How to Travel From Jintur to Satara

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या या ब्लॉगद्वारे माझा Jintur to Satara या मार्गावरील केलेला प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे. 

Jintur To Satara Distance By Road

Jintur To Satara Distance

जिंतूर हा परभणी जिल्हा अंतर्गत मोडतो. जिंतूर ते सातारा चा अंतर जवळपास 450 किलोमीटरचा आहे. जिंतूर बस स्टॅन्ड ला लागूनच जिंतूर डेपो पण आहे. या jintur बस स्थानक वर तुम्हाला स्वच्छता पाहायला मिळेल. 

Jintur to Satara MSRTC Bus Ticket Price

जिंतूर पासून सातारा जाण्यासाठी सकाळी 7:00 वाजता जिंतूर बस स्टँड वरून सुटते. ह्या बसचा तिकीट भाडं जवळपास ८५० रुपये आहे.

Jintur to Satara MSRTC Bus Timetable

From ToTimingsRoutes
JinturSatara7:00परभणी, आंबेजोगाई, पंढरपूर, दहिवडी आणि शेवटी सातारा

तर मित्रांनो बरोबर 6:45 वाजता म्हणजेच पंधरा मिनिटे अगोदरच मी जिंतूर बस स्टॅन्ड वर माझी बस पकडण्यासाठी आलो होतो. या गाडीचा मार्ग जिंतूर पासून परभणी, आंबेजोगाई, पंढरपूर, दहिवडी आणि शेवटी सातारा अशाप्रकारे आहे. ज्या गाडीने मी प्रवास केला ते परभणी विभागाची आणि जिंतूर आगारातले होते. माझी ह्या गाडीचा नंबर MH 14 MH 0091अशाप्रकारे होता. 

इथून पुढे माझी बस 45 किलोमीटरच्या अंतरावर असणारा परभणीच्या दिशेने प्रवास करण्यासाठी जिंतूर बस स्टॅन्ड मधून बाहेर पडली. 

या भागात भरपूर गर्दी दिसायला मिळतं. माझ्या ह्या बसमध्ये अक्षरशः भरपूर गर्दी दिसायला मिळाली एका सीटवर दोन दोन माणसं बसताना मला दिसून आले. 

रस्त्याच्या दोन्हीकडे शेत असणारा या मार्गावरून प्रवास करत पुढे बोरे या ठिकाणावरून पोहोचत तसेच पुढे झरी या ठिकाणावरून होत जवळपास तासाभरांचा प्रवास करत मी आता सकाळी 6:00 वाजता परभणी बस स्टैंड वर फलट क्रमांक सहावर पोहोचलो होतो. या फ्लॅटवर कोल्हापूर, बार्शी, कुर्डूवाडी या दिशेने धावणारे गाड्या येऊन थांबतात.

इथून पुढे गंगाखेड, अमळनेर आणि आंबेजोगाई च्या दिशेने माझी बस आता धावायला सुरू करते.परभणी पासून आंबेजोगाई हे साधारण 92 किलोमीटरचा अंतर आहे.

परभणी गंगाखेड हायवे वरून प्रवास करत मी आता दैठणा या ठिकाणावरून होत गंगाखेड बस स्टँडवर सकाळी 9:00 वाजता पोहोचलो. ह्या बस स्टँडला नवीन बांधकाम दिसायला मिळाळे.

बराच काळ हायवे वरून प्रवास करत आता माझी बस परळी बस स्टैंड वर सकाळी 10:00 वाजता पोहोचली.

इथून पुढे माझी बस प्रवास करत असताना घाट मार्ग पार करत आंबेजोगाई शहरात दाखल झाली. जिंतूर पासून 130 किलोमीटर अंतर गाठत तसेच जवळपास साडेतीन तासांचा आत माझी बस आंबेजोगाई बस स्टैंड वर सकाळी 10:30 वाजता फलट क्रमांक दोनवर पोहोचली होती.

ह्या फ्लॅटवर कोल्हापूर,पंढरपूर, रत्नागिरी, सातारा आणि कळंब मार्गावर जाणाऱ्या गाड्या येऊन थांबतात. आंबेजोगाई बस स्टँड पूर्णपणे काँक्रीट ने बांधलेला आहे.

आता अंबाजोगाई ते पंढरपूरचा 190 किलोमीटरचा प्रवास गाठण्यासाठी माझी बस ह्या बस स्टँड मधून बाहेर पडली. ह्या मार्गावरील कळंब ,येरमाळा, बार्शी ,कुर्डूवाडी आणि तसेच पंढरपूर या सगळ्या ठिकाण पाहायला मिळतो.

आंबेजोगाई पासून जवळपास 19 किलोमीटरचा अंतर गाठत माझी पास आता सकाळी 11: 00 वाजता नाश्त्यासाठी हॉटेल अरिहंत इथे थांबा घेते.

इथून पुढे माझी बस आता सिंगल रस्त्यावरून प्रवास करत कळंब येथून पुढे येरमाळा या ठिकाणी दुपारच्या १२:30 वाजता पोहोचली. परत एकदा माझी बस आता आपला पुढचा प्रवास पार करण्यासाठी रस्त्यावरून धावत बार्शी बस स्टैंड वर दुपारच्या 1:30 वाजता पोहोचली.

बार्शी पासून पंढरपूर जवळपास 90 किलोमीटरचा अंतर पार करण्यासाठी शिल्लक राहिला होता. हा अंतर गाठण्यासाठी जवळपास दोन ते अडीच तासांचा कालावधी लागू शकतो.

बराच काळ रस्त्यावरून प्रवास करत माझी बस आता पंढरपूर शहरात दाखल होण्याअगोदर चंद्रभागा नदीच्या पुल पार करत माझी बस आता पंढरपूर बस स्थानक वर दुपारी 3:30 वाजता फलक क्रमांक 19 वर पोहोचली. जिंतूर पासून जवळपास 330 किलोमीटरचा अंतर पार झाला होता. हा प्रवासला जवळपास आठ ते साडेआठ तासांचा कालावधी लागला.

आतापर्यंत पंढरपूर पासून सातारा जवळपास 150 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. तिथून पुढे माझी बस आता दहिवडी मार्गे प्रवास करत सातारा गाठण्यासाठी परत एकदा सातारा हायवे वर धावू लागते.

इथून पुढे पिलीव या ठिकाणावरून होत तसेच थोडाच अंतरावर घाट पार करत बराच काळ सतत धावल्यानंतर माझी बस आता संध्याकाळी 5:00 वाजता महासवड बस स्टैंड वर पोहोचली.

इथून पुढे गोंदवले या ठिकाणावरून होत तसेच दहिवडी या ठिकाणी संध्याकाळच्या 5:45 वाजता पोहोचली. पुढे सिंगल रस्त्यावरून प्रवास करत पुसेगाव या ठिकाणावरून होत कोरेगाव नंतर संध्याकाळी 7:30 वाजता माझी बस सातारा बस स्टैंड वर पोहोचली.

  • Distance: 450 किलोमीटर
  • Routes: परभणी, आंबेजोगाई, पंढरपूर, दहिवडी आणि शेवटी सातारा
  • Timings: 07:00
  • Travel Duration: 12.5 Hrs
  • Ticket Price: 850 Rupees

अशाप्रकारे जिंतूर ते सातारा हा साडेबारा तासांचा प्रवास पूर्ण झाला. हीच गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 6:00 वाजता सातारापासून जिंतूर प्रवास करते. ही गाडी परभणी बीड धाराशिव सोलापूर आणि सातारा अशाप्रकारे एकूण पाच जिल्ह्यामधून प्रवास करते.

FAQs

What is Jintur To Satara Distance By Road?

450 KM

Leave a Comment