How to Travel From Pusad To Mumbai

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या Pusad To Mumbai या मार्गावर केलेल्या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.तर मित्रांनो मी Pusad Bus Stand वर दुपारी 3:30 वाजता पोहोचलो होतो कारण माझी बस संध्याकाळी 4:00 वाजताची होती.

ही बस Pusad To Mumbai जाणारी लांब पल्याची बस होती . ही बस Pusad Bus Stand वरून फलट क्रमांक 6 इथून सुटली. Pusad Bus Stand हा यवतमाळ जिल्हा अंतर्गत मोडतो.

Pusad To Mumbai MSRTC Bus Timetable

पुसद ते मुंबई जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात

From ToTimingsRoutes
Pusad Mumbai Central 15:00Kalamnuri, Hingoli, Aundha, Jintur, Mantha, Jalna, Badnapur, CIDCO Chatrapati Sambhaji Nagar (Aurangabad), Vaijapur, Yeola, Niphad, Nashik Mahamarg, Igatpuri, Shahapur, Bhiwandi, Kalyan Bypass, Thane, Kurla Nehru Nagar, Sion,Parel (Mumbai)

Pusad To Mumbai Distance

Pusad To Mumbai Distance

या बस स्टँडवर एकूण 10 फलट दिलेले आहेत.तर मित्रांनो Pusad To Mumbai हा जवळपास 700 किलोमीटरचा अंतर होता .पुसद बस स्टॅन्ड वरून बाहेर पडत आता माझी बस पुसद कळमनुरी हायवेवर धावत पुढे घाट पार करत सावरगाव बंगला या ठिकाणावरून होत बराच काळ हवेवर धावल्यानंतर पुसद वरून 28 किलोमीटरच्या अंतरावर असणारा शेंबाळ पिंपरी बस स्टँड वर संध्याकाळी 5:00 वाजता पोहोचली.

शेंबाळ पिंपरी बस स्टँड हा माझा मार्गावरील पहिला थांबा होता.शेंबाळ पिंपरी बस स्टँडवरून पुढे आता माझी बस परत एकदा हायवेवर धावत जाते.शेंबाळ पिंपरी बस स्टँड सोडल्यानंतर जवळपास पाऊण तासांचा प्रवास करत कळमनुरी बस स्टैंड वर संध्याकाळी 6:00 वाजता पुसद पासून 51किलोमीटरचा अंतर गाठत पोहोचली इथून पुढे परत एकदा माझी बस कळमनुरी हिंगोली हायवेवर धावत कळमनुरी बस स्टँडवरून 20 किलोमीटरचा अंतरावर असणारा Hingoli Bus Stand वर संध्याकाळी 6:45 वाजता फलाट क्रमांक चार वर पोहोचली.

Pusad To Mumbai Ticket Price By Bus

Pusad To Mumbai तिकीट दर 1180 रुपये आहे. माझा या गाडीचा मार्ग Pusad पासून कळमनुरी ,हिंगोली ,जिंतूर ,जालना ,छत्रपती संभाजी नगर ,वैजापूर ,नाशिक,भिवंडी आणि शेवटी मुंबई होता .हिंगोली बस स्टँड वरून पुढे माझी बस औंदा नागनाथ बस स्टैंड वर संध्याकाळी 7:40 वाजता पाहोचली. इथून पुढे हिंगोली सेनगाव हायवेवर धावत नरसी नामदेव या ठिकाणावरून होत तसेच पुढे सेनगाव या ठिकाणावरून होत सेनगाव जिंतूर हायवेवर धावत नंतर येलदरी धरण पार करत पुणे येलदरी या ठिकाणावरून होत Jintur Bus Stand वर 8:45 वाजता पोहोचली.

जिंतूर हा परभणी विभाग अंतर्गत मोडतो. माझ्या बसचा नंबर होता MH 14 LX 7608 होता .माझी बस जिंतूर जालना हायवे वर धावत चालली.बरच काळ प्रवास केल्यानंतर माझी बस आता मंठा बस स्टैंड वर रात्री 9:30 वाजता पोहोचली होती.

इथून पुढे माझी बस जवळपास अर्धा तासांचा प्रवास केल्यानंतर वाटुर या ठिकाणी हॉटेल विठ्ठला फॅमिली इथे जेवणासाठी रात्री 10:00 वाजता थांबा घेते.इथून पुढे माझी बस आता जालनाच्या दिशेने धावू लागली. हॉटेल विठ्ठला फॅमिली इथून 51 किलोमीटरचा अंतर पूर्ण करत तसेच तासा बराच रस्ता पार करत आता माझी गाडी Jalna Bus Stand वर रात्री 11:35 वाजता पोहोचली.

जालना या ठिकाणी गाडीचे चालक आणि वाहक दोघांची बदली झाली होती.तसेच Jalna Bus Depot वर diesel भरला जातो. इथून पुढे माझी बस जालना संभाजीनगर हायवेवर जवळपास दोन तास धावत सिडको बस स्टैंड वर रात्री 12:45 वाजता पोहोचली. इथून पुढे पंधरा मिनिटांचा अंतरावर असणारा छत्रपती संभाजीनगर येथे रात्री एक वाजता पोहोचल्यानंतर पुढे नाशिकच्या दिशेने धावू लागली.

आतापर्यंत पुसद ते छत्रपती संभाजी नगर जवळजवळ 300 किलोमीटरचा अंतर पूर्ण झाला होता.संभाजीनगर वरून पुढे आता माझी बस संभाजीनगर नाशिक हायवे वर धावत दौलताबाद या ठिकाणावरून होत पुढे हॉटेल गुरुकृपा येथे चहापाणीसाठी थोडा काळ थांबा घेते.

या ठिकाणावरून नाशिक 83 किलोमीटर अंतरावर स्थित होता.याचा अर्थ असा की जवळपास दोन तासांचा हा प्रवास होता.परत एकदा माझी बस आता हायवेवर धावत वैजापूर या ठिकाणी रात्री 3:15 वाजता पोहोचत पुढे नाशिकच्या दिशेने धावत येवला बस स्टैंड वर सकाळी 4: 00 वाजता छोटासा थांबा घेत पुढे नाशिक बस स्टैंड वर सकाळी 5:00 वाजता पोहोचली.

नाशिक मध्यवर्ती बस स्टैंड वर या ठिकाणी परत एकदा माझे बसचे चालक आणि वाहक या दोघांची बदली झाली.नाशिक बस स्टँड वरून मुंबई पर्यंत मला आता 180 किलोमीटरचा अंतर पार करायचा शिल्लक राहिला होता.

नाशिक मध्यवर्ती बस स्टॅन्ड वरून आता माझी बस नाशिक महामार्ग बस स्टँड वर पोहोचली होती.नाशिक मुंबई हायवे वर धावत माझे बस पूर्ण रात्र प्रवास केल्यानंतर सकाळी 6:30 वाजता हॉटेल ग्रीन व्ह्यू या ठिकाणी चहापाणीसाठी थांबा घेते.

या ठिकाणावरून पुढे आता माझी बस परत एकदा हायवेवर धावत भिवंडी बस स्टैंड वर सकाळी 7:40 वाजता पोचत पुढे ठाणे खोपट बस स्टँडवर सकाळी 8:15 वाजता पोहोचत परत एकदा पुढचा टप्पा गाठण्यासाठी माझी बस धावत मुंबई सेंट्रल बस स्टैंड वर सकाळी 9:15 वाजता पोहोचली.

अशाप्रकारे पुसत ते मुंबई हा जवळपास 700 किलोमीटरचा आणि 17 तासांचा कालावधी चा प्रवास करत मुंबई सेंट्रल ला पोहोचलो होतो.

तर ह्या प्रवासामध्ये मला यवतमाळ नंतर हिंगोली नंतर परभणी नंतर जालना छत्रपती संभाजीनगर नंतर नाशिक तसेच ठाणे आणि मुंबई या सगळ्या जिल्ह्यामधून प्रवास करत ही बस धावली.

जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद.

FAQs

How Much Is Pusad To Mumbai Msrtc Bus Ticket Price?

1180 रुपये

What Is Pusad To Mumbai Distance By Road?

700 किलोमीटर

How Much Time Does It Take To Travel From Pusad To Mumbai?

17 Hours

Leave a Comment