नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या सोलापूर ते पुणे शिवाई इलेक्ट्रिक बस ने केलेला प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.ही बस सोलापूर मुंबई हायवे वर आपलं पूर्ण प्रवास केला होता.
Table of Contents
Solapur To Pune E-Shivai MSRTC Bus Timetable
सोलापूर ते पुणे जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात
| From | To | Timings | Routes |
| Solapur | Pune | 6:00 (E-Shivai) | Mohol,Tembhurni,Indapur,Bhigwan,Yavat |
ज्या बसने मी प्रवास केला होता ती बस सोलापूर आगाराला मिळालेली पहिली ई शिवाय इलेक्ट्रिक बस होती.ह्या बस मध्ये जे दिलेले सीट आहेत ते भरपूर मऊ आणि सोयीस्कर होते. आपल्या सोयी अनुसार तुम्ही ह्या सीटला ऍडजेस्ट करू शकता. म्हणजे पुढे आणि मागे करू शकता.
सीटच्या समोर हँडल बार आणि वॉटर बॉटल ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे. तसेच दोन्ही सीटच्या मध्ये एक चार्जिंग पॉइंट सुद्धा दिलेला आहे जेणेकरून तुम्ही आपल्या मोबाईलला चार्ज करू शकता.
पाय ठेवण्यासाठी तुम्हाला फूड रेस्ट सुद्धा दिलेला आहे. बरोबर आपल्या डोक्यावर एसी वेंट तसेच रीडिंग लाईट सुद्धा दिलेली आहे. एलईडी मध्ये तुम्हाला सीट नंबर आपल्याला बघायला मिळतो. आपल्या सीटच्या जवळ एक बेल बटन दिलेला आहे जेव्हा तुम्हाला कुठलाही थांबा या स्टॉप वर उतरायचं असेल तर तुम्ही ह्या बेल बटनचा वापर करू शकता.
ह्या बैल बटन दाबल्यानंतर ड्रायव्हर किंवा कंडक्टर यांना एक सिग्नल प्राप्त होतो की तुम्हाला पुढचा स्टॉप वर उतरण्याची इच्छा आहे.
प्रवासामध्ये तुम्हाला संगीत ऐकत आपला प्रवास करावा याच्यासाठी एक स्पीकर सुद्धा दिलेला आहे. या बसला खूप मोठी खिडकी बसवलेली आहे जेणेकरून तुम्ही बसच्या बाहेर पूर्णपणे दृश्य बघू शकता. ही खिडकी सण प्रूफ आहे म्हणजे उन्हाळ्याच्या दिवशी खिडकीच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांना ऊन लागणार नाही.
खिडकीला परदे दिलेले आहेत. प्रत्येक खिडकीच्या बाजूला एक हॅमर सुद्धा दिलेला आहे ज्याचा उपयोग आपत्कालीन संकटाच्या वेळी करता येईल.
या बस मध्ये दोन पुढे आणि मागे सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेले आहेत. अशाच प्रकारे या बस मध्ये दोन ठिकाणी इमर्जन्सी एक्झिट दिलेल्या आहेत पहिली इमर्जन्सी एक्झिट बसच्या वरती आणि दुसरी इमर्जन्सी एक्झिट च्या बाजूला अशाप्रकारे दिलेला आहे.वरती आपल्या सामान किंवा लगेच ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे.
Solapur To Pune Distance

ज्या बसने मी प्रवास केला ती सकाळची पहिली बस होती. सकाळी 6:00 वाजता ही बस आपल्या प्रवासासाठी निघाली.सोलापूर ते पुणे हा एकूण 250 किलोमीटरचा प्रवास ठरला.
ईशिवाय इलेक्ट्रिक बस मध्ये दोन प्रकार आहेत. ईशिवाय इलेक्ट्रिकल बस मध्ये कंडक्टर आणि विना कंडक्टर धावते. मी ज्या बसने प्रवास केला ती त्या बसमध्ये कंडक्टर दादा होते.
Solapur To Pune Ticket Price of E Shivai Bus
Solapur To Pune Ticket Price of E-Shivai Bus सोलापूर ते पुणे शिवाई बस मध्ये तिकीट चा दर 550 रुपये होता.
सोलापूर बस स्टँड मधून बाहेर पडत छत्रपती संभाजी महाराज चौकातून होत माझी बस सोलापूर पुणे हायवेवर धावत असताना कोंडी या ठिकाणावरून होत पुढे सावळेश्वर या ठिकाणी असणारा टोल नाका पार करत पुढे सीना नदीवर बांधलेला पुलावरून धावत मोहोळ बस स्टैंड वर सकाळी 7:00 वाजता पोहोचली.
मोहोळ बस स्टॅन्ड हा माझ्या मार्गावर असणारा पहिला बस स्टँड थांबा होता.
मोहोळ बस स्टँड मधून बाहेर पडत परत एकदा माझी बस हायवेवर धावत शेटफळ इथून पुढे बराच काळ हायवेवर धावत टेंभुर्णी या बस स्टैंड वर सकाळी 8:00 वाजता सोलापूरपासून 90 किलोमीटरचा अंतर पार करत पोहोचली होती.
टेंभुर्णी बस स्टँड वरून मला आता 167 किलोमीटरचा अंतर पार करायचा होता. टेंभुर्णी हा माझी प्रवासा मार्गावरील दुसरा थांबा होता.
टेंभुर्णी बस स्टँड वरून परत एकदा माझी बस हायवेवर धावत आडेगाव या ठिकाणावरून होत उजनी या ठिकाणी असणारे भीमा नदीच्या पुलावरून धावत पुढे सरडेवाडी या ठिकाणी असणारा टोल नाका ओलांडून इंदापूर बस स्टैंड वर 8:15 वाजता पोहोचली.
इंदापूर बस स्टॅन्ड हा पुणे जिल्हा अंतर्गत मोडतो. इंदापूर बस स्टँड वरून परत एकदा माझी बस हायवेवर धावत पळसदेव इथून उजनी धरण कडून पुढे डाळज इथे जेवण्यासाठी माझी बस थांबा घेते.
डाळज पासून पुणे हे 113 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. ज्याला कमीत कमी तीन तासांचा कालावधी लागला.
हायवेवर बराच काळ धावल्यानंतर माझी बस आता भिगवण बस स्टैंड वर सकाळी 9:15 वाजता पाहोचली. इथून पुढे माझी बस परत एकदा हायवेवर धावत कुरकुंभ या ठिकाणावरून होत पाटस येथे टोल नाका ओलांडून बरच काळ हवेवर धावत यवत या ठिकाणावरून पुढे उरळी कांचन इथून पुढे कुंजीरवाडी कडून पुढे हडपसर नंतर शेवटी स्वारगेट बस स्टँड वर सकाळी साडेअकरा वाजता पोहोचली.
अशाप्रकारे माझा सोलापूर ते पुणे ही शिवाय बस ने केलेला प्रवास पूर्ण झाला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा.
FAQs
How Much Is Solapur To Pune By E-Shivai Msrtc Bus Ticket Price?
550 रुपये
What Is Solapur To Pune By E-Shivai Distance By Road?
250 किलोमीटर