नमस्कार आणि जय महाराष्ट्र आज मी तुम्हाला माझा Hyderabad to Nagpur ह्या प्रवास बद्दल माहिती देणार आहे.
ही गाडी गणेश पेठ आगाराची आहे. ह्या गाडीमध्ये Push back seats दिलेले आहेत ह्याचा अर्थ तुम्ही तुमच्या सोयीनुसार सीटला मागेपुढे करू शकता.
ह्या गाडीचा नंबर MH 40 CM 6292 अशाप्रकारे आहे. ह्या गाडीचा मार्ग कामारेडी, निजामाबाद, निर्मल, आदिलाबाद, पांढरकवडा आणि शेवटी नागपूर अशा प्रकारे आहे.
Table of Contents
Hyderabad to Nagpur MSRTC Bus Timetable
खाली तुम्हाला Hyderabad to Nagpur Bus Timetable पाहायला मिळेल.हैदराबाद ते नागपूर जाण्यासाठी सगळ्या गाड्या खाली दिलेल्या वेळानुसार निघतात.
| From | To | Timings | Routes |
| Hyderabad | Nagpur | 6:00 | Kamareddy, Nizamabad, Nirmal, Adilabad, Pandharkawada |
Hyderabad to Nagpur Distance

Hyderabad to Nagpur ह्या गाडीने मी 12 तासांचा प्रवास तसेच जवळपास 650 किलोमीटरचा अंतर पार केला. माझी गाडी पलट क्रमांक 56 इथून सकाळी 6:00 वाजता आपल्या मार्गावर धावण्यासाठी तैयार झाली.
आता माझी बस Hyderabad MGBS Bus stand वरून निघाली हैदराबाद शहरामध्ये दोन बस स्टँड दिलेले आहेत. पहिला बस स्टँड च नाव आहे MGBS आणि दुसऱ्या बस स्टँड च नाव आहे GBS.
Hyderabad MGBS Bus Stand वरून आता माझी बस हैदराबाद शहरांमध्ये असणारा दुसरा अजून एक बस स्टैंड म्हणजे GBS बस स्टैंड वर सकाळी 6:30 वाजता ह्या ठिकाणी आली. ह्या दोन बस स्टँडच्या दरम्यानच्या अंतर अर्धा तासांचा आहे.
GBS बस स्टँड वरून आता माझी बस पुढच्या टप्प्यासाठी परत एकदा रस्त्यावर धावत जाते. धावत असताना कोमपल्ली नंतर खंडला नंतर मेडकल इथून मनोहराबाद ह्या ठिकाणी असणारा टोल नाका पार करत पुढे हरिद्रा नदीच्या वरून होत श्रीनगर कन्याकुमारी हायवेवर धावत मसाई पेठ नंतर रेड्डी पल्ली नंतर नार सिंगी नंतर रामायम पेठ नंतर भिगनूर ह्या ठिकाणी असणारा टोल नाका पार करून कामारेड्डी बस स्टँडवर 8:30 वाजता तसेच अडीच तासांचा प्रवास करत आणि 118 किलोमीटरचा प्रवास करून ह्या ठिकाणी पोहोचलो. कामारेड्डी हा माझ्या मार्गावरचा पहिला थांबा होता.
कामारेड्डी वरून पुढचा जो टप्पा तो निजामाबाद होता. तब्बल वीस मिनिटं ह्या कामारेड्डी बस स्टँडवर थांबल्यानंतर माझी गाडी आता पुढचा टप्पा गाठण्यासाठी निघाली.
हैदराबाद निजामाबाद ह्या हायवेवर धावत आदलूर यल्लारेडी ह्या ठिकाणावरून होत इंदलवाई ह्या ठिकाणी असणारा टोल नाका पार करत पुढे निजामाबाद बस स्टैंड वर सकाळी 10:00 वाजता फलट क्रमांक 7 वर पोहोचली.
इथून पुढे माझी गाडी आता निर्मल ह्या दिशेने धावणार होती. कमारेड्डी ते निजामाबाद हा 60 किलोमीटरचा अंतर होता.
इथून नागपूर 345 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. कमीत कमी 6 तासांचा प्रवास मला अजून करायचा होता.
परत एकदा हायवेवर धावत माझी गाडी आता ह्या अंकापूर ठिकाणावरून होत पुढे आरमुर बस स्टैंड वर 10:41 वाजता पोहोचली.
येथून पुढे मुखपाल नंतर दुधगाव नंतर गोदावरी नदीच्या पुलावरून होत पुढे गमजल ह्या ठिकाणी असणारा टोल नाका पार करत निर्मल बस स्टँड वर सकाळी 11:30 वाजता पोहोचली.
निर्मल बस स्टॅन्ड वरून आदिलाबाद 76 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. आदीलाबाद नंतर तो पुढचा टप्पा असणार तो पांढरकवडा होता.
निर्मल बस स्टॅन्ड वरून पुढे धावत इचोरा इथून गुडीहातनूर नंतर आदिलाबाद बस स्टैंड वर दुपारी 1:00 वाजता पोहोचली. आदीलाबाद हा माझा मार्गावरचा पाचवा बस थांबा होता. येथून पुढे दीड तासांचा अंतरावर पांढरगौडा हा टप्पा गाठण्यासाठी माझी गाडी परत एकदा हायवेवर धावते.
आदिलाबाद ते नागपूर 200 किलोमीटरचा अंतरावर आहे. हा रस्ता गाठण्यासाठी कमीत कमी चार तासांचा कालावधी लागला.
Hyderabad to Nagpur MSRTC Bus Ticket Price
आदिलाबाद बस स्टँड वरून पांढरकवडा हा 47 किलोमीटरच्या अंतरावर होता. ह्या गाडीचा तिकीट दर हैदराबाद ते नागपूर जवळपास 650 रुपये होता.
माझी गाडी आता आदिलाबाद नागपूर हायवेवर धावत असताना भोरज ह्या ठिकाणावरून होत पुढे पिंपळवाडा ह्या ठिकाणी असणारा टोल नाका पार करून पैनगंगा नदीवर बांधलेला पुलावरून होत महाराष्ट्र राज्याचे सीमाच्या आत शिरते.
हा इलाका विदर्भ भागात मोडतो. तसंच पुढे पिंपळखुटी ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे केळापूर ह्या ठिकाणी असणारा अजून एक टोल नाका पार करत पांढरकवडा बस स्टैंड वर दुपारी 2:00 वाजता पोहोचली. पांढरकवडा बस स्टैंड वर येण्याच्या अगोदर ही गाडी डेपोच्या आत मध्ये जाऊन नंतर बस स्टैंड वर येऊन थांबते.
इथून नागपूर अडीच ताजांचा रस्ता आहे. ह्याचा अर्थ पांढरकवडा ते नागपूर चा अंतर जवळपास दीडशे किलोमीटर होता.
पांढरकवडा बस स्टँड सोडल्यानंतर आता माझी गाडी पुढचा प्रवासासाठी हायवेवर धावू लागली. देवदरी घाट नंतर वाडकी नंतर पोहाणा नंतर वडनेर ह्या सगळ्या गावा करत पुढे दरोडा ह्या ठिकाणी असणारा टोल नाका पार करून हिंगणघाट बस स्टैंड वर दुपारी 3:30 वाजता पोहोचली.
हिंगणघाट हा माझ्या मार्गावरील सातवा बस स्टँड होता. हिंगणघाट ह्या ठिकाणावरून नागपूर 75 किलोमीटर अंतरावर आहे.
Hyderabad to Nagpur Final Destination
हिंगणघाट बस स्टँड वरून पुढे जाम बस स्टैंड वर दुपारी 4:00 वाजता पोहोचल्यानंतर आपल्या पुढचा टप्पा गाठण्यासाठी कणकटी ह्या ठिकाणी असणारा विना नदीच्या पुलावरून प्रवास करत सोनगाव इथून पुढे बोरखेडी ह्या ठिकाणी असणारा टोल नाका पार करत पुढे पाटणबोरी इथून होत नागपूर विमानतळ कडून पुढे शेवटी नागपूर बस स्टैंड वर 5:15 वाजता पोहोचली.
अशाप्रकारे माझा Hyderabad to Nagpur चा प्रवास पूर्ण झाला. जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद.
FAQs
How Much Is Hyderabad to Nagpur Msrtc Bus Ticket Price?
650 रुपये
What Is Hyderabad to Nagpur Distance By Road?
650 किलोमीटर
What Are The Boarding Points From Hyderabad to Nagpur?
कामारेडी, निजामाबाद, निर्मल, आदिलाबाद, पांढरकवडा आणि शेवटी नागपूर