नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये आज मी तुम्हाला माझा Kalyan to Malkapur चाळीसगाव मार्गे ह्या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.
कल्याण हा ठाणे जिल्ह्यातील एक ठिकाण आहे. MSRTC Bus कल्याण वरून मलकापूर साठी सकाळी 5:30 वाजताची होती .ह्या बसने तुम्ही रिझर्वेशन करून सुद्धा प्रवास करू शकता.
Table of Contents
Kalyan To Malkapur Distance

ह्या मार्गावरील मला जवळपास 450 km चा पल्ला गाठावा लागला . ही गाडी खूप लांब पल्याची आहे.
माझी MSRTC Bus विठ्ठलवाडी वरून आली होती .विठ्ठलवाडी वरून जो सुटण्याचा टाइमिंग तो 4:45 मिनिटं अशाप्रकारे आहे . तर कल्याण बस स्टैंड वर इथे सकाळी 5:30 वाजता पोहोचते.Kalyan Bus Stand Timetable पाहण्यसाठी इथे click करा.
कल्याण बस स्टैंड वर पाच च्या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी बरेच गाड्या लागलेले असतात.पहिली बस आहे ती कल्याण-अकोला गाडी. दुसरी बस आहे नगर वरून ही गाडी आली होती कल्याणला. आता कल्याण वरून ही गाडी गेली पाच च्या दरम्यान नगर साठी आणि दुसरी बस आली होती ती विठ्ठलवाडी-कल्याण लातूर बस आणि लातूरच्या पलीकडे अजून एक बस लागली होती ती म्हणजे कल्याण-विजापूर.
तर मित्रांनो शेवटी MSRTC Bus बरोबर 5:20 मिनिटांनी कल्याण बस स्टॅन्डला पोहोचली आणि ही गाडी विठ्ठलवाडी वरून निम्मी भरून आलेली होती. गाडी चांगल्या प्रकारे सजवलेली होती . काचेवर मोठा असा स्टिकर दिलेला होता सप्तशृंगी एक्सप्रेस.
ह्या गाडीचा मार्ग विठ्ठलवाडी,कल्याण,नाशिक,मालेगाव,चाळीसगाव,पाचोरा,जामनेर,बोधवड आणि मलकापूर अशाप्रकारे आहे.गाडीचा नंबर MH 14 AL 4017 होता .
तर बरोबर 5:30 वाजता माझी गाडी कल्याण बस स्टँड वरून आपल्या प्रवासाला सुरू करते.highway वर बराच काळ धावल्यानंतर बरोबर 5:51 मिनिटांनी MSRTC Bus भिवंडीला पोहोचलेली होती.
MSRTC Bus वरती पॅसेंजर एन्ट्री करताना काचेवर तुम्हाला रूट्स दिसतील वरती लिहिलेले होतं विठ्ठलवाडी, नाशिक ,मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, बोधवड आणि मलकापूर.
ह्या MSRTC Bus बॅक साईडला सुद्धा स्टिकर दिलेला आहे विठ्ठलवाडीची राणी. गाडी एकदम उठून दिसते.
भिवंडी ह्या ठिकाणावरून पुढे मुंबई नाशिक हायवे वरून धावायला सुरू करत शहापूर ह्या ठिकाणी सकाळी 7:00 वाजता पोहोचल्यानंतर पुढचा टप्पा गाठण्यासाठी परत एकदा हायवेवर बरच काळ धावल्यानंतर खर्डी ह्या ठिकाणावरून होत माझी गाडी नाश्त्यासाठी खर्डी च्या पुढे बरोबर 7:26 वाजता थांबते.
इथून पुढे परत एकदा माझे बस प्रवासासाठी सुरू करत असताना गाडीच्या मार्गावरील कसारा घाट पार केल्यानंतर मुंबई नाका इथून पुढे नाशिक शहरातून वाट काढत नाशिक मेळा बस स्टैंड वर सकाळी 9:30 वाजता पोहोचली.
कल्याण वरून जवळ जवळ 130 किलोमीटर च्या अंतर घाट गाठत मी पोहोचलो होतो नाशिक बस स्टँडवर.नाशिकला पोहोचता पोहोचता तर तीन तासांचा कालावधी लागलेला होता.
नाशिक नंतर मालेगावला गाडी गेली आणि मालेगाव नंतर ते थोडाफार रूट चेंज झाला. MSRTC Bus थांबली होती फलाट क्रमांक 10 जिथे चाळीसगाव, बाडगाव ,जामनेर, पाचोरा जाण्यासाठीच बसेस लागतात.
नाशिक बस स्टॅन्ड वरून पुढे माझी MSRTC Bus नाशिक मालेगाव ह्या हायवेवर धावत हायवे वर लागणारा चांदवड ह्या गावावरून होत राहुड घाट पार करत तसेच पुढे मालेगाव येथे गिरणा नदीवर बांधलेला पुलावरून प्रवास करत मालेगाव बस स्टँड वर दुपारी 12:00 वाजता पोहोचली .
मालेगाव नंतर माझी MSRTC Bus जाणार होती चाळीसगावला.चाळीसगावचं जे अंतर आहे ते जवळपास 60 km अंतर आहे. ह्या मार्गावरील 350 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिला होता .
Kalyan To Malkapur MSRTC Bus Ticket Price
Kalyan to Malkapur चा टिकीट दर ₹830 रुपये अशाप्रकारे होता.तर मित्रांनो बरोबर 12:00 च्या दरम्यान MSRTC Bus चाळीसगाव साठी रवाना झाली. परत एकदा मालेगाव चाळीसगाव ह्या हायवेवर धावत दहिवाळ ह्या गावावरून पिलखोड येथे गिरणा नदीवरून पुढे टाकळी ह्या गावावरून होत चाळीसगाव बस स्टैंड वर दुपारी 1:30 वाजता पाहोचली .ह्या रोड वरचा हा तिसरा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा.
आता इथून बस जाते कचगाव,भडगाव आणि पाचोरा टोटल अंतर बघायचं झालं तर 50 km चा समथिंग माझा प्रवास राहिला होता.चाळीसगावच्या आजूबाजू प्रसिद्ध पर्यटन स्थळ बघायचं झालं तर वेरूळ आणि अजिंठा हे दोन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत.
चाळीसगाव बडगाव ह्या हायवे वरून पुढे पाटोंदा हा गाव करत कजगाव ठिकाणावरून होत भडगाव बस स्टैंड वर दुपारी 2:30 वाजता पोहोचली.इथून पाचोऱ्याचं जे अंतर आहे ते 13 km अशा प्रकारे आहे.हा बस स्टॅन्ड जळगाव जिल्हा अंतर्गत मोडतो .
भडगाव बस स्टँड पासून पुढे पाचोरा बस स्टैंड वर दुपारी 3:00 वाजता पाहोचली.पाचोरा बस स्टॅन्ड ला एकूण आठ फलट दिलेले आहेत.
मलकापूर हा पाचोरा पासून 150 किलोमीटर अंतर शिल्लक राहिला होता. ज्याला कमीत कमी तीन तास चा कालावधी लागला.
पाचोरा बस स्टँड लगत पाचोरा डेपो दिलेला आहे. पाचोरा पासून जळगाव पर्यंत जो अंतर आहे ते कमीत कमी 50 किलोमीटर अशा प्रकारे आहे आणि भुसावळ 45 किलोमीटरच्या अंतरावर आहे.
पाचोरा बस स्टॅन्ड वरून पुढे MSRTC Bus प्रवासाला सुरू करत असताना पाचोरा जामनेर ह्या रस्त्यावरून पुढे जाते.जास्त ग्रामीण भाग पार केल्यानंतर वरखेडी ह्या ठिकाणावरून पुढे खडतड भागातून होत मालखेडा ह्या गावावरून होत नंतर शेंदुर्णी ह्या ठिकाणी छोटासा थांबा घेत पुढे पहुर इथे पोहोचते .
येथून मी निघालो जामनेरच्या दिशेने त्याच्यानंतर बोधवड आणि बोधवडचं जे अंतर आहे ते 40 किलोमीटर आहे इथून आणि जामनेर 14 किलोमीटर आहे इथून.
ह्या ठिकाणी कापूस चा भरपूर प्रमाण बघायला मिळेल. पाचोरा जामनेर ह्या हायवेवर धावत माझी MSRTC Bus आता जामनेर बस स्टैंड वर दुपारी 4:35 वाजता पोहोचली. जामनेर हा जळगाव जिल्हा अंतर्गत येतो.
जामनेर ते मलकापूर चा अंतर जवळजवळ 53 किलोमीटरचा शिल्लक राहिला होता. जामनेर तसं बघायला गेलं तर फार मोठा आहे.
इथं जामनेर बस स्टॅन्ड इथे नियंत्रक कक्ष आहे म्हणजे चौकशी कक्ष तसेच स्थानक प्रमुख हिरकणी कक्ष त्याच्यानंतर बरेच सुविधा इथे दिलेल्या आहेत.
जामनेर येथे तुम्हाला सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघायला मिळेल. जामनेर बस स्टँड पासून पुढे जामनेर बोदवड ह्या रस्त्यावरून धावत रस्त्यावरून लागणारे बरेच वळण पार करत बोदवड बस स्टैंड वर संध्याकाळी 5:30 वाजता पोहोचली .
पाचोरा नंतर जो रोड होता तो सिंगल होता आणि थोडासा खराब होता का तर पाचोराला तेव्हा थोडासा रोडचं काम चालू होता. इथून पुढे बोदवड मलकापूर ह्या अरुंद रस्त्यावरून होत राजुर ह्या गावावरून होत ऐनगाव ह्या ठिकाणावरून ग्रामीण भागातून तसेच कच्च्या रस्त्यावरून होत जांभूळढाबा इथून पुढे मलकापूर बस स्टैंड वर संध्याकाळी सहा वाजता पोहोचले .
Kalyan To Malkapur MSRTC Bus Final Destination
अशाप्रकारे तब्बल तेरा तासांचा हा माझा प्रवास पूर्ण केला.जवळजवळ ह्या प्रवासासाठी मला तब्बल 13 तासांचा कालावधी लागलेला होता,तर ह्या रोडवर एकदम तुफान गर्दी होती. विठ्ठलवाडी ते मलकापूर ह्या रोडवर जे टोटल जिल्हे आलेले जिथून मी प्रवासाला सुरुवात केली होती ते होते ठाणे जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव आणि जळगाव नंतर फायनल जिल्हा बुलढाणा.
आता हीच गाडी मलकापूर वरून उद्या सकाळी 7:30 ला लागते विठ्ठलवाडीसाठी.तुम्हाला हा ब्लोग कसा वाटला निक्कीच सांगा.