Indore To Jalna Msrtc Bus Timetable|Ticket|Distance

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे Indore To Jalna MSRTC Bus Timetable Sleeper Bus Cum Seater Bus द्वारे केलेला प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.

Indore To Jalna Distance By Road

Indore To Jalna Distance By Road

Indore to Jalna distance by road जवळपास 600 किलोमीटरचा आहे. तर मित्रांनो फलट क्रमांक 8 वरून माझी बस रात्री 8:00 वाजता आपला प्रवास सुरू करण्यासाठी इंदोर सरवटे बस स्टँड मधून बाहेर पडली. फलट क्रमांक आठ वरून शेगाव, जालना, धुलिह्या, शिर्डी, औरंगाबाद ,मलकापूर, पुणे आणि नाशिक ह्या सगळ्या मार्गावर जाणाऱ्या गाड्या सुटतात. ह्या बस स्टँडवर महाराष्ट एसटी वेळापत्रक लावलेला दिसेल.

गाडीने मी प्रवास केला ती गाडी जालना आगाराची आणि जालना विभागातली होती.ह्या गाडीचा नंबर MH 09 FL 0970 होता.

Indore To Jalna MSRTC Ticket Price

Indore To Jalna MSRTC Ticket Price जवळपास 800 रुपये आहे जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे ह्याची नोंद घ्यावी.

ह्या गाडीचा मार्ग इंदूर पासून खांडवा, मुक्ताईनगर, मलकापूर, बुलढाणा आणि शेवटी जालना अशा प्रकारे होता.

Indore To Jalna Msrtc Bus Timetable

Indore To Jalna Msrtc Bus Timetable

खाली दिलेल्या माहिती अनुसार Indore To Jalna Msrtc Bus Timetable आहे.

FromToTimingsRoutes
Indore  Jalna 20:00 Khandwa, Muktainagar, Malkapur, Buldhana

इंदोर शहरातून प्रवास करत पुढे खांडवा इंदोर हायवे वरून धावत सीमरोल नंतर भैरू घाट पार करत पुढे चोरल नंतर थोड्याच अंतरावर भगवान सेठ का ढाबा ह्या ठिकाणी जेवणासाठी रात्री 9:40 वाजता थांबली.

खांडवा जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करत पुढे बलवाडा नंतर बडवाह नंतर नर्मदा नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस खांडवा बस स्टैंड वर रात्री 12:30 वाजता पोहोचली. इथून पुढे 75 किलोमीटरच्या अंतरावर बुरहानपुर गाठण्यासाठी माझी बस इथून निघाली.

दुल्हार फाटा कडून पुढे खांडवा बुरहानपुर हायवेवरून सुसाट वेगाने धावत पुढे बोरगाव बुजुर्ग नंतर बुऱ्हानपूर बस स्टैंड वर रात्री 2:15 वाजता पोहोचत आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी परत एकदा धावू लागले.

इंदोर पासून बुरहानपुर जवळ जवळ 200 किलोमीटरचा अंतर माझा पार झाला होता. येथून पुढे 15 किलोमीटरचा अंतरावर महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस माझी बस धावत धामणी नदीचा पूल पार करत पुढे इच्छापुर नंतर खामखेडा ह्या ठिकाणी पूर्णा नदीचा पूल पार करत माझी बस आता मुक्ताईनगर बस स्टैंड वर रात्री 3:10 वाजता पोहोचली.

ह्या ठिकाणी गाडीचे चालक आणि वाहक यांची बदली झाली.

इथून पुढे मुक्ताईनगर मलकापूर हायवेवरून प्रवास करत घोडसगाव नंतर दसरखेड ह्या ठिकाणी टोल नाका पार करत पुढे मलकापूर बस स्टैंड वर 3:50 वाजता पोहोचत दाताळा नंतर पुढे मलकापूर बुलढाणा हायवे वरून धावत मोताळा नंतर राजुरा घाट पार करत माझी बस बुलढाणा बस स्टैंड वर सकाळी 4:45 वाजता पोहोचली.

बुलढाणा ते जालना चा अंतर जवळपास 110 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. हा आंतर गाठण्यासाठी जवळपास अडीच तासांचा कालावधी लागतो.

इथून पुढे बुलढाणा चिखली हायवे वरून धावत माझी बस चिखली बस स्टँडवर सकाळी 5:40 वाजता पोहोचली. इथून पुढे चिखली जालना हायवे वरून प्रवास करत मेरा खुर्द नंतर देऊळगाव मही नंतर पूर्णा नदीचा पूल पार करत पुढे वाघरूळ नंतर माझी बस आता शेवटी जालना बस स्टैंड वर सकाळी 7:15 वाजता पोहोचली.

  • Distance: 600 किलोमीटर
  • Routes: Khandwa, Muktainagar, Malkapur, Buldhana
  • Timings: 20:00
  • Travel Duration: 11 Hrs
  • Ticket Price: 800 Rupees

अशाप्रकारे इंदोरे ते जालनाचा हा आकरा तासांचा माझा प्रवास पूर्ण झाला.

FAQs

What is Indore To Jalna Distance By Road?

600 Kilometer

Leave a Comment