नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या Nanded To Nagpur दरम्यान केलेला प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.
तर मित्रांनो मी आता Nanded Bus Stand वर माझी गाडीची वाट पाहत उभा होतो तेव्हाच माझ्यासमोर Nanded To Nagpur ही MSRTC Bus फलट वर येऊन थांबली.
तर मित्रांनो बस मध्ये मी आपल्या सीटवर जाऊन बसताच थोड्या वेळात माझी बस बरोबर सकाळी 4:30 वाजता Nanded Bus Stand वरून आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी निघाली.
ह्या गाडीचा मार्ग नांदेड पासून पुसद, दिग्रस, दारवा नंतर यवतमाळ नंतर वर्धा आणि शेवटी नागपूर अशा प्रकारे होता.ही गाडी वर्धा विभागाचे असून वर्धा आगारातली होती.
Nanded To Nagpur MSRTC Bus Timetable
नांदेड ते नागपूर जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात
| From | To | Timings | Routes |
| Nanded | Nagpur | 5:45, 6:00, 7:00, 8:00, 9:00, 9:45, 10:00, 10:30, 11:00, 11:30, 12:30, 17:15, 19:00, 21:00, 22:30 | Ardhapur, Waranga fata, Hadgaon, Umarkhed, Pusad, Digras, Darwha, Yavatmal, Kalamb, Wardha, Selu, |
Table of Contents
Nanded To Nagpur Ticket Price by MSRTC Bus
Nanded To Nagpur चा टिकीट दर 565 रुपये अशाप्रकारे होता जे कालांतराने कमी किंवा जास्त होऊ शकतं.
Nanded To Nagpur Distance By Bus

नांदेड ते नागपूर हा जवळपास 370 किलोमीटरचा अंतर आहे. हायवेवर धावत असताना माझी बस आता कामठा खुर्द ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे अर्धापूर इथून होत पुढे वारंगा फाटा ह्या ठिकाणावरून होत धावू लागली.
हाच हायवे गोंदिया किंवा गुणगर्डे किंवा हदगाव किंवा नागपूर तसेच तुळजापूर ह्या ठिकाणी जातो.
हायवेवर धावत असताना पळसा ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे हदगाव बस स्टैंड वर सकाळी 6:10 वाजता माझी बस पोहोचली.
Hadgaon Bus Stand हा नांदेड जिल्हा अंतर्गत तसेच हदगाव तालुका अंतर्गत मोडतो.हदगाव पासून पुढे आता माझी बस उमरखेड च्या दिशेने धावू लागली. आतापर्यंत नांदेड ते हदगाव ६५ किलोमीटरचा अंतर पार झाला होता.
तर माझी गाडी गोजेगाव ह्या ठिकाणावरून होत पुढे पेनगंगा नदीच्या पुलावरून धावत उमरखेड बस स्टैंड वर 6:30 वाजता Hadgaon Bus Stand पासून तब्बल 25 मिनिटांचा प्रवास करत मी आता पोहोचलो होतो उमरखेड येथे.
Umerkhed Bus Stand हा माझ्या मार्गावरील दुसरा टप्पा होता. उमरखेड बस स्टॅन्ड हा यवतमाळ जिल्हा तसेच उमरखेड तालुका अंतर्गत मोडतो.
माझ्या गाडीचा नंबर MH 40 CM 3192 अशाप्रकारे होता.
Umerkhed Bus Stand वरून पुढे आता माझी बस प्रवास करत पोफळी तसेच पुढे आसोली नंतर शेलु बुद्रुक ह्या ठिकाणावरून होत Pusad Bus Stand वर सकाळी 7:30 वाजता पोहोचलो.
Pusad Bus Stand हा यवतमाळ जिल्हा आणि अमरावती विभाग अंतर्गत मोडतो.
पुसद बस स्टैंड वर नाश्ता साठी थांबा होता. तर जवळपास पंधरा मिनिटं थांबा घेतल्यानंतर माझी बस आता पुढचा टप्पा गाठण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून होत परत एकदा प्रवास करू लागली.
Nanded Bus Stand पासून पुसद हा जवळपास 124 किलोमीटरचा अंतर पूर्ण झाला होता. ह्या ठिकाणावरून नागपूर 250 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.
तर माझी गाडी आता ज्योती नगर नंतर सिंगद ह्या ठिकाणावरून पुढे Digras Bus Stand वर सकाळी 8:43 वाजता पोहोचली.
Digras Bus Stand हा दिग्रस जिल्हा आणि यवतमाळ विभाग अंतर्गत मोडतो. पुसद पासून 30 किलोमीटरचा प्रवास करत मी आता ह्या ठिकाणी दिग्रस बस स्टैंड वर दाखल झालो होतो.
Digras Bus Stand वरून पुढे आता दारवा च्या दिशेने माझी बस आता धावत चालली. Digras Bus Stand वरून धारवाच अंतर जवळपास 33 किलोमीटरचा होता.
तर मित्रांनो दारवा च्या दिशेने धावत असताना कळसा ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे मांडवा नंतर हरसुल च्या पुढे अरुणावती नदीच्या पुलावरून होत सिंधी ह्या गावावरून प्रवास करत पुढे लाखखिंड ह्या गावावरून होत माझ्या मार्गावरील पाचव्या बस थांबा म्हणजे दारवा बस स्टैंड वर सकाळी 9:30 वाजता पोहोचली.
दारवा पासून यवतमाळ हा 43 किलोमीटरचा अंतर आहे. ज्याला कमीत कमी दीड तासांचा कालावधी लागला. पुढे शेलोडी ह्या ठिकाणावरून होत नंतर बोरी खुर्द इथून पुढे आदन नदीच्या पुलावरून होत नंतर बोरी बुद्रुक नंतर लाडखेड ह्या सगळ्या ठिकाणावरून होत माझी गाडी आता यवतमाळ बस स्टैंड वर सकाळी 10:30 वाजता पोहोचली.
यवतमाळ बस स्टॅन्ड वरून पुढे आता चापर्डा नंतर कळंब बस स्टैंड वर पोहोचल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे वर्धा गाठण्यासाठी धावू लागली.
कळंब बस स्टॅन्ड वरून वर्धा हा 47 किलोमीटरचा अंतर होता. तर वर्धा नदीच्या पुलावरून धावत तसेच पुढे हसनापूर ह्या ठिकाणी असणारा टोल नाका पार करत पुढे भिडी नंतर देवळी बस स्टैंड वर सकाळी 11:30 वाजता पोहोचत पुढचा टप्पा पार करत वर्धा बस स्टैंड वर दुपारी 12:00 वाजता पोहोचली.
इथून पुढे नागपूर हा जवळपास दोन तासांचा अंतर शिल्लक राहिला होता. वर्धा Bus Stand वरून नागपूर हा जवळपास 80 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.
पावणार ह्या ठिकाणावरून होत पुढे धाम नदीच्या पुलावरून प्रवास करत सेलू नंतर केळझार इथून पुढे बराच काळ प्रवास केल्यानंतर हदगाव ह्या ठिकाणी असणारा टोल नाका पार करत पुढे बुटीबोरी नंतर छत्रपती चौक इथून होत तसेच पुढे दंतोली ह्या सगळ्या ठिकाणावरून होत शेवटी गणेश पेठ नागपूर बस स्टैंड वर दुपारी 2:00 वाजता पोहोचली.
अशा प्रकारे माझा नांदेड ते नागपूर ह्या मार्गावर केलेला प्रवास पूर्ण झाला. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद
FAQs
How Much Is Nanded To Nagpur Msrtc Bus Ticket Price?
565 रुपये
How Long Does It Take To Drive From Nanded To Nagpur?
9 Hours
What Are The Boarding Points From Nanded To Nagpur?
नांदेड पासून पुसद, दिग्रस, दारवा नंतर यवतमाळ नंतर वर्धा आणि शेवटी नागपूर