नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉगद्वारे मी केलेला Shegaon To Ujjain या मार्गावरील केलेला प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.
Shegaon To Ujjain हा आंतरराज्य प्रवास ठरला कारण माझी गाडी महाराष्ट्र राज्यातून मध्य प्रदेश राज्यात प्रवास केली. ही गाडी बुलढाणा विभागाचे आणि शेगाव आगाराची होती. या गाडीचा नंबर MH 14 4756 होता.
Table of Contents
Shegaon To Ujjain Distance

Shegaon To Ujjain हा 450 किलोमीटरचा प्रवास ठरला. बरोबर सकाळी 8:00 वाजता फ्लॅट क्रमांक आठ वरून माझी गाडी शेगाव बस स्टँड वरून उज्जैन गाठण्यासाठी निघाली.
फलट क्रमांक आठ वरून शिर्डी, नाशिक, भुसावळ, तुळजापूर, जळगाव, जामनेर, चाळीसगाव, मनमाड, ठाणे, कल्याण, ब्रह्मणपुर आणि उज्जैन ह्या मार्गावर जाणारे गाड्या सुटतात.
ही गाडी शेगाव मार्गे खामगाव, नंदुरा, मलकापूर, मुक्ताईनगर, इच्छापुर, ब्रह्मणपुर, इंदोर आणि शेवटी उज्जैन अशाप्रकारे होता.
शेगाव खामगाव हायवे वर धावत पुढे लासुरा या ठिकाणावरून होत तसेच पुढे खामगाव बस स्टैंड वर सकाळी 8:30 वाजता पोहोचली.
इथून पुढे नांदुराच्या दिशेने मुंबई नागपूर हायवे वरून धावत पुढे सुटाळा नंतर नांदुरा बस स्टैंड वर सकाळी 9:00 वाजता पोहोचली.
इथून पुढे परत एकदा हायवे वरून प्रवास करत वडनेर या ठिकाणावरून होत विश्वगंगा नदीच्या पुलावरून प्रवास करत बहापूरा या ठिकाणावरून होत नंतर मलकापूर स्टँडवर सकाळी 9:30 वाजता पोहोचली.
नांदुरा पासून मलकापूर हा जवळपास 28 किलोमीटरचा अंतर आहे. इथून पुढे माझी बस 30 किलोमीटरच्या अंतरावर असणारा मुक्ताईनगर च्या दिशेने धावू लागली.
इथून पुढे हायवे वरून धावत दसरखेड या ठिकाणी टोलनाका पार करत पुढे घोडसगाव या ठिकाणावरून होत मुक्ताईनगर बस स्टैंड वर फलट क्रमांक 9 इथे सकाळी 10:30 वाजता पोहोचली.
मुक्ताईनगर स्टॅन्ड इथे माझी बस जेवणासाठी थांबा घेते.इथून पुढे माझी बस जळगाव जिल्ह्यात शिरत पुढे प्रवास करत 38 किलोमीटरच्या अंतरावर असणारा ब्रहानपूर या ठिकाणी पोहोचण्यासाठी माझी बस परत एकदा धावू लागली.
तर मित्रांनो पूर्णा नदीवर बांधलेला खामखेडा फुलावरून प्रवास करत पुढे मुक्ताईनगर ब्रहानपूर हायवे वरून धावत तसेच पुढे पुरनाड नंतर पिंपरी भोजना नंतर पुढे मध्यप्रदेश राज्य चा सीमारेषा पार करत माझी बस आता मध्य प्रदेश राज्यात प्रवास करत इच्छापुर या ठिकाणावरून होत पुढे दापोरा शहापूर तसेच पुढे मोहना नदीच्या पुलावरून प्रवास करत नंतर तापी नदी पार करत आता माझी बस बुरहानपुर बस स्टैंड वर दुपारी 12:15 वाजता पोहोचली.
बराणपुर वरून पुढे आता माझी बस इंदोर च्या दिशेने धावत जे येथून 120 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे.
इथून पुढे निंबोला या ठिकाणावरून पुढे बुरानपुर इंदोर हायवे वरून धावत आसीरगड नंतर दहीनाला तसेच पुढे दुल्हार फाटा नंतर छेगाव माखन या ठिकाणी दुपारी 2:00 वाजता पोहोचत पुढे 100 किलोमीटरच्या अंतरावर इंदोर च्या दिशेने धावत देशगाव नंतर धनगाव तसेच बासवा सनावद नंतर मोरटक्का या ठिकाणी हॉटेल वैष्णवी या ठिकाणी जेवणासाठी थांबा घेत 65 किलोमीटरच्या अंतरावर असणारा इंदोर च्या दिशेने पुढे नर्मदा नदीच्या पुलावर प्रवास करत बडवाह इथून होत पुढे बलवारा नंतर चोरल च्या पुढे पुलावरून प्रवास करत तसेच चोराल घाट पार केल्यानंतर बाईग्राम इकडून पुढे भैरू घाट पार करत तसेच पुढे सिमरोल नंतर बस स्टैंड वर संध्याकाळी 6:30 वाजता पोहोचली.
इंदोर बस स्टँडवरून पुढे उज्जैन इंदोर हायवे वरून प्रवास करत रावेर या ठिकाणावरून होत पुढे नेणारा या ठिकाणी टोलनाका पार करत माझी बस आता खेडा बस स्टॅन्ड जे उज्जैन शहरांमध्ये आहे इथे रात्री 8:45 वाजता पोहोचली.
Shegaon To Ujjain Ticket Price
Shegaon To Ujjain हा 525 रुपये तिकीट दर होता जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे. माझा बुलढाणा जिल्हा, जळगाव जिल्हा, बुऱ्हानपूर जिल्हा आणि इंदोर जिल्हा या सगळ्या जिल्ह्यामधून प्रवास पूर्ण झाला.
अशाप्रकारे माझा Shegaon To Ujjain हा जवळपास साडेचारशे किलोमीटरचा आणि 13 तासांचा हा प्रवास पूर्ण झाला.