jath To Hyderabad

Jath To Hyderabad  चा अंतर 446 किलोमीटरचा आहे. माझी गाडी बरोबर सकाळी 9:00 वाजता जत बस स्टँडवरून निघाली. Jath To Hyderabad  हा जवळपास 13 तासांचा प्रवास ठरला.

Jath to Hyderabad Ticket Price

Jath To Hyderabad  MSRTC चा तिकीट दर 775 पन्नास रुपये आहे जे कालांतराने कमी किवा जास्त होण्याची शक्यता आहे.

माझी गाडी आता जत चडचण रस्त्यावर धावत वाळसंग या ठिकाणावरून पुढे सोरडी नंतर गुड्डापूर नंतर माळग्याळ नंतर उडगी तसेच पुढे उमदी इथून माझी गाडी आता कर्नाटक सेमिरेषाच्या आत मध्ये शिरल्यानंतर चडचण बस स्टैंड वर सकाळी 11:00 वाजता पोहोचली.

आतापर्यंत जत ते चडचण 63 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता. हा अंतर गाठण्य्साठी मला जवळपास दोन तास लागले कारण जत ते चडचण चा जो रस्ता होता तो पूर्णपणे सिंगल रोड आणि कच्चा होता यामुळे मला इतका वेळ लागला.

चडचण बस स्टॅन्ड वरून पुढे बारडोल नंतर झलकी बस स्टैंड वर सकाळी 11:30 वाजता पोहोचली.

झलकी बस स्टँडवरून पुढे धुळखेड इथून कर्नाटक महाराष्ट्र सीमेरेषेवर भीमा नदीच्या पुलावरून प्रवास करत टाकळी इथे नाश्त्यासाठी दहा मिनिटं थांबली होती.

इथून पुढे आरटीओ चेक पोस्ट पार करून सोलापूर टोल नाका पार करत पुढे सोलापूर बस स्टैंड वर 130 किलोमीटरचा पल्ला पार करत आपल्या पुढचं प्रवासासाठी निघाली.

सोलापूर पासून हैदराबाद 313 किलोमीटरचा अंतर आहे. परत एकदा हायवेवर धावत बोरामणी या ठिकाणावरून पुढे ईटकळ नंतर फुलवाडी या ठिकाणी टोल नाका पार करत नळदुर्ग बस स्टैंड वर 2:30 वाजता पोहोचलो.

नळदुर्ग इथून पुढे जळकोट नंतर येणेगुर या सगळ्या ठिकाणावरून होत आता माझी बस उमरगा बस स्टैंड वर 3:15 वाजता सोलापूर पासून 85 किलोमीटरचा प्रवास करत आणि दोन तासांचा कालावधी पार करत या ठिकाणी मी पोहोचलो.

उमरगा वरून हैदराबाद जाण्यासाठी 227 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. हायवेवर धावत असताना तुरोरी नंतर तालमोड या ठिकाणी असणारा टोल नाका पार करत तसेच पुढे धाकटीवाडी येथे असणारा टोल नाका पार करत कर्नाटक राज्याचे सीमारेषा मध्ये शिरलो.

धावत असताना हल्ली नंतर सस्तापुर वरून बराच काळ हायवेवर धावत राजेश्वर ठिकाणावरून होत हुमनाबाद येथे माणिक नगर येथून पुढे माझी बस आता हुमनाबाद बस स्टँड वर दुपारी 4:45 वाजता पोहोचल्यानंतर पुढे जाहीराबादच्या दिशेने धावू लागली.

हायवेवर धावत असताना वडणकेरा नंतर मंगलगी या ठिकाणी टोल नाका पार करत पुढे मन्नाखिल्ली बस स्टैंड वर 5:30 वाजता थोड्या वेळासाठी थांबा घेत माझी बस आपल्या पुढचा प्रवासाला सुरुवात करते.

मन्नाखिल्ली नंतर भांगूर इथून पुढे तेलंगणा राज्य सीमा रेषाच्या आत शिरल्यानंतर हॉटेल ग्रँड परिवार येथे 5:40 वाजता जेवणासाठी थांबली.

इथून हैदराबाद 125 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. जवळपास 20 मिनिटं जेवणासाठी थांबा घेतल्यानंतर कामकोले या ठिकाणी टोल नाका पार करत बुधेरा या ठिकाणावरून होत पुढे सदाशिव पेठ बायपास इथून पुढे बराच काळ हायवेवर धावत संगारेड्डी या ठिकाणावरून पुढे तसेच पुढे हैदराबाद शहरात असणारे पट्टनचेतवू इथून होत पुढे लिंगमपल्ली नंतर जगद्गुरु गुट्टा मेहदीपटनम नंतर लकडी का पूल नंतर सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याच्या पासून पुढे हैदराबाद बस स्टैंड वर 9:30 वाजता पोहोचली.

अशा प्रकारे माझा Jath To Hyderabad  चा प्रवास पूर्ण झाला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपला मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद.

Leave a Comment