How To Travel from Nashik To Nagpur

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉग द्वारे Nashik To Nagpur हिरकणी बस मधून ह्या मार्गावरील प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.

Nashik To Nagpur Distance

Nashik To Nagpur Distance

Nashik To Nagpur हा जवळपास 700 किलोमीटरचा अंतर आहे. नाशिक मेळावा स्टॅन्ड हा एकूण वीस फलाटांचा बस स्टँड आहे.

ह्या गाडीचा मार्ग नाशिक पासून मालेगाव, धुळे, जळगाव आणि शेवटी नागपूर अशा प्रकारे आहे.गाडीचा नंबर MH 14 KQ 75 होता. ह्या मार्गावर तीन ठिकाणी चालक आणि वाहक यांची बदली होते. नाशिक ते जळगाव नंतर जळगाव ते अकोला आणि तसेच अकोला ते नागपूर पर्यंत अशाप्रकारे बदली होते.

Nashik To Nagpur MSRTC Bus Timetable

Nashik Bus Stand वरून Nagpur जाण्यासाठी ह्या वेळानुसार निघतात.

FromToTimingsRoutes
NashikNagpur8:30Malegaon, Dhule, Jalgaon

ही बस नाशिक आगाराची आणि विभागाची होती.तर बरोबर 8:30 वाजता माझी ही बस नाशिक बस स्टँड मधून बाहेर पडली.

नाशिक शहरातून बाहेर पडत ओझर ह्या ठिकाणावरून होत पुढे पिंपळगाव बसवंत नंतर माझी बस धुळे नाशिक हायवे वरून धावत चांदवड ह्या ठिकाणी टोलनाका पार करत बराच काळ हायवेवर प्रवास केल्यानंतर मालेगाव शहरात दाखल होण्याअगोदर मौसम नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस मालेगाव बस स्टैंड वर रात्री 10:45 वाजता पोहोचली.

नाशिक ते मालेगाव हा 104 किलोमीटरचा अंतर माझा पूर्ण झाला होता.इथून पुढे बराच काळ हायवे वरून प्रवास केल्यानंतर माझी गाडीत धुळे बस स्टैंड वर रात्री 12:00 वाजता पोहोचली.

इथून पुढे माझी बस आता जळगाव गाठण्यासाठी परत एकदा धाऊ लागली. धुळे पासून जळगाव हा 95 किलोमीटर चा अंतर शिल्लक राहिला होता.

रस्त्यावर धावत असताना फागणे इकडून पुढे माझी एसटी मुंबई नागपूर हायवे वरून प्रवास करत सब गव्हाण येथे रात्री 12:30 वाजता हॉटेल महादेव इथे जेवणासाठी थांबा घेते.

ह्या ठिकाणावरून जळगाव 71 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. तसेच नागपूर 500 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

Nashik To Nagpur Ticket Price

हिरकणी बस द्वारे Nashik To Nagpur चा टिकीट भाडं जवळपास 1400 रुपये होतं.जेवणासाठी थांबा घेतल्यानंतर परत एकदा माझी बस हायवेवरून प्रवास करत पारोळा ह्या ठिकाणावरून होत पुढे एरंडोल नंतर जळगाव जवळ गिरणा नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस आता जळगाव बस स्टैंड वर रात्री 2:15 वाजता पोहोचली.

जळगाव ते अकोला हा एकूण 185 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. ह्या ठिकाणी गाडीचे वाहक आणि चालक यांची बदली झाली.

जळगाव बस स्टॅन्ड वरून आता माझी बस परत एकदा मुंबई नागपूर हायवेवरून प्रवास करत नशिराबाद ह्या ठिकाणी टोल नाका पार करत पुढे भुसावळ बस स्टैंड वर रात्री 3:00 वाजता पोहोचली.

इथून पुढे परत एकदा हायवे वर धावत मुक्ताईनगर बस स्टैंड वर रात्री 3:45 वाजता पोहोचल्यानंतर पुढे बस स्टैंड वर सकाळी 4:30 वाजता पोहोचली.

इथून पुढे परत एकदा हायवेवरून प्रवास करत खामगाव बस स्टैंड वर सकाळी 5:00 वाजता पोहोचली . खामगाव बस स्टॅन्ड ला एकूण नऊ फलट दिलेले आहेत.

खामगाव बस स्टँड वरून नागपूर 300 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. पुढे परत एकदा हायवेवरून प्रवास करत बालापुर ह्या ठिकाणावरून होत आता माझी बस अकोला बस स्टैंड वर सकाळी 6:00 वाजता पोहोचली.

अकोला बस स्टॅन्ड ला एकूण वीस फलट दिलेले आहेत.ज्या फलटवर माझी बस थांबली होती तिथून भंडारा ,तुमसर, वरुड, गडचिरोली जाण्यासाठी गाड्या लागतात.

आतापर्यंत नाशिक जिल्हा नंतर धुळे जिल्हा नंतर जळगाव जिल्हा नंतर बुलढाणा जिल्हा आणि तसेच अकोला जिल्हा ह्या सगळ्या जिल्ह्यामधून माझा प्रवास पूर्ण झाला होता .

अकोला पासून अमरावती 100 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता आणि तसेच नागपूर 250 किलोमीटरचा अंतरावर स्थित आहे.

इथून पुढे परत एकदा हायवे वरून धावत मूर्तिजापूर बस स्टँडवर सकाळी 7:15 वाजता पोहोचत पुढे माझी बस आता अमरावती मध्यवर्ती बस स्टैंड वर सकाळी 8:30 वाजता पोहोचली.

येथून नागपूर जवळजवळ 150 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.

अमरावती बस स्टँड वरून पुढे माझी बस आता परत एकदा हायवे वरून प्रवास करत मोझरी नंतर तळेगाव बस स्टैंड वर पोहोचत पुढे परत एकदा हायवे वरून धावत कारंजा घाडगे कडून पुढे कोंढाळी बस स्टैंड वर सकाळी 11 वाजता पोहोचली.

Nashik To Nagpur Final Destination

परत एकदा एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करत सुराबर्डी नंतर आता माझी बस नागपूर गणेश पेठ बस स्टैंड वर दुपारी 12:15 वाजता पोहोचली.

अशाप्रकारे माझा Nashik To Nagpur चा 17 तासांचा हा प्रवास पूर्ण झाला.

FAQs

How long does it take to drive from Nashik To Nagpur?

13 Hours Approximately

What is the cost of the bus ticket from Nashik To Nagpur?

1400 रुपये

What are the boarding points from Nashik To Nagpur?

मालेगाव, धुळे, जळगाव

Leave a Comment