नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉग मध्ये मी केलेला Nashik To Tasgaon ह्या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.
बरोबर रात्रीचे 1:30 वाजता मी ह्या Nashik Bus Stand वर येऊन थांबलो होतो. ही गाडी पूर्णपणे बुकिंग गाडी सुद्धा आहे तर जर तुम्हाला ह्या मार्गावर प्रवास करण्याची इच्छा झाली तर तुम्ही ह्या गाडीने सीट बुक करून सुद्धा प्रवास करू शकता .
Table of Contents
Nashik To Tasgaon Ticket Price
नाशिक पासून तासगाव पर्यंत ह्या गाडीचा तिकीट दर 640 रुपये अशाप्रकारे होता.माझ्या ह्या गाडीचा मार्ग नाशिक पासून संगमनेर, स्वारगेट, सातारा, कराड, आणि तासगाव अशा प्रकारे होता. ही बस सांगली विभागाची असून तासगाव आगाराची होती.
Nashik To Tasgaon MSRTC Bus Timetable
नाशिक ते तासगाव जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात
| From | To | Timings | Routes |
| Nashik New CBS | Tasgaon | 2:00, 9:30, 18:00, | Sinnar, Sangamner, Alephata, Narayangaon, Manchar, Rajgurunagar, Pune Shivaji Nagar Wakdewadi, Pune Swargate, Satara, Karad, Palus, Yelavi, Nimni, Tasgaon |
| Nashik Road Stand | Tasgaon | 2:15, 9:45, | Sinnar, Sangamner, Alephata, Narayangaon, Manchar, Rajgurunagar, Pune Shivaji Nagar Wakdewadi, Pune Swargate, Satara, Karad, Palus, Yelavi, Nimni, Tasgaon |
Nashik To Tasgaon Distance by MSRTC Bus

बरोबर 2:00 वाजता माझी गाडी ह्या Nashik Bus Stand वरून प्रवास करण्यासाठी सुरू करते.
Nashik To Tasgaon हा जवळपास 400 किलोमीटरचा अंतर होता. माझ्या गाडीचा नंबर होता MH10 DT 3889.
Nashik Bus Stand वरून पुढे 15 मिनिटांच्या अंतरावर माझी बस Nashik Road Bus Stand इथून पुढे निघाली.
माझी बस नाशिक संगमनेर हायवे वरून धावत Sinnar Bus Stand वर रात्री 2:42 वाजता फलाट क्रमांक दहावर पोहोचत पुढचा टप्पा गाठण्यासाठी परत एकदा समृद्धी महामार्ग इंटरचेंज ह्या हायवेवर धाव लागते.
Sinnar Bus Stand वरून जवळपास पाऊण तासांचा प्रवास करत मी आता Sangamner Bus Stand वर मध्यरात्री 3:30 वाजता पोहोचलो होतो इथून पुढे माझी बस पुणे स्वारगेटच्या दिशेने धावू लागली.
Sangamner Bus Stand वरून पुणे स्वारगेट हा जवळपास 150 किलोमीटरचा अंतर होता.
संगमनेर पुणे हायवे वर धावत असताना चंदनपुरी घाट पार करत पुढे बराच काळ प्रवास केल्यानंतर Alephata Bus Stand वर सकाळी 4:15 वाजता पोहोचत पुढे आपला टप्पा गाठण्य्साठी परत एकदा बस धाव लागते.
आळेफाटा Bus Standवरून पुणे स्वारगेट हा 95 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. Alephata हा ह्या मार्गावरील चा दुसरा जिल्हा होता.
पुढे आता माझी बस नारायणगाव, मंचर, चाकण आणि शेवटी पुणे असे प्रकारे होते.
तर मित्रांनो आळेफाटा वरून आता माझी बस नारायणगाव बस स्टैंड वर फ्लॅट क्रमांक आठवर सकाळी 4:30 वाजता पोहोचली.
इथून पुढे माझी बस परत एकदा हायवेवर तब्बल दोन तासांचा प्रवास करत शेवटी Pune Shivaji Nagar Bus Stand वरून पुढचा बस स्टॉप Pune Swargate Bus Stand वर सकाळी 6:45 वाजता पोहोचली.
Pune Swargate Bus Stand वरून तासगाव हा जवळपास 215 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. तर मित्रांनो Pune Swargate Bus Stand वरून माझी बस आता सातारा कराडच्या दिशेने पुणे शहरातून बाहेर पडत हायवेवर धावत बेंगरूटवाडी ह्या ठिकाणी असणारा हॉटेल आमराई गार्डन येथे सकाळी 8:00 वाजता चहापाणीसाठी किंवा नाश्ता साठी थांबा घेते. ह्या ठिकाणावरून तासगाव जवळपास 150 किलोमीटरचा अंतरावर आहे ज्याला जवळपास पाच तासांचा कालावधी लागला.
इथून पुढे खंबाटकी घाट पार करत मी आता पोहोचलो होतो Satara Bus Stand वर सकाळी 9:15 वाजता पोहोचली इथून पुढे माझी गाडी आता कराडच्या दिशेने धावू लागली.
सातारा ते कराड हा जवळपास 85 किलोमीटरचा अंतर आहे.
माझी बस आता पुणे बेंगलोर हायवेवर धावत उंब्रज ह्या ठिकाणावरून होत कराड बस स्टैंड वर सकाळी 11:42 वाजता फलट क्रमांक सात वर पोहोचली. कराड बस स्टॅन्ड वरून तासगाव हा जवळपास 56 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.
Karad Bus Stand वरून आता माझी बस कराड तासगाव रस्त्यावर धावत वाटेत लागणारा कृष्ण नदीच्या पुलावरून होत शेनोली ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे टाकारी नंतर Kundal Bus Stand वर दुपारी 12:15 वाजता थांबा घेते. Kundal Bus Stand हा तालुका पलूस आणि सांगली जिल्हा अंतर्गत मोडतो.
Kundal Bus Stand हा फार छोटासा असा एक Bus Stand आहे जिथे कुठेही फलाट दिलेले नाही.
Kundal Bus Stand वरून पुढे आता माझी बस पलूस बस त्यांच्या दिशेने धावत शेवटी Palus Bus Stand वर थांबा घेतल्यानंतर पुढे परत एकदा धावत येळावी ह्या ठिकाणावरून होत Tasgaon Bus Stand वर 12:45 वाजता पोहोचली. तासगाव हा सांगली जिल्हा अंतर्गत मोडतो.
How Much Time Does It Take To Travel From Nashik To Tasgaon?
अशाप्रकारे माझा नाशिक ते तासगाव जवळपास 11 तासांचा प्रवास करत पोहोचलो. ह्या प्रवासामध्ये नाशिक जिल्हा,पुणे जिल्हा,सातारा जिल्हा,सांगली जिल्हा ह्या सगळ्या जिल्ह्यामधून माझा हा प्रवास पूर्ण झाला.
तर जर तुम्हाला हा ब्लॉग वाचायला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद
FAQs
How Much Is Nashik To Tasgaon Msrtc Bus Ticket Price?
640 रुपये
What Is Nashik To Tasgaon Distance By Road?
400 किलोमीटर