How I Travelled From Kolhapur to Parbhani By MSRTC

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या या ब्लॉगद्वारे Kolhapur to Parbhani या मार्गावरील केलेल्या प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.

ही गाडी कोल्हापूर बस स्टँड वरून संध्याकाळी 6:00 वाजता निघाली. या गाडीचा मार्ग कोल्हापूर बस स्टँडवरून पंढरपूर, बार्शी, कळंब, परळी आणि शेवटी परभणी अशा प्रकारे होता.

ज्या गाडीने मी प्रवास केला त्या गाडीचा नंबर MH 20 GC 3487 होता. या गाडीचे चालक आणि वाहक दोघांची बदली पंढरपूर बस स्टैंड वर झाली.

Kolhapur to Parbhani MSRTC Bus Timetable

Kolhapur  Bus Stand वरून Parbhani  जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात

FromToTimingsRoutes
Kolhapur Bus Stand Parbhani8:00, 18:00Jaysingpur, Sangli, Miraj, Sangola, Pandharpur, Barshi,Kalamb,Ambajogai, Parali Vaijnath

Kolhapur To Pandharpur Distance

Kolhapur to Parbhani Distance

कोल्हापूर ते पंढरपूर हा जवळपास 500 किलोमीटरचा अंतर आहे.या गाडीने माझा रात्रीचा प्रवास झाला होता. तर मित्रांनो कोल्हापूर बस स्टँडवरून संध्याकाळी 6:00 वाजता बाहेर पडत तसेच शहरातून वाट काढत माझी बस पुढे कोल्हापूर शहराच्या बाहेर पंचगंगा नदीच्या पुलावरून प्रवास करत हातकणंगले तसेच जयसिंगपूर बस स्टैंड वर संध्याकाळी 7:00 वाजता पोहोचत तसेच पुढे अंकली इथे कृष्णा नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस आता सांगली शहरात शिरते.

संध्याकाळी 7:30 वाजता सांगली बस स्टैंड वर पोहोचत पुढे मिरज बस स्टैंड वर संध्याकाळी 8:00 वाजता पोहोचल्यानंतर पुढे मिरज सांगोला पंढरपूर हायवे वरून बराच काळ प्रवास केल्यानंतर आता माझी बस हायवे लागत असणारा सुनील ढाबा येथे रात्री 9:15 वाजता थांबा घेते.

इथून पुढे परत एकदा हायवे वरून प्रवास करत पुढे अंकढल या ठिकाणी टोल नाका पार करत पुढे सांगोला बस स्टँडवर रात्री 10:15 वाजता माझी बस पोहोचली.

इथून पुढे परत एकदा हायवे वरून प्रवास करत आता माझी बस पंढरपूर बस स्टैंड वर रात्री 11: 00 वाजता फलट क्रमांक पाचवर पोहोचली.

पंढरपूर या ठिकाणी या गाडीचे चालक आणि वाहकाची बदली झाली. इथून पुढे बार्शी मार्गे कळंब आंबेजोगाई आणि परभणी अशाप्रकारे या गाडीचा मार्ग निर्धारित होता.आतापर्यंत कोल्हापूर पासून पंढरपूर 185 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता.

Kolhapur To Parbhani Ticket Price

Kolhapur To Parbhani तिकीट दर जवळपास 700 रुपये होता जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.

पंढरपूर बस स्टँड वरून बाहेर पडत चंद्रभागा नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे रोपळे नंतर येरमाळा बस स्टैंड वर रात्री 2:00 वाजता पोहोचत पुढे परत एकदा हायवेवरून प्रवास करत माझी बस आता कळंब बस स्टैंड वर रात्री 2:15 वाजता पोहोचली.

तसेच हायवेवरून प्रवास करत माळेगाव येथे चहा पाणी साठी रात्री 2:40 वाजता थांबली.या ठिकाणावरून आंबेजोगाई 46 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे. हा अंतर गाठण्य्साठी दीड तासांचा कालावधी लागतो.

तर चहापाणी झाल्यानंतर माझी बस बराच काळ धावल्यानंतर आंबेजोगाई बस स्टैंड वर रात्री 3:30 वाजता पोहोचली. इथून पुढे परळी गंगाखेड मार्गे परभणीच्या दिशेने माझी बस आता धावू लागली.

आंबेजोगाई बस स्टँड वरून परभणी हा 90 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.कन्हेरवाडी या ठिकाणावरून होत बराच काळ प्रवास केल्यानंतर माझी बस आता सकाळी 4:00 वाजता परळी बस स्टैंड वर पोहोचली.

थोडा काळ थांबला घेतल्यानंतर परत एकदा रस्त्यावर धावत गंगाखेड बस स्टैंड वर सकाळी 5:00 वाजता पोहोचत पुढे दैठणा नंतर बोरवंड तसेच तरोडा या सगळ्या मार्गावरून होत माझी बस आता शेवटी परभणी बस स्टैंड वर सकाळी 5:45 वाजता पोहोचली.

Kolhapur To Parbhani Final Destination

अशाप्रकारे माझा Kolhapur To Parbhani चा हा प्रवास पूर्ण झाला. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग वाचायला आवडत असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद.

FAQs

How much is Kolhapur to Parbhani  msrtc bus ticket price?

700 Rupees

How long does it take to drive from Kolhapur to Parbhani ?

11 Hours

What are the boarding points from Kolhapur?

पंढरपूर, बार्शी, कळंब, परळी

Leave a Comment