नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या Kolhapur To Roha हिरकणी बस ने चिपळूण मार्गे ह्या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.
माझ्या गाडीचा नंबर MH 14 KQ 3964 अशाप्रकारे होता. ही गाडी बुकिंग गाडी पण आहे. ह्या गाडीचा मार्ग कोल्हापूर पासून कराड,पाटण ,चिपळूण, महाड, माणगाव आणि शेवटी रोहा अशाप्रकारे आहे.
Table of Contents
Kolhapur To Roha Distance

ह्या कोल्हापूर ते रोहा MSRTC Bus द्वारे 313 किलोमीटर चा अंतर गाठण्यासाठी कमीत कमी आठ तास चा कालावधी लागला. इथे click करून Kolhapur Bus Stand Timetable बघू शकता.
Kolhapur To Roha Ticket Price
Kolhapur To Roha ह्या मार्गावरील तिकिटाचा दर 715 रुपये अशाप्रकारे आहे. कोल्हापूर वरून ही गाडी संध्याकाळी सात वाजता निघते. कोल्हापूर बस स्टैंड मधून बाहेर पडल्या नंतर थोडाच वेळेत पुणे बेंगलोर एक्सप्रेस हायवेवर धावता माझी गाडी आता पंचगंगा नदीच्या पुलावरून धावत होती.
पुढे हायवे लगत असणारा शिरोली ह्या ठिकाणावरून होत वाठार तर्फ वडगाव इथून थांबा घेत पुढे नाक्यावरून बराच अंतर गाठल्यानंतर हायवेवरच लागणारा अजून एक गाव इटकरे येथून पुढे पेठ तसेच नेरला ह्या दोन ठिकाणावरून पुढे कराड शहरच्या अगोदर सर्कल जवळ कोल्हापूर नाका येथे थांबा घेत एक किलोमीटरचा अंतरावर असणारा कराड बस स्टँडवर रात्री 8:45 वाजता पोहोचली.
कराड बस स्टैंड वर पंधरा मिनिटांचा थांबा घेत फलट क्रमांक 17 वरून सुटल्यानंतर आता ही गाडी चिपळूणच्या दिशेने धावायला सुरू करत असताना विहे ह्या गावावरून होत तसेच अबदरवाडी नंतर नवा रस्ता ह्या ठिकाणावरून थोडाच अंतरावरच पुढे पाटण बस स्टँडवर पोहोचल्यानंतर पुढच्या प्रवासासाठी हेळवाक ह्या ठिकाणी कोयना नदीच्या पुलावरून प्रवास करत चिपळूणच्या दिशेने धावायला सुरू करते.
ह्या मार्गावर पायताचा वाडा त्या ठिकाणावरून पुढे कोयनानगर बस स्टँड येथे रात्री 10:45 वाजता जेवणासाठी थांबा घेते. ह्या ठिकाणावरून पुढे कुंभार्ली घाट मार्गे चिपळूण तासभराचा रस्ता होता. कोयनानगर बस स्टँड पासून पुढे चिपळूण 41 किलोमीटरचा अंतर आहे.
कोयनानगर बस स्टँड पासून पुढे घाटमाथा ह्या ठिकाणावरून होत कुंभार्ली घाट पार करायला सुरू करते. कुंभार्ली घाट पूर्णपणे चढल्यानंतर चिपळूण बस स्टैंड वर रात्री बरोबर 12:15 वाजता पोहोचली.
चिपळूण मध्ये गाडीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर ची बदली होते. चिपळूण नंतर पुढचा स्टॉप महाड होता. चिपळूण बस स्टँड सोडल्यानंतर माझी गाडी पुढच्या प्रवासासाठी धावायला सुरू करत असताना तुलाशी ह्या गावावरून होत तसेच पुढे कमीत कमी अडीच तास चा प्रवास पूर्ण केल्यानंतर रात्री 2:20 वाजता महाड बस स्टैंड वर पोहोचले.
महाड बस स्टॅन्ड वरून पुढे माणगाव रस्त्यावरून बराच काळ प्रवास केल्यानंतर म्हणजे जवळजवळ एक तास चा प्रवास करत माणगाव बस स्टैंड वर माझी MSRTC Bus पोहोचली.
Kolhapur To Roha Final Destination
माणगाव बस स्टँड पासून पुढे इंदापूर ह्या गावावरून होत शेवटी रोहा ह्या ठिकाणावर सकाळी चार वाजता पोहोचली. अशाप्रकारे जवळजवळ आठ तासाचा प्रवास करत मी रोहा बस स्टैंड वर आलो.
तुम्हाला हा Kolhapur To Roha प्रवास कसा वाटला याच्याबद्दल मला माहिती द्या आणि आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना ह्या ब्लॉग बद्दल आणि वेबसाईट बद्दल शेअर करा धन्यवाद.