Akkalkot To Panaji MSRTC Bus

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझा Akkalkot to Panaji ह्या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे .तर अक्कलकोट हा ठिकाण सोलापूर विभाग अंतर्गत येतो.

या बस मध्ये सर्वात जास्त जास्त प्रवासी सोलापूरला उतरतात. अक्कलकोट हा सोलापूर जिल्ह्यात महत्त्वाचा बस स्टँड आहे. या बस स्टँडवर नेहमीच गर्दी असते. माझी गाडी  4:00 वाजता अक्कलकोट वरून पणजी साठी निघाली. ही गाडी तशी बघायला गेला तर लांब पल्ल्याची गाडी आहे.msrtc bus timetable ह्या दिलेल्या लिंक वर click करून महाराष्ट्रातील प्रत्येक msrtc Bus बदल माहिती मिळवू शकता.

Akkalkot To Panaji Bus Timetable

Akkalkot Bus Stand वरून Panaji जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात.

FromToTimingsRoutes
Akkalkot Panjim(Goa) 16:00Solapur, Mohol, Pandharpur, Sangola, Miraj, Sangli, Jaysingpur, Hatkanangale, Kolhapur Bus Stand, Radhanagari, Phonda, Karul, Kankavali, Oros, Kudal, Sawantwadi, Banda, Pernem, Mapusa

सोलापूर अक्कलकोट रोड हायवेवर धावता सोलापूर ह्या बस स्टॅन्ड ला संध्याकाळी 5:30 वाजता पोहोचते. मी ज्या गाडीने प्रवास केला त्या गाडीचा नंबर होता MH 13 CU 8455 असून माझ्या गाडीचा मार्ग अक्कलकोट,सोलापूर,मिरज,राधानगरी,कणकवली,सावंतवाडी आणि पणजी अशा प्रकारे होता. ही कोल्हापूर मार्गे जाणारी गाडी असून सिंधुदुर्ग विभागाची गाडी होती.

Akkalkot To Panaji MSRTC Bus Distance

 Akkalkot To Panaji Distance

अक्कलकोट पासून पणजी पर्यंत  हा माझा 450 किलोमीटरचा प्रवास झाला. सोलापूर हा सुद्धा अक्कलकोट सारखा महत्त्वाचा बस स्टँड आहे कारण इथून लांब पल्याच्या गाड्या सुटतात.Akkalkot Bus Stand Timetable बद्दल माहिती हवी असेल तर इथे click करा.

सोलापूर बस स्टँड इथून पुढे माझी गाडी हायवेवर धावताना कोंडी या गावा वरून धावू लागते. माझी ही गाडी सुपरफास्ट नाईट एक्सप्रेस असल्या कारणाने हायवेवर बरेच गाड्यांना ओव्हरटेक करत पुढे जाते. बराच काळ पुणे सोलापूर हायवे हवेवर धावल्यानंतर सावळेश्वर इथे टोल नाका पार करत मोहोळ बस स्टँड च्या आत संध्याकाळी 6:20 वाजता शिरते.

मोहोळ बस स्टॅन्ड झाल्यानंतर पुन्हा एकदा माझी गाडी सोलापूर पंढरपूर हायवेवर पेनुर ह्या गावी टोलनाका असलेल्या त्याच्यानंतर चंद्रभागा नदीच्या पुलावरून होत पंढरपूर या शहराच्या बस स्टॅन्ड मध्ये 7:10 पोहोचते. माझ्या बसच्या बोर्डावर सांगितल्याप्रमाणे मी आता पंढरपूर या बस स्टैंड वर आलो होतो. येथून पुढचे जे स्टॉप होते ते सांगोला,मिरज, सांगली आणि कोल्हापूर मार्गे असे होते.

Akkalkot To Panaji MSRTC Bus Ticket Price

या लालपरी बस चा तिकीट दर जो होता तो 720 रुपये असा होता. पंढरपूर बस स्टँड झाल्यानंतर आता पुढे खर्डी हा गाव पार करत माझी गाडी सांगोला या बस स्टॅन्ड ला 8:12 मिनिटांनी पोहोचते.

आतापर्यंत अकोला ते सांगोला पर्यंत 160 किलोमीटरचा प्रवास झाला होता. कोल्हापूर इथून 150 किलोमीटर चा अंतर होता.सांगोला वरून माझी गाडी पंढरपूर कोल्हापूर हायवेवर धावत अंकढल टोल नाका लागल्यानंतर पुढे जुनोनी या ठिकाणावरून होत पुढे एका धाब्यावर जेवणासाठी थांबते.

हा माझा ह्या मार्गावर जेवणासाठी पहिला थांबा होता. या ढाब्यावर बरेच लांब पालाची गाड्या येऊन थांबतात.

बरोबर 9:30 वाजता माझी गाडी या ढाब्यावरून सुटल्यानंतर नरसिंह गाव होत बोरगाव टोल नाक्यावर आल्यानंतर पुढे मिरज बस स्टैंड वर रात्री 10:30 वाजता पोहोचते.येथून कोल्हापूर साठी 50 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. मिरज बस स्टँड पार केल्यानंतर थोड्याच अंतरावर सांगली हा एक महत्त्वाचा बस स्टॅन्ड लागतो.

सांगली हा बस स्टँड झाल्यानंतर पुढे माझी गाडी हायवेवर धावताना अंकली पुलावरून जो कृष्ण नदीच्या वर बांधले गेलेला आहे.पुढे जयसिंगपूर ह्या बस स्टॅन्ड वर थोड्यावेळ थांबल्यानंतर पुढे घोटावडे हायवे वरचा प्रवास सुरू करते.

माझी बस रात्री 12:.00 वाजता कोल्हापूर बस स्टॅन्ड ला पोहोचते. कोल्हापूर हून जे राहिलेले ठिकाण होते ते अशा प्रकारे होते राधानगरी कणकवली सावंतवाडी आणि पणजी.

दहा मिनिटं कोल्हापूर बस स्टैंड वर थांबल्यानंतर पुढे माझी गाडी इथून निघते. ह्याच मार्गावर तुम्हाला फोंडा घाट पाहायला मिळेल. गुगल मॅप प्रमाणे कोल्हापूर बस स्टँड वरून पणजी 215 किलोमीटरचा अंतर  दाखवतो.

कोल्हापूर राधानगरी हायवेवर बराच काळ धावता कांडगाव या ठिकाणावरून होत तसाच पुढे देवळे आणि हळदी, घोडावडे या सगळ्या ठिकाणा करत राधानगरीला रात्री 1:27 येऊन पोहोचते.

Akkalkot To Panaji MSRTC Bus Final Stop

राधानगरी बस स्टँड पासून पुढे फेजिवडे हा गाव करत कुडाळ बस स्टॅन्ड ला सकाळी 5 वाजता पोहोचते. अर्धा तास प्रवास केल्यानंतर माझी Bus सावंतवाडी ह्या बस स्टैंड वर सकाळी 5:30 वाजता पोहोचते इथून पुढे हायवेवर धावताना माझी गाडी डार्गलिंब या ठिकाणावरून होत कोलवाले आणि करस्वाडा अशा छोट्या गावात करत पुढे पणजी शहर येण्याअगोदर मांडवी नदीच्या पुलावरून धावत सकाळी 6:00 वाजता पणजीला पोहोचते.

अशाप्रकारे जवळ जवळ 450 km चा हा प्रवास पूर्ण केला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना या ब्लॉग बद्दल सांगा आणि शेअर करा धन्यवाद.

FAQs

How Much Time Does It Take To Travel From Akkalkot To Panaji  Bus?

11 Hours

What Is Akkalkot To Panaji  Bus Distance By Road?

450 km

What Are The Boarding Points From Akkalkot To Panaji  Bus?

अक्कलकोट,सोलापूर,मिरज,राधानगरी,कणकवली,सावंतवाडी आणि पणजी

Leave a Comment