नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये Ratnagiri To Ambejogai ह्या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.
Table of Contents
Ratnagiri To Ambejogai MSRTC Bus Timing
Ratnagiri To Ambejogai ह्या मार्गावर असणारे MSRTC Bus ही सकाळी 7:30 वाजता रत्नागिरी बस स्टॅन्ड इथून सुटते तर जसे की तुम्हाला माहित आहे की मी नेहमीप्रमाणे अर्धा एक तास बस स्टँडवर लवकर पोहोचतो.Ratnagiri Bus Stand Timetable पाहण्यसाठी click करू शकता.
Ratnagiri To Ambejogai Distance

Ratnagiri To Ambejogai हा माझा सर्वात लांब पल्ला प्रवास ठरला. Ratnagiri To Ambejogai पर्यंतचा अंतर जवळ जवळ 510 किलोमीटर होता. ह्या रूटवर कमीत कमी मला 11 तास प्रवास करावा लागला.
रत्नागिरी ह्या जिल्ह्यात दोन अशा बस स्टॅन्ड आहेत. ह्या रत्नागिरी बस स्टॅन्ड ला एकूण 12 फलाट दिलेले आहेत. Ratnagiri To Ambejogai ह्या मार्गावर मला कमीत कमी 14 टप्पे आढळले.
Ratnagiri To Ambejogai चा मार्ग रत्नागिरी पासून कोल्हापूर, सांगली, मिरज, पंढरपूर, बार्शी, कळंब, येरमाळा आणि शेवटचा टप्पा आंबेजोगाई काही अशा प्रकारे होता.
Ratnagiri To Ambejogai ही बस रत्नागिरी बस स्टॅन्ड वर असणारा फलट क्रमांक तीन वरून सुटते. ही गाडी बार्शी मार्गे प्रवास करते.
तर ठरवल्याप्रमाणे माझी MSRTC Bus आता रत्नागिरी बस स्टँड वरून बरोबर 7:30 वाजता प्रवास करायला निघते.
सकाळच्या ह्या निर्मल वातावरण मध्ये MSRTC Bus आता रोडवर मारुती मंदिर सर्कल येथून कुवारबाव ह्या ठिकाणावरून होत धावायला सुरू करते.
Ratnagiri to Amebjogai MSRTC Bus Ticket Price
Ratnagiri To Ambejogai पर्यंत तिकीट चा दर 766 रुपये अशाप्रकारे आहे.हातखंबा ह्या नाक्यावरून मुंबई गोवा हायवेवर धावत पुढे पाली बस स्टँड वर फलट क्रमांक एक वर पोहोचली.ह्या बस स्टॅन्ड ला एकूण चार फलट दिलेले आहेत. बस स्टँड आतला परिसर म्हणजे जमीन ही मातीची आहे.
पाली बस स्टॅन्ड वरून पुढे माझी बस कोकण भागातील झाडेझुडपे असणारे रस्त्यावरून होत नानिज ह्या खेडेगावातून होत पुढे छोटासा घाटे वरचा रस्ता पार करत दाभोळे बुद्रुक घाटे वर असणारा हा एक छोटासा खेडेगाव इथून कोंडगाव ह्या ठिकाणी तसेच छोटासा गावामध्ये असणारा अरुंद रस्त्यावरून तसेच गर्दीतून वाट काढत साखरपा बस स्टैंड वर सकाळी 9:00 वाजता पोहोचली.
साखरपा बस स्टँड पासून पुढे परत एकदा घनघाट जंगलीतून वाट काढत तसेच वाकड तिकडं रस्त्यावरून सावकाशपणे धावत आंबा घाट इथून पुढे घाटेच्या पायथ्याशी असणारा चांडोली ह्या गावावरून होत येळाणे इथे चार फलट असणारा मलकापूर बस स्टैंड वर फलट क्रमांक चारवर सकाळी 10:00 वाजता पोहोचली.
मलकापूर बस स्टँड पासून कोल्हापूर हा 48 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. जो जवळपास तासभराचा रस्ता होता.
ह्या मार्गावरचा मलकापूर बस स्टॅन्ड वरचा तिसरा टप्पा होता. आतापर्यंत रत्नागिरी पासून 84 किलोमीटरचा पल्ला पार केला होता.
पंधरा मिनिटं थांबल्यानंतर आता माझी MSRTC Bus मलकापूर ह्या बस स्टँडवरून पुढे प्रवास करायला सुरू करता शाहूवाडी ह्या रस्त्यावर असणारा बस स्टॉप वर थांबलेल्या प्रवासांना घेत बराच काळ धावल्यानंतर करंजोशी ह्या छोट्याशा गावावरून होत त्याच्यानंतर छोटासा नगर असणारा बांबवडे इथून पुढे केर्ले आणि आंबेवाडी ह्या दोन गावा पार करत कोल्हापूर येथे पंचगंगा नदीवर बांधलेला पुलावरून जात कोल्हापूर शहरात प्रवास केल्यावर राजाराम महाराज यांच्या पासून पुढे कोल्हापूर बस स्टैंड वर फ्लॅट क्रमांक पाचवर 11:30 वाजता पोहोचली.
रत्नागिरी ते कोल्हापूर बस स्टँड पर्यंत 134 किलोमीटरचा पल्ला पार झाला होता. कोल्हापूर हा आपला मार्गावरचा चौथा क्रमांक चा टप्पा होता.
कोल्हापूर बस स्टँड पासून पंढरपूर हा 180 किलोमीटरचा पल्ला आहे. तसेच पंढरपूर पासून पुढे बार्शी आंबेजोगाई ह्या मार्गावर आपली बस धावली.
कोल्हापूर बस स्टँड पासून पुढे आता सांगली मिरज ह्या मार्गावर माझी बस धावली. कोल्हापूर बस स्टँड बाहेर पडल्यावर लगेच छत्रपती महाराणी ताराबाई पुतळ्या पासून एक सर्कल पार करत परत एकदा सांगलीच्या दिशेने धावता पंचगंगा नदीवर बांधलेला अजून एक दुसरा लोखंडी पुलावरून होत हर्ले ह्या ठिकाणा नंतर रस्त्याच्या लगत बांधलेला हातकणंगले बस स्टँडवर थोडा अंतराळ थांबल्यानंतर पुढे जयसिंगपूर बस स्टैंड वर दुपारी एक वाजता पोहोचली.
आतापर्यंत 156 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला होता. जयसिंगपूर बस स्टँड वरून पंढरपुर १४१ किलोमीटर चा अंतर राहिला होता. जयसिंगपूर हा आपल्या मार्गावरचा सहावा टप्पा होता.
जयसिंगपूर वरून अंकली ह्या ठिकाणी कृष्णा नदीवर बांधलेला पुलावरून होत माझा सातवा स्टॉप म्हणजे सांगली ह्या बस स्टँडवर पोहोचली तसेच कमी अंतरावर असणारा मिरज बस स्टैंड वर फलट क्रमांक चार वरती दुपारी दोन वाजता पोहोचली.
मिरज बस स्टॅन्ड वरून पंढरपूर 128 किलोमीटरचा पल्ला शिल्लक राहिला होता ज्याला कमीत कमी 3 तास लागले.
बराच काळ मिरज बस स्टँड वर थांबल्यानंतर आता माझी गाडी पुढचा प्रवास करण्यासाठी सुरू करते. बराच काळ एका जबरदस्त हायवे वरून धावत बोरगाव येथे लागणारा टोल नाका पार करत शिरढोण हा हायवे लगत असणारा ठिकाणावरून पुढे नागज फाटा तसेच जुनोनी ह्या गावावरून होत अंकदळ येथे हायवे वर लागणारा टोल नाका पार करत सांगोला बस स्टैंड वर दुपारी 4:15 वाजता पोहोचली. ह्याच बस स्टॉप वर जेवणासाठी थांबली होती.
सांगोला बस स्टँड वरून पंढरपूर आता 28 किलोमीटर होता. सांगोला बस स्टँड सोडल्यानंतर पुढे मांजरी ह्या गावावरून होत पंढरपूर येथे सांगोला नाक्यावरून पुढे पंढरपूर बस स्टँडवर संध्याकाळी पाच वाजता फलट क्रमांक पाच वर पोहोचली.
पंढरपूर बस स्टँडवरून पुढे माझी MSRTC Bus बार्शी मार्गे आंबेजोगाईला निघाली. आतापर्यंत रत्नागिरी ते पंढरपूर कमीत कमी 300 किलोमीटरचा प्रवास माझा झाला होता.पंढरपूर हा आपल्या मार्गावरचा दहावा टप्पा होता.
पंढरपूर बस स्टँड पासून पुढे आता परत एकदा माझी बस पुढचा टप्पा गाठण्यासाठी तैयार झाली.
पंढरपूर बस स्टँड पासून पुढे आता परत एकदा माझी MSRTC Bus पुढचा टप्पा गाठण्यासाठी तैयार होते. ह्या प्रवासात पुढे चंद्रभागा नदीवर बांधलेला पुलावरून धावत आढीव आणि आष्टी ह्या गावावरून होत पुढे बराच काळ पळाली.
पुढे शेटफळ येते असणारा उडान पूल च्या खालून पलीकडे जाऊन पुढचा टप्पा गाठण्यासाठी धावायला सुरू केली. अशाच प्रकारे कुर्डूवाडी बस स्टैंड वर संध्याकाळी 6:16 वाजता पोहोचली.
कुर्डूवाडी ते आंबेजोगाई चा प्रवास 147 किलोमीटरचा अशा प्रकारे आहे. हा रस्ता कमीत कमी साडेतीन तासाचा आहे. आतापर्यंत रत्नागिरी ते कुर्डूवाडी बस स्टँड 354 किलोमीटरचा प्रवास झाला होता. Ratnagiri To Ambejogai ह्या मार्गावरचा हा अकरावा बस स्टॅन्ड होता.
मला अजून 150 किलोमीटरचा प्रवास करायचा शिल्लक राहिलेला होता.
कुर्डूवाडी शहरातून बाहेर पडताना दोन्हीकडे शेती असणारा अरुंद रस्त्यावरून माझी MSRTC Bus सावकाशपणे पुढे निघत होती. बरच काळ प्रवास केल्यानंतर रिधोरे ह्या गावावरून होत. बार्शी इथे जिजाऊ चौक येथून तसेच भोसले चौक ह्या दोन्ही चौका वरून होत बार्शी बस स्टॅन्ड आपल्या मार्गावरचा 12 वा टप्पा येथे रात्री 7:45 वाजता पोहोचली. बार्शी ह्या बस स्टैंड वर वेगवेगळ्या ठिकाणी फलट दिलेले आहेत. बार्शी पासून कळम 55 किलोमीटर चा अंतर आहे.
बार्शी पासून येरमाळा तसेच पुढे कळंब अशाप्रकारे आंबेजोगाई पर्यंत हा मार्ग होता. बार्शी पासून आंबेजोगाई 108 किलोमीटरचा अंतर राहिला होता ज्याला कमीत कमी अडीच तास चा प्रवास करावा लागला.
आतापर्यंत 386 किलोमीटरचा पल्ला पार केलेला होता. अशाच प्रकारे बार्शी बस स्टॅन्ड पासून पुढे धावता कुसलंब ह्या गावावरून होत तसेच पिंपळवाडी हा गाव करत येरमाळा बस स्टैंड वर रात्री 08:30 वाजता पोहोचली.
इथून पुढे कळंब मार्गे आंबेजोगाई चा प्रवास शिल्लक राहिला होता ज्याला कमीत कमी दोन तास चा प्रवास करावा लागला.
येरमाळा बस स्टॅन्ड हा माझ्या मार्गावरचा तेरावा बस स्टॅन्ड होता. येरमाळा पासून कळंब हा 30 किलोमीटरचा अंतर आहे.
ह्या मार्गावर धावता आंदोरा ह्या गावावरून होत कळंब बस स्टँड येण्याच्या अगोदर पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून कळंब बस स्टैंड वर रात्री 9:00 वाजता पोहोचली. कळंब बस स्टँड वर सहा फलट दिलेले आहेत.
कळंब बस स्टॅन्ड वरून पुढे आंबेजोगाई जाण्यासाठी माझी MSRTC Bus धावायला सुरू करते. इथून पुढे माळेगाव ह्या ठिकाणावरून होत युसुफ वडगाव ह्या गावावरून पुढे बराच काळ धावल्यानंतर दिगुल आंबा नंतर लोखंडी सावरगाव इथून शेवटी वीर सावरकर चौक पासून पुढे आंबेजोगाई बस स्टैंड वर रात्री 10:15 वाजता पोहोचली.
Ratnagiri To Ambejogai MSRTC Bus Final Destination
अशाप्रकारे जवळ जवळ 510 किलोमीटरचा Ratnagiri To Ambejogai हा प्रवास पूर्ण झाला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद