Solapur To Mumbai Bus Journey

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या Solapur To Mumbai ह्या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.

तर माझी गाडी संध्याकाळी 8:30 वाजताची होती. Solapur Bus Stand हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि सर्वात जास्त गर्दी असणारा बस स्टँड आहे. ह्या बस स्टैंड वर एकूण 23 फलाट दिलेले आहेत.

Solapur To Mumbai Distance

Solapur to Mumbai

Solapur To Mumbai हा जवळपास 400 ते 450 किलोमीटरचा प्रवास ठरला. माझी गाडी ह्या मार्गावर पुणे एक्सप्रेस हायवे ह्या रस्त्यावरून धावली.

ही गाडी बुकिंग गाडी सुद्धा आहे. सोलापूर बस स्टँड वरून ह्या तीन गाड्या दिलेले आहेत. पहिली गाडी सकाळी 8:30 वाजता तर दुसरी गाडी संध्याकाळी 8:30 वाजता आणि शेवटची म्हणजे तिसरी गाडी रात्री 9:30 वाजता आहे. अशाप्रकारे तीन गाड्या ह्या मार्गावर सोलापूर बस स्टँड द्वारे दिलेले आहेत.

ही गाडी सीटर स्लीपर आहे. माझ्या गाडीचा नंबर होता MH 14 KQ 2459 होता.

Solapur To Mumbai MSRTC Bus Timetable

खाली तुम्हाला Solapur To Mumbai Bus Timetable पाहायला मिळेल.सोलापूर ते मुंबई जाण्यासाठी सगळ्या गाड्या खाली दिलेल्या वेळानुसार निघतात.

From ToTimingsRoutes
SolapurMumbai00:15, 01:00, 8:30, 10:00, 18:15, 21:30, 22:00 Shivshahi, 22:30 Shivshahi  services Hadapsar, Swargate, N Shivaji Nagar, Chinchw Nigadi, Panvel, Mumba Central

Solapur To Mumbai MSRTC Bus Ticket Price

बसचा मार्ग सोलापूर पासून पुणे स्वारगेट,वाशी आणि तसेच मुंबई अशा प्रकारे होता. जेव्हा मी ह्या बस ने प्रवास केला होता तेव्हा माझी बसची तिकीट 650 रुपये अशाप्रकारे होती.

तर माझी गाडी आता सोलापूर बस स्टँड बाहेर निघत सोलापूर पुणे हायवे वर धावू लागली.

बराच काळ हायवे वर धावल्यानंतर सावळेश्वर ह्या ठिकाणी असणारा टोल नाका पार करत मोहोळ बस स्टैंड वर रात्री 9:30 वाजता थांबा घेत आपल्या पुढच्या प्रवासासाठी परत एकदा पुणे एक्सप्रेस हायवेवर धावते .

तसेच शेटफळ ह्या गावावरून होत मोडनिंब इथून पुढे बरंच काळ प्रवास केल्यानंतर टेंभुर्णी बस स्टैंड वर रात्री 10:30 वाजता फलट क्रमांक 2 वर येऊन थांबली. सोलापूर ते टेंभुर्णी जवळपास 90 किलोमीटरचा प्रवास करत पोहोचलो होतो.

सोलापूर जिल्ह्याची हद्द टेंभुर्णी बस स्टँड पर्यंत संपली आता इथून पुढे पुणे जिल्ह्याची हद्द सुरू झाली होती.

टेंभुर्णी बस स्टँड वरून पुढे रांजणी येथे असणारा उजनी नदीवर बांधलेल्या पुलावरून होत सरडेवाडी ह्या ठिकाणी असणारा  टोल नाका पार करून इंदापूर बस स्टैंड वर रात्री अकरा वाजता फलट क्रमांक 1 वर पोहोचली. इंदापूर बस स्टँड पुणे जिल्हा अंतर्गत मोडतो. इथून पुणे 130 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.

इंदापूरच्या पुढे डाळज ह्या ठिकाणी हॉटेल उदय इथे माझी बस रात्री 11:30 वाजता जेवणासाठी थांबा घेतली.

20 मिनिटं जेवणासाठी थांबल्यानंतर माझी गाडी आता पुणे एक्सप्रेस हायवेवर धावत यवत ह्या ठिकाणावरून बरच काळ हायवे वर धावल्यानंतर पुणे स्वारगेट बस स्टैंड वर रात्री 2:00 वाजता पोहोचली.

पुणे स्वारगेट इथून मुंबईचा अंतर जवळजवळ 160 किलोमीटर चा अंतर शिल्लक राहिला होता. स्वारगेट बस स्टँड वर गाडीचे चालक आणि वाहक यांची बदली झाली.

पुणे स्वारगेट स्टँडवरून बाहेर पडल्यानंतर पिंपरी चिंचवड बस स्टैंड वर रात्री 3:00 वाजता छोटासा थांबा घेत आपला पुढचा प्रवासासाठी निघाली.

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर धावत तळेगाव ह्या ठिकाणावरून होत जवळपास दीड तासांचा प्रवास केल्यानंतर आता मी सकाळी 4:30 वाजता लोणावळा ह्या ठिकाणावरून पुढे जवळपास 70 ते 80 किलोमीटरचा प्रवास करत आणि दीड तासांचा हा प्रवास पूर्ण केल्यानंतर मी आता पनवेल बस स्टैंड वर सकाळी 5:45 वाजता पोहोचलो.

सोलापूर ते मुंबई Final Destination

मुंबई सेंट्रल ह्या बस स्टँडवरून जवळपास 40 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. पनवेल बस स्टँडवरून मुंबई सेंट्रल चा हा प्रवास जवळपास दीड तासांचा झाला.

अशाप्रकारे प्रवास करत आता मी मुंबई सेंट्रल वर सकाळी 7:00 वाजता पोहोचलो.

हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ह्याच्याबद्दल मला माहिती द्या आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा धन्यवाद.

FAQs

What Is Solapur To Mumbai Distance By Road?

400 किलोमीटरचा

What Are The Boarding Points From Solapur To Mumbai?

सोलापूर पासून पुणे स्वारगेट,वाशी आणि तसेच मुंबई

How Much Is Solapur To Mumbai Msrtc Bus Ticket Price?

650 रुपये

Leave a Comment