Ichalkaranji To Bhiwandi Bus Journey

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी ह्या ब्लॉगद्वारे माझा Ichalkaranji To Bhiwandi पर्यंत केलेला प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.

इचलकरंजी बस स्टँड वरून माझी ही गाडी सकाळी 7:00 वाजता सुटते. ह्या गाडीचा मार्ग इचलकरंजी पासून हातकणंगले, वडगाव, कराड, सातारा, पुणे, मेगा हायवे, ठाणे वंदना आणि अशाप्रकारे भिवंडी आहे.इचलकरंजी बस स्टँड तसा बघायला गेला तर फार मोठा तसेच महत्वाचा आहे कारण इथून भरपूर गडांच्या रहदारी असते.

Ichalkaranji To Bhiwandi MSRTC Bus Timetable

खाली तुम्हाला Ichalkaranji To Bhiwandi Bus Timetable पाहायला मिळेल.इचलकरंजी ते भिवंडी जाण्यासाठी सगळ्या गाड्या खाली दिलेल्या वेळानुसार निघतात.

From ToTimingsRoutes
IchalkaranjiBhiwandi07:00Hatkanangale, Vadgaon, Karad, Satara, Pune, Mega Highway, Thane Vandana

Ichalkaranji To Bhiwandi Distance

Ichalkaranji To Bhiwandi Distance

Ichalkaranji To Bhiwandi  जवळपास 400 किलोमीटरचा अंतर आहे. ह्या प्रवासासाठी कमीत कमी साडेआठ तासांचा कालावधी लागला.

Ichalkaranji To Bhiwandi MSRTC Bus Ticket Price

Ichalkaranji To Bhiwandi  चा तिकीट दर 710 रुपये अशाप्रकारे आहे.तर आता माझी गाडी इचलकरंजी शहरातून बाहेर पडत नऊ किलोमीटरचा प्रवास करून माझ्या मार्गावरील पहिला बस स्टॅन्ड म्हणजे हातकणंगले बस स्टैंड वर पोहोचली. इचलकरंजी ते हातकणंगले वरचा रस्ता सिंगल होता.हातकणंगले बस स्टैंड हायवेच्या कडेला आहे.ह्या बस स्टैंडचा बांधकाम जुनाच आहे.

ह्या गाडीचे बसण्यासाठी फार चांगले आणि आरामदायी सीट दिलेले आहे.सीटला तुम्ही आपल्याला हवे तितके मागेपुढे करू शकता. इथून पुढे माझी गाडी परत एकदा सिंगल रस्त्यावर धावत सवरदे ह्या गावावरून होत पेठ वडगाव बस स्टैंड वर सकाळी 7:51 वाजता पोहोचली.ह्या मार्गवर एकाच नावाचे दोन बस स्टैंड आहे पहिला पेठ वडगाव आणि पुढे वाठार वडगाव.

पेठ वडगाव हा माझ्या मार्गावरील दुसरा बस स्टँड होता. इथून पुढे माझी बस मुंबई बंगलोर एक्सप्रेस हायवेच्या पुला खालून होत पुढे वाठार वडगाव बस स्टॉप वर थांबा घेत आपल्या पुढच्या प्रवासासाठी मुंबई बेंगलोर एक्सप्रेस हायवेवर धावू लागली. मुंबई बेंगलोर एक्सप्रेस हायवे जबरदस्त आहे.

किणी या ठिकाणी असणारा टोल नाका पार करून पुढे कानेगाव या ठिकाणी असणारा वारणा नदीवर बांधलेला पुलावरून होत कामेरी नंतर नेरला नंतर मुंबई बंगलोर एक्सप्रेस हायवेच्या बाजूला असेला कासेगाव बस स्टॉप वर थांबा घेत पुढे कराड च्या अलीकडे असणारा एक ठिकाण मलकापूर इथून होत कराड शहरात कोल्हापूर नाका इथे प्रवाशांना सोडून कराड शहराच्या आत मध्ये असणारा कराड बस स्टॅन्ड वर सकाळी 9:00 वाजता फलाट क्रमांक सहावर पोहोचली.

सातारा जिल्हा अंतर्गत असणार हा कराड बस स्टॅन्ड फार स्वच्छ आणि खूप मोठा असा बस स्टॅन्ड आहे.इथून बरेच लांब पाल्याचे गाड्या सुटतात. ह्या कराड बस स्टॅन्डवर सर्वात जास्त फलाट पाहायला मिळतील.ह्या कराड बस स्टॅन्डच्या आतला परिसर कॉंक्रीटचा आहे.मस्त आणि टापटीप असा आहे.

मलकापूर ह्या नावाचे जळगाव जिल्हा मध्ये खानदेश भागात तुम्हाला पाहायला मिळेल. हा मलकापूर पश्चिम महाराष्ट्र मधला सातारा जिल्हा मधला मलकापूर आहे.

आतापर्यंत इचलकरंजी पासून दोन तासांचा रस्ता गाठत आणि 80 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता. कराड हा मार्गावरील तिसरा थांबा होता.

आतापर्यंत 319 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिला होता. कराड बस स्टँड वरून पुढे कोयना नदी ओलांडून या ठिकाणी असणारा आपल्या मार्गावरील दुसरा टोलनाका पार करून पुढे उंबरज  या गावावरून होत पुढे नागठाणे इथे उरमोडी नदीच्या पुलावरून होत पुढे शेंद्रे नंतर खिंडवडी घाट पार करत माझा चौथा टप्पा म्हणजे सातारा बस स्टैंड वर 10:15 वाजता पोहोचली.

कराड बस स्टॅन्ड नंतर सातारा बस स्टैंड हा दुसरा खूपच मोठा आणि सर्वात जास्त फलाट असणारा बस स्टैंड आहे.साताराचे कंदी पेढे फार प्रसिद्ध आहेत.ह्या बस स्टैंडवर गडांच्या रहदारी भरपूर आहे.

आतापर्यंत मी इचलकरंजी ते सातारा 132 किलोमीटरचा अंतर पार केला होता. सातारा बस स्टँड वरून 270 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. हा 270 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी मला जवळपास सहा तास लागले.

15 मिनिट सातारा बस स्टैंड वर थांबा घेतल्यानंतर आता माझी गाडी पुढचा टप्पा गाठण्य्साठी धावायला सुरू करते. सातारा बस स्टँडवरून पुणे स्वारगेट 108 किलोमीटरचा अंतरावर स्थित आहे.

सातारा शहरात असणारा नेताजी सुभाषचंद्र बोस चौक इथून होत पुढे वाडे फाटा ब्रिज इथून परत एकदा हायवे वर धावत पुढे आणेवाडी या ठिकाणी असणारा टोल नाका पार करून पाचवड बस स्टॉप वर प्रवाशांना घेत तसेच पुढे भोईज या ठिकाणी कृष्णा नदीच्या पुलावरून प्रवास करत कवठे नंतर सुरूर नंतर वेळे इथून पुढे खंबाटगी बोगद्यामधून प्रवास करत शिरवळ इथे प्रवाशांना घेत पुढे किकवी या ठिकाणी हायवेच्या बाजूला असणारा महाराजा हॉटेल इथे जेवणासाठी सकाळी 11:45 वाजता थांबा घेते.महाराजा हॉटेल इथे भरपूर एसटी आणि खाजगी गाड्या थांबलेल्या दिसले.

इतका लांब पाल्याचं प्रवास करून मला तर जाम भूक लागली होती म्हणून एक बटर मसाला डोसा खायाला घेतला.

इथून पुढे हायवे वर वर्वे या ठिकाणावरून धावत पुढे खेड शिवापुर या ठिकाणी असणारा आपल्या मार्गावरील चौथा टोल नाका पार करून पुढे कात्रज भोगद्यामधून प्रवास करत कात्रज नवले ब्रिज कडून पुढे स्वारगेट बस स्टैंड वर दुपारी 1:30 वाजता पोहोचलो.

स्वारगेट हा आपला मार्गावरील पाचवा थांबा होता. स्वारगेट बस स्टॅन्ड वरून भिवंडी 170 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. हा अंतर गाठायला कमीत कमी चार तासांचा कालावधी लागला.

आतापर्यंत इचलकरंजी ते पुणे स्वारगेट हा 238 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता. स्वारगेट बस स्टॅन्ड पासून पुढे आता माझी बस पुणे शहराचे ट्राफिक मधून हळूहळू पुढे सरकत शिवाजीनगर नंतर पुढे दापोडी ठिकाणावरून होत पिंपरी चिंचवड बस स्टैंड वर पोहोचली. इथून भिवंडी जवळपास 150 किलोमीटरचा अंतर दाखवत होता.पिंपरी चिंचवड बस स्टैंडचा बांधकाम जुना आणि फार लांबलचक आहे.

पिंपरी चिंचवड इथून पुढे आकुर्डी नंतर भक्ती शक्ती उद्यान कडून सोमठणे या ठिकाणी असणारा टोल नाका पार करत पुढे कामशेत नंतर वर्सोली इथे असणारा टोल नाका पार करत पुढे लोणावळा बस स्टैंड वर दुपारी 4:15 वाजता पोहोचलो.आतापर्यंत इचलकरंजी पासून लोणावळा पर्यंत ६ टोलनाके पाहायला मिळाले.

दहा मिनिटं लोणावळा बस स्टैंड वर थांबल्यानंतर परत एकदा माझी गाडी आता पुढचा टप्पा गाठण्यासाठी इथून निघाली. लोणावळा पासून भिवंडी 95 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.

हा अंतर गाठायला जवळपास अडीच तासांचा कालावधी लागला.लोणावळा चिक्की साठी फार प्रसिद्ध आहे.लोणावळा बस स्टैंड फार काही मोठा नाही पण महत्वाचा म्हणायला हरकत नाही.लोणावळा मध्ये तुम्हाला नुसता चिक्की विकाणारे दुकाने जास्त दिसतील.

तसेच मार्गावरील लागणारा खंडाळा घाट पार करत पुढे खोपोली बस स्टैंड वर बरोबर संध्याकाळी 5:00 वाजता पोहोचलो. खंडाळा बस स्टॅन्ड हा माझ्या मार्गावरील आठवा बस थांबा होता.

इथून पुढे शेडुंग टोल नाका पार करत पुढे पनवेल बस स्टैंड वर 6:00 वाजता पोहोचली. इथून भिवंडी 45 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे.

पुढे कळंबोली इथून होत नवी मुंबई येथे बेलापूर नंतर नेरूळ नंतर तुर्भे तसेच कोपर खैरणे पुढे घनसोली नंतर कळवा नाका करत ठाणे वंदना बस स्टँड वर संध्याकाळी 8:00 वाजता पोहोचलो.

इथून पुढे उल्हास नदी ओलांडून पुढे भिवंडी मध्ये दापोडी ह्या ठिकाणावरून होत पुढे भिवंडी बस स्टैंड वर 9:15 वाजता पोहोचलो.हीच गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 6:00 वाजता भिवंडी वरून इचलकरंजी साठी निघते.

Ichalkaranji To Bhiwandi Final Destination

अशा प्रकारे माझा Ichalkaranji To Bhiwandi  चा प्रवास पूर्ण झाला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला याच्याबद्दल मला माहिती द्या आणि आपल्या मित्रांनी मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा धन्यवाद.

FAQs

How Much Is Ichalkaranji To Bhiwandi Msrtc Bus Ticket Price?

710 रुपये

What Is Ichalkaranji To Bhiwandi Distance By Road?

400 किलोमीटर

What Are The Boarding Points From Ichalkaranji To Bhiwandi?

इचलकरंजी पासून हातकणंगले, वडगाव, कराड, सातारा, पुणे, मेगा हायवे, ठाणे वंदना आणि अशाप्रकारे भिवंडी

Leave a Comment