Shegaon To Chandrapur Bus|शेगाव ते चंद्रपूर थेट बस

Shegaon To Chandrapur Bus

जय महाराष्ट्र आणि नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या Shegaon To Chandrapur bus प्रवास बद्दल सांगणार आहे. शेगाव हा बुलढाणा जिल्ह्यातील एक शहर आहे.

शेगावच्या बस स्टॅडवर तिथून माझ्या प्रवासाची सुरुवात झाली चंद्रपूर ला जायला.बरोबर सकाळी ७:३० मी Shegaon bus स्टॅडवर पोहचलो.

Shegaon Bus Stand

शेगाव वरून चंद्रपूर जाण्यासाठी मला जी बस लागली ती फलाट क्रमांक २ ला बरोबर ८ वाजताची बस होती. Shegaon To Chandrapur जवळपास अंतर बघायच झालं तर ४०० किलो मीटरचा माझा प्रवास होता.

Shegaon Bus Stand वर प्रवासांसाठी थ्री बाय थ्री च्या स्टेलनेसस्टील seats लावलेले दिसल्या आणि एक नियंत्रितकक्ष पण तुम्ही तिथ गेल्यावर दिसेल.

ह्या बस स्टॅडवर फलाट क्रमांक १ पासून ते फलाट क्रमांक ६ त्याच्या नंतर फलाटची दुसरी बाजू फलाट क्रमांक ७ पासून ते फलाट क्रमांक १२ अश्या प्रकारे होता. Shegaon Bus Stand वर गेल्यावर तुम्हाला येणारे आणि जाणारे  गाड्यांचा Shegaon Bus Stand time Table पाहता येईल.

माझी बसची वाट बघत होतो तेव्हा माझ्यासमोर एक गाडी फलट क्रमांक २ ला शेगाव साकोली आली. तसच फलट क्रमांक ७ ला शेगाव नाशिक शिवशाही ही बस लागलेली होती .त्याचा थोडाच वेळेनंतर माझी बस शेगाव चंद्रपूर जाण्यासाठी लागली.

त्या बसचा जो मार्ग शेगाव अकोला कारंजा यवतमाळ वनीी वरोरा आणि चंद्रपूर असा होता आणि मी ज्या गाडीने प्रवास केला त्या गाडीचा Number MH.१४.LX.८८६४ असा होता. जर तुम्हाला कुठली बस किती वाजता असते हे जर जाणून घ्याचा असेल तर तुम्ही माझी हि लिंक MSRTC Bus वर click करू शकता.

Shegaon To Chandrapur Bus Timings MSRTC Ticket

चला तर मग जाणून घेऊया मझा हा Shegaon To Chandrapur bus चा प्रवास कसा होता. ६५४ रुपये shegaon to Chandrapur bus ticket देऊन मी माझी फुल ticket काढली. माझी बस Shegaon Bus Stand हून सुटली आणि मी आता सकाळी ८:३० वाजता बाळापुर ला आलो होतो.

From Balapur Stand To Akola Bus Stand

Balapur Bus Stand सोडल्या नंतर माझी बस बाळापुर अकोला Highway NH 06 वर धाऊ लागली. दुसरा टप्पा होता Akola Bus Stand मी शेगाव पासून ४५ किलोमीटर अंतर घाठत अकोला बस स्टॅडला बरोबर सकाळी ९:०८ मिनिटानी पलाट क्रमांक १६ पोहोचलो.  

 पुन्हा एकदा NH 06 Nagpur Highway वर धावता माझी बस सकाळी ९:४० वाजता बोरगाव मंजू ला पाहोचली.पुढचा टप्पा होता Murtijapur Bus Stand वर सकाळी १०:०५ पाहोचली.

मुर्तीजापूर कारंजा NH 361 highway वर धावल्या नंतर खेर्डा फाटा पासून पुढे माझी बस धावत होती.आता माझा पुढचं टप्पा होता Karanja Bus Stand.

From Akola To Karanja Bus Stand

Karanja Bus Stand ला फलाट क्रमांक ३ ला माझी बस सकाळी १०:५० पाहोचली.वाशिम जिल्ह्यातल हे कारंजा लाड बस स्टॅड यवतमाळ जाण्यासाठी चंद्रपूरवरून तीन बसेस लागतात पहिलीची बस लागते ती हिंगणघाड आगाराची ५:३० ची बस शेगाव हून, त्याच्यानंतर माझी बस ८:०० वाजताची आणि  त्याच्यानंतर अजून एक गाडी असते शेगाव बल्हारपूर ते पण चंद्रपूरला जाते.

अशा गाड्या शेगाव वरून सुटतात चंद्रपूर जाण्यासाठी. माझ्या मागे बरेच गाड्या आल्या होत्या जसे कि नागपूर ते जालना गाडी जी अंबड आगराची आहे आणि नांदेड ते अमरावती जी अमरावती आगारची बस आहे. चंद्रपूरला अजून एक बस आलेली होती जेव्हा माझी बस कारंजा ला आली होती जी अकोला ते चंद्रपूर ला जाणारी होती.

कारंजावरून माझी गाडी दारवा मार्गे यवतमाळला चालली.यवतमाळचा अंतर बघायच झाल तर ९२ किलोमीटर चा अंतर आहे.

आता माझी बस कारंजा दारवा Highway NH 361 वर धावता आता बोदेगाव ला आली. ११:४३ ला माझी बस दारवा ला पाहोचली.

दारवा बस स्टॅड ला फलाट क्रमांक एकपासून ते फलट क्रमांक सहा पर्यंत आहे. दारवावरून आरणी वगैरे जाण्यासाठी बस सोये पण आहे. आरणीचा प्लॅटफॉर्म वेगळा दिलेला आहे. आता माझी गाडी दारवा यवतमाळ रोड SH 212 वर धावत होती.

याच्यानंतर माझी बस जेवणासाठी १२:०४ वाजता बोरीमध्ये थांबली, दारवा मार्गे जेवढे पण बसेस जातात त्या गाडीचा थांबा बोरी मध्ये तिथेच असतो.जेवणासाठी जो थांबा आहे थोडा सा चेंज केलेला आहे. हॉटेल पल्लवी या ठिकाणी अधिकृत थांबा दिलेला आहे.

बोरीमध्ये गाड्या लावलेल्या होत्या जसे कि Shegaon To Chandrapur गाडी,नागपूर जालना गाडी, त्याच्यानंतर शेवटची गाडी मेहकर नागपूर तर एवढ्या गाड्या इथे जेवणासाठी थांबलेल्या होत्या.

From Karanja To Yavatmal Bus Stand

बोरी पासून जवळपास 30 किलोमीटर अंतर चा प्रवास करत मी पोहोचलेलो दुपारी १:१५ वाजता यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ बस स्टॅड वरती.

शेगाव वरून यवतमाळ पोहोचण्यासाठी मला जवळपास पाच तासांचा कालावधी लागलेला होता.मला जे पुढचे स्टॉप राहिलेले होते ते होते वणी, वरोरा, चंद्रपूर एकून अंतर बघायचं झालं तर १७२ किलोमीटर च अंतर राहिलेल होता.

रस्त्यावर तुम्हाला अक्षरशः कोळसेच्या डस्ट बघायला भेटतील. कोळसा डस्ट म्हणजे कोळसेचे पावडर पडलेले दिसतील रोडवर तुम्हाला चंद्रपूरमध्ये. शेगाव पासून यवतमाळ पर्यंत गाडी अक्षरशः फुल पॅक आणि यवतमाळला सगळ्यात जास्त प्रवासी खाली झालेले होते. आता माझी गाडी वनी यवतमाळ MSH 6 रस्त्यावर धावता जोडमोह,मोह्दा,उमरी.करंजी,मारेगाव या गावं वरून होता माझी बस वणी बस स्टॅड ला ३:५० वाजता फलाट क्रमांक ८ वर पाहोचली. 

बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा त्याच्यानंतर वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यानंतर आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये मी आलो होतो.यवतमाळ जिल्ह्यानंतर शेवटचा जिल्हा लागणार होता तो म्हणजे चंद्रपूर जिल्हा तर असे टोटल पाच जिल्हे या रूट वर येतात.

माझी बस आता वणी वरोरा रोड वर श २३३ ह्या highway वर धावता वरोरा ला बरोबर ४:३० वाजता आली होती.वनी ते वरोरा एवढा काही मोठा अंतर नाही लोकल रूट एवढा अंतर आहे. आता वरोरा वरून गाडी माझी बस चंद्रपूरला जाणार. चंद्रपूर चा अंतर बघायचं झालं तर ४० km चा प्रवास राहिलेला होता .

Nagpur-Chandrapur road NH 930 या highway वर माझी बस धावून भद्रावती टिकाणी संध्याकाळी  ५:०० वाजता पाहोचली.

Shegaon To Chandrapur Bus Journey

शेवटी माझी बस ५:२६ वाजता चंद्रपूर जिल्ह्यातल्या चंद्रपूर बसस्टॅडवर पाहोचली. म्हणजे तब्बल या प्रवासासाठी आपल्याला ९:३० तासांचा कालावधी लागलेला होती.चंद्रपूरला येण्यासाठी तर गाडीमधले सर्व प्रवासी खाली झाले. या रोड वरती गर्दी फक्त यवतमाळ पर्यंत होती. यवतमाळ नंतर जी गर्दी होती ती थोडीशी कमी पाहायला मिळाली. अशा प्रकारे माझा शेगाव ते चंद्रपूर चा प्रवास मी केला.

FAQs

What is the enquiry number of Chandrapur bus stand?

07279-254173

What is Shegaon to chandrapur bus timings?

From Shegaon Bus Stand at 8:00 in the morning.

Leave a Comment