Akluj To Chiplun Bus Journey

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये. आज तुम्हाला मी माझा Akluj to Chiplun MSRTC Bus लाल परीने जे प्रवास केला त्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे.

पहिल्यांदा जेव्हा मी Akluj Bus Stand ला आलो इथलं अकलूज बस स्टँड चा रेनोवेशन चा काम पाहून मी खुश झालो. अकलूज तसं बघायला गेलं सोलापूर जिल्हा अंतर्गत मोडतो तर पुणे जिल्हाचा सर्वात टोकाचा ठिकाण. हा सोलापूर विभाग अंतर्गत येतो. अकलूज बस स्टँड शिरल्यास तुम्हाला एक नियंत्रण कक्ष दिसून येईल.तसेच अकलूज बस स्टँडच्या आवारात तुम्हाला पाणी चा फवारा दिसेल.अकलूज बस स्टँडला आत मध्ये चांगलाच रंग दिलेला आहे आणि भिंतीवर छान चित्र पाहायला मिळेल.

Akluj Bus Stand ला दोन बाजू पलट दिलेले आहेत. पहिली बाजू एक ते सहा पर्यंत आहे आणि दुसरी बाजू सात ते बारा अशाप्रकारे दिलेले आहेत. अकलूज बस स्टँडवरून भरपूर लांब पल्याचे गाड्या सुटतात. जसे की अकलूज नाशिक, अकलूज शिर्डी, शिवाय Akluj Bus Stand वरून हैदराबादला जायला तीन गाड्या दिलेले आहेत आणि ही आपली अकलूज चिपळूण ज्या गाडीने मी प्रवास केला त्याच्याबद्दल जे आज मी ब्लॉक बनवत आहे.

माझ्या या 11 वाजताची गाडीसाठी नेहमी प्रमाणे मी बस स्टँडवर अर्धा तास अगोदरच येऊन हजर झालो होतो. माझा गाडीचा नंबर होता MH 14 BT 3128. ही गाडी बरोबर फलट क्रमांक 5 वरून सुटते. ही गाडी तसं बघायला गेलं तर फार जुनी लाल परी होती. तब्बल 25 वर्षापासून या गाडीचा रूट Akluj to Chiplun चालू आहे.msrtc bus timetable पाहण्यासाठी या लिंक वर click करू शकता.

Akluj To Chiplun MSRTC Bus Timetable

खाली तुम्हाला Akluj To Chiplun Bus Timetable पाहायला मिळेल.अकलूज ते चिपळूण जाण्यासाठी सगळ्या गाड्या खाली दिलेल्या वेळानुसार निघतात.Akluj To Chiplun MSRTC Bus Timetable बस स्टँडवर लावेलेला दिसेल.

From ToTimingsRoutes
AklujChiplun11:00Natepute,Shikhar Shingnapur,Dahiwadi,Vaduj,Pusesawali,Karad,Patan,Koyna Nagar

Akluj To Chiplun Distance

Akluj to Chiplun
Akluj to Chiplun distance

अकलूज ते चिपळूण चा अंतर 230 km असा आहे.बरोबर 11 वाजता माझी गाडी अकलूज वरून चालायला सुरू झाले.अकलूज मध्ये गांधी चौकातून पुढे संग्राम नगर अशा छोट्या छोट्या टप्प्या घेत अकलूज मालशिरस हायवेवर बराच वेळ धावू लागल्यानंतर माझी लाल परी माऊली चौक होऊन पुढे थोड्याच अंतरावर माळशिरस बस स्टँड येथे सकाळी 11:30 पोहोचते.Akluj Bus Stand Timetable बद्दल अधिक माहिती हवी असेल तर इथे click करा.

माळशिरस बद्दल सांगायचं झालं तर हे अकलूज मधला सर्वात महत्त्वाचा तालुका आहे. अकलूज ते माळशिरस हा फक्त 13 किलोमीटरचा अंतर होता.अकलूज ते चिपळूण ह्या रूट वरती हा माझा पहिला टप्पा होता.अकलूज ते माळशिरस पर्यंत प्रवाशांनी गर्दी पाहायला मिळाली.

माळशिरस बस स्टँड सोडल्यानंतर बराच काळ माझी msrtc bus बस हायवेवर धावल्यानंतर हायवे वर येणारा छोटासा गाव सदाशिवनगर गावाला पार करत पुढे नातेपुते बस स्टॅन्ड इथे दुपारी १२ वाजता पलट क्रमांक २ वर येऊन थांबते.

ह्या मार्गवर मला दोन घाट बघायला मिळाले त्यातला पहिला घाटाच्या  नाव होतं शिखर शिंगणापूर घाट आणि दुसरा घाटाचं नाव होता कुंभार्ली घाट जे चिपळूण जवळ होता.

इथून पुढे शिखर शिंगणापूर घाट या मार्गे पुढे दहिवडीला माझी गाडी जाणार होती. नातेपुते ते दहिवडी हा अंतर 36 किलोमीटरचा होता. नातेपुते बस स्टॅन्डला सुधा प्रवाशांनी गर्दी पाहायला मिळाली.

नातेपुते पासून पुढे रस्ता फार चांगला वाटला.या घाटाला भरपूर वळणे वगैरे असल्यामुळे आणि माझी जुनी लाल परी ला चढताना भरपूर वेळ लागला. खरंच शिखर शिंगणापूर घाटचा नाझारा बघण्या सारखा आहे.

घाट उतरल्यानंतर दुपारी 12 वाजता च्या सुमारास पहिला जो टप्पा लागला तो शिखर शिंगणापूर बस स्टॅन्ड असा होता. हा बस स्टॅन्ड बरोबर शिखर शिंगणापूर मंदिराच्या पायथ्याजवळ स्थापित केलेला आहे.

शिखर शिंगणापूर बस स्टॅन्ड सोडल्यानंतर जवळजवळ अर्धा तास सिंगल रोड वर प्रवास केल्यानंतर माझी msrtc bus दहिवडी या बस स्टॅन्ड ला 1:30 वाजता पोहोचते. अकलूज पासून दहिवडी पर्यंत 67 किलोमीटरचा अंतर गाठला होता.

दहिवडी हा सातारा विभाग अंतर्गत मोडतो.इथून पुढे माझी msrtc bus बस थेट कराडला जाणार होती.

Akluj to Chiplun Ticket Price

या गाडीने जेव्हा प्रवास केला होता तेव्हा msrtc bus तिकीटचा दर 365 रुपये इतका होता.दहिवडी बस स्टँड सोडल्यानंतर पुढचा टप्पा वडूज बस स्टॅन्ड ला दुपारी 2 वाजता पोहोचते.अशा प्रकारे शहराच्या आतले रस्ते गाठत पुढे पुसेसावळी बस स्टॅन्ड ला दुपारी 2:45 पोहोचते.

बरंच वेळ रस्त्यावर धावल्यानंतर माझी गाडी शामगाव घाट हा छोटासा घाट पूर्ण केल्यावर पुढे धावू लागते.दहिवडी ते कराड पर्यंतचा रस्ता सिंगल होता.

आता माझी msrtc bus कराड या शहरात ओगलेवाडी या ठिकाणावरून होत पुढे कृष्णा नदीच्या पुलावरून पळत कराड या शहरात दुपारी 3:30 शिरते. करड बस स्टॅन्ड होऊन चिपळूण चा अंतर आता जवळ जवळ 95 किलोमीटर राहिला होता.

कराड ह्या रूट वरचा सातवा स्टॉप होता. कराड बस स्टॅन्ड हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि फार गर्दी असणारा बस स्टँड आहे. कराड बस स्टॅन्ड वरनं आता माझी गाडी कराड चिपळूण या हायवेवर धावताना एक महत्त्वाचा टप्पा मल्हार पेठ आणि नवा रस्ता या दोन ठिकाणी स्टॉप घेऊन पुढे चालू लागते. कराड ते चिपळूण ह्या रस्त्यावर बरेच लहान मोठे गाव जसे की साकुर्डी, विहेगाव,निरंबे चिरंबे, नेसरी फाटा अशाप्रकारे आहेत.

कराड बस स्टँड पासून पाटण पर्यंत 45 मिनिटांचा प्रवास केला होता. सातारा जिल्ह्यामध्ये एक तालुका असणारा गाव म्हणजे पाटण. माझी बस पाटण बस स्टॅन्ड मध्ये 4:37 वाजता शिरते. पाटण हा सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका आहे जिथे बऱ्याच लांब पल्ल्याच्या गाड्या घेऊन जेवण्यासाठी थांबतात.काही गाडी पुढे येणारा अजून एक ठिकाण कोयनानगर येथे जेवायला पण थांबतात.

कोयना नदीचा नजारा बघत आणि त्याच्या बाजूने होत माझी एसटी पुढे कोयना नगर साठी निघाली. ह्या मार्गावर दुसरा असा सर्वात मोठा घाट म्हणजे कुंभार्ली घाट.

या घाटाचा रस्ता भरपूर अरुंद असल्यामुळे गाडी फार सावकाश चालवावी लागते. कुंभार्ली घाट चढल्यानंतर शिरगाव आणि खेर्डी या दोन छोट्याशा गावा पार करत पुढे चिपळूण बस स्टॅन्ड ला  रात्री 07:25 पोहोचली.शिरगाव आणि खेर्डी पहोचल्यानंतर पूर्णपणे अंधार पसरलं होता.

Akluj To Chiplun MSRTC Bus

अशाप्रकारे 230 किलोमीटरचा अंतर गाठत आणि जवळजवळ साडेआठ तासाचा प्रवास करत मी अकलूज ते चिपळूण या ठिकाणी माझी बस द्वारे पोहोचतो. या बसच्या माध्यमातून एकूण दहा बस स्टॅन्ड पूर्ण केले गेले.

जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर आपला मित्रांना आणि नातेवाईकांना या ब्लॉग बद्दल सांगावे आणि शेअर करावे एवढेच इच्छा धन्यवाद.

FAQs

What is Akluj Bus Stand Contact number?

02185-222015

What is the distance from Akluj to Chiplun?

230 km

Leave a Comment