Ahmednagar to Pathardi MSRTC Bus Journey

नमस्कार मित्रांनो आणि जय महाराष्ट्र, आज मी या ब्लॉगमध्ये माझा एक प्रवास Ahmednagar to Pathardi याच्याबद्दल माहिती देणार आहे. अहमदनगर विभागाच्या अंतर्गत पाथर्डी आगाराला एक नवीन BS6 Tata Company कंपनीची msrtc bus  मिळालेली आहे.

बस असं बघायला गेला तर फार नवीन कोरी आहे. या बस मध्ये बरेच काही बदल केलेले आहेत. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ड्रायव्हर मागची जी सीट आहे ती अपंग लोकांसाठी सोयस्कर होऊ म्हणून जागा जास्त दिलेला आहे.

Ahmednagar To Pathardi Distance

Ahmednagar to Pathardi Distance

या मालीवाडा बस स्टैंड वर तुम्हाला पाथर्डी साठी बस प्लॅटफॉर्म नंबर 9 वर मिळेल. मालीवाडा ते पाथर्डी जवळ जवळ 70 किलोमीटर आणि एक तासाचा अंतर आहे.

मी ज्या गाडीने प्रवास करत होतो त्या गाडीचा नंबर प्लेट MH20GC2543 असा होता.

Ahmednagar To Pathardi Bus Timetable

माळीवाडा अहमदनगर बस स्टँड वरून मला 3:43 मिनिटांनी गाडी मिळाली. पाथर्डी ला जायला या गाडी मधे नेहमी गर्दी असते .msrtc bus timetable पाहण्यासाठी दिलेला ह्या लिंक वर करू शकता.

Ahmednagar To Pathardi Bus Ticket Price

माळीवाडा बस स्टँड वरून Pathardi ह्या ठिकाणी जाण्यासाठी तिकीटाची किंमत होती 80 रुपये.

पाथर्डी आगाराला BS6 Tata Company कंपनीची दोन गाड्या मिळालेल्या आहेत.

MSRTC Bus चा या प्रवासा दरम्यान पहिला जो गाव मला लागला तो होता भिंगार तसेच त्याच्यानंतर पुढचा गाव जो होता तो शहापूर, सोनेवाडी,मेहेकर फाटा असा होता.

मेहकर फाटावरून 38 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला पाथर्डी या ठिकाणी पोहोचेल.

तिथून पुढे कौडगाव, मराठवाडी,मराठवाडी नंतर माझी msrtc बस करंजी घाटा वरून खाली यायला लागते,हा ठिकाण यांच्या अगोदर आपल्याला करंजी घाट पार करावा लागतो. करंजी घाट उतरल्यानंतर मी करंजी दुपारच्या 4:37 वाजता ह्या जागे पोहोचतो. इथून करंजी ते पाथर्डी चा अंतर गुगल मॅप द्वारे 22 किलोमीटर होता .

करंजी इथून गाडी सुटल्यानंतर माझी बस देवराई, तिसगाव हे गाव पार करते.तिसगाव वरून पाथर्डी 14 किलोमीटरचा अंतर राहिला होता. निवडुंगे हा असं गाव करत माझी बस पुढे धावत निघाली. निवडुंगे या गावावरून पाथर्डी आता आठ किलोमीटर इतकाच राहिला होता. पाथर्डी येण्याच्या अगोदर माळीबाभुळगाव हा एक जवळचा गाव होता..

अशाप्रकारे माझा हा प्रवास झाला. पाथर्डी ला दोन बस स्टॅन्ड आहेत एक जुना बस स्टॅन्ड एक नवीन बस स्टॅन्ड. नवीन बसस्थान येण्याचा अगोदर आपल्याला पाथर्डी जुना बस स्टँड हा भेटतो त्याच्यानंतर इथून नवीन बस स्टॅन्ड ला गाडी जाते. पाथर्डी तसं बघायला गेलं तर फार छोटा बस स्टँड आहे एकूण सहा प्लॅटफॉर्म आहेत.

अशा प्रकारे माझा हा छोटासा पल्ला Ahmednagar to Pathardi पूर्ण केला.जर तुम्हाला ह्या ब्लोग ने काही फायदा झाला असेल तर नक्कीच आपल्या नातेवाईक आणि मित्रांना share करा.

FAQs

How Much Is The Bus Ticket From Ahmednagar To Pathardi?

80 Rupees

Leave a Comment