Dhule to Tuljapur Bus Journey

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगमध्ये Dhule to Tuljapur ह्या प्रवासा बद्दल माहिती देणार आहे.

माझ्या गाडीचा मार्ग धुळे पासून संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि शेवटी तुळजापूर अशा प्रकारे होता.माझ्या गाडीचा नंबर होता MH 20 GC 2988.

Dhule to Tuljapur MSRTC Bus Timetable

खाली तुम्हाला Dhule to Tuljapur Bus Timetable पाहायला मिळेल.धुळे ते तुळजापूर जाण्यासाठी सगळ्या गाड्या खाली दिलेल्या वेळानुसार निघतात.

From ToTimingsRoutes
DhuleTuljapur20:30Usmanabad,Yermala,Beed,Gevrai,Pachod,Aurangabad,Kannad,Chalisgaon

Dhule to Tuljapur Distance

Dhule to Tuljapur Distance

धुळे ते तुळजापूरचा अंतर 420 किलोमीटर असा होता. ज्याला कमीत कमी 9 तासांचा कालावधी लागतो. तर माझी msrtc आता सकाळी 7:00 वाजता Dhule Bus Stand वरून पुढचा प्रवास करण्यासाठी सुरू करते.

Dhule To Tuljapur MSRTC Bus Ticket Price

Dhule To Tuljapur ह्या मार्गावर चा तिकीट दर 780 रुपये अशाप्रकारे होता.धुले बस स्टँड येथून बाहेर थोड्याच अंतरावर युनिटी सर्कल ह्या पाशी आल्यानंतर आपल्या पुढचा प्रवास करत गडतार ह्या ठिकाणावरून होत तसेच विंचूर ह्या ठिकाणावरून पुढे बोरी नदीवर बांधलेला पुलावरून होत धुळे सोलापूर हायवेवर धावू लागली.

बराच काळ रस्त्यावर वर धावल्यानंतर मेहूनबारे ह्या गावावरून पुढे गिरणा नदी ओलांडून चाळीसगाव बस स्टैंड वर 57 किलोमीटरचा प्रवास करून सकाळी 8:30 वाजता पाहोचली.

चाळीसगाव हा आपला मार्गावरील पहिला थांबा होता. इथून संभाजीनगर 98 किलोमीटरच्या अंतरावर आहे.

चाळीसगाव बस स्टॅन्ड वरून पुढे कन्नड घाट पार केल्यानंतर भामरवाडी ह्या ठिकाणावरून होत पुढे कन्नड बस स्टैंड वर सकाळी 9:30 वाजता पोहोचली.

कन्नड बस स्टँडवरून संभाजीनगर हा 62 किलोमीटरचा अंतर राहिलेला होता. कन्नड हा आपल्या मार्गावरील दुसरा टप्पा होता. जवळजवळ धुळे पासून 90 किलोमीटरचा अंतर पार केल्यानंतर कन्नड बस स्टँडवर मी पोहोचलो होतो.

कन्नड स्टँडवरून पुढे माझी msrtc हातनूर ह्या ठिकाणी टोल नाका पार करत टापरगाव इथून पळसवाडी ह्या ठिकाणी असणारा हॉटेल आम्रपाली येथे जेवणासाठी थांबा घेते

जेवण झाल्यानंतर माझी बस आता पुढचा प्रवास करण्यासाठी सुरू करत वेरूळ ह्या ठिकाणावरून पुढे दौलताबाद नंतर संभाजीनगर येथे नगर नाका तसेच थोड्या अंतरावर पुढे महावीर चौक इथून प्रवास करत शेवटी संभाजीनगर बस स्टैंड वर सकाळी 11:00 वाजता पोहोचल्यानंतर आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी निघाली.

संभाजीनगर बस स्टँडवरून तुळजापूर हा 4:30 तासांचा रस्ता शिल्लक राहिला होता. संभाजीनगर सेंट्रल बस स्टँड वरून मी आता सिडको बस स्टैंड वर माझी बस पोहोचली. सिडको बस स्टँडवर चालक आणि वाहक यांची बदली झाली.

धुळे ते संभाजीनगर आतापर्यंत 148 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता. संभाजीनगर वरून धुळे 268 किलोमीटरचा अंतर होता.

संभाजीनगर बस स्टँड वरून आता माझी msrtc बीड ह्या दिशेने प्रवास करायला सुरू केली.

प्रवास करत असताना चिते पिंपळगाव ह्या ठिकाणावरून तसेच पुढे अडूळ हा गाव करत भोकरवाडी ह्या ठिकाणी असणारा टोल नाका पार करून पाचोड बस स्टैंड वर दुपारी 12:30 वाजता पोहोचली.

पाचोड बस स्टँड वरून पुढे माझी msrtc वडीगोद्री ह्या ठिकाणावरून पुढे बाग पिंपळगाव हा ठिकाण करत गेवराई बस स्टैंड वर दुपारी 1:15 वाजता पोहोचली.

गेवराई बस स्टँड झाल्यानंतर पुढचा ठिकाण म्हणजे पाडळसिंगी येथे असणारा टोल नाका पार केल्यानंतर बीड बस स्टैंड वर दुपारी 2:00 वाजता पोहोचली.

बीड शहरातून बाहेर पडताना माझी बस विंडोसारा नदीच्या पुलावरून प्रवास करत मांजरसुंबा ह्या गावावरून होत पुढे चौसाळा बस स्टैंड वर थोड्या वेळासाठी थांबा घेतल्यानंतर पुढे पारगाव ह्या ठिकाणी असणारा टोल नाका च्या पुढे सरमकुंडी नाक्यावर हॉटेल यशोदा प्युअर व्हेज इथे दुपारी 3:00 वाजता जेवणासाठी थांबा घेते

ह्या ठिकाणावरून तुळजापूर फक्त 82 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.

जेवण झाल्यानंतर माझी msrtc आता निघाली त्यावेळी येरमाळा बस स्टँडवर थांबा घेत पुढे हायवेवर परत एकदा धावू लागली.

बराच काळ प्रवास केल्यानंतर माझी msrtc आता येडशी बस स्टैंड वर थोडावेळ वेळासाठी थांबा घेतल्यानंतर पुढचा प्रवासासाठी परत एकदा धावू लागली.

थोडं अंतरावर पुढे येडशी इथे असणारा टोल नाका पार करत धाराशिव बस स्टैंड वर 5:15 वाजता पोहोचली.

Dhule to Tuljapur Final Destination

धाराशिव बस स्टँड वरून पुढेबराच काळ प्रवास केल्यानंतर शेवटी माझी बस आता तुळजापूर बस स्टैंड वर संध्याकाळी 6:00 वाजता पोहोचली.

अशाप्रकारे माझा Dhule To Tuljapur प्रवास पूर्ण झाला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना माझ्या ब्लॉग बद्दल माहिती द्या धन्यवाद.

FAQs

How Much Is Dhule to Tuljapur Msrtc Bus Ticket Price?

780 रुपये

How Long Does It Take To Drive From Dhule to Tuljapur?

9 Hours

Which Bus Operator Offers The Cheapest Fare From Dhule to Tuljapur?

msrtc bus

Leave a Comment