नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे मी केलेला Karad To Solapur ह्या प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.
तर मित्रांनो कराड बस स्टैंड वर फलट क्रमांक 9 वरून बरोबर सकाळी 9:30 वाजता निघाली. ही गाडी सोलापूर विभागाची होती. या गाडीचा मार्ग कराड पासून विटा, भिवघाट, आटपाडी, पंढरपूर आणि शेवटी सोलापूर अशा प्रकारे होता.
Table of Contents
Karad To Solapur MSRTC Bus Timetable
Karad Bus Stand वरून Solapur जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात
| From | To | Timings | Routes |
| Karad | Solapur | 5:30, 7:00, 7:45, 9:00, 8:50, 9:30, 10:00, 11:30, 12:00, 13:00, 13:10, 14:00, 14:35, 15:0, 15:10, 16:00, 20:00 | Kadegaon, Vita, Bhivaghat,Khanapur, Atpadi, Pandharpur, Mohol |
Karad To Solapur Distance

Karad To Solapur हा जवळपास 240 किलोमीटरचा अंतर आहे. कराड शहरातून बाहेर पडत कृष्णा नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे ओगलेवाडी या ठिकाणावरून होत तसेच राजमाची नंतर सुरली घाट पार करत पुढे कडेगाव बस स्टैंड वर बरोबर 10:00 वाजता पोहोचली. कराड ते कडेगाव हा जवळपास 20 किलोमीटरचा अंतर आहे.कडेगाव हा सांगली विभाग अंतर्गत मोडतो. इथून पुढे माझी बस आता विटा या दिशेने धावू लागली.
Karad To Solapur Ticket Price
Karad To Solapur हा जवळपास 300 रुपये होता जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे याबाबत प्रवाशांनी नोंद घ्यावी.
कडेगाव बस स्टँड मधून बाहेर पडल्यानंतर कडेपूर बस स्टँडवर पहोचल्यानंतर पुढे हनुमंतवाडीये इथून होत तसेच पुढे येरळा नदीच्या पुलावरून प्रवास करत आता माझी बस विटा बस स्टँडवर सकाळी 10: वाजता फलट क्रमांक 4 वर पोहोचली.
कडेपूर बस स्टँड नंतर विटा हा माझ्या मार्गावरचा तिसरा टप्पा होता. विटा बस स्टॅन्ड इथून पुढे बराच काळ प्रवास केल्यानंतर माझे बस रेणावी इथून होत बराच काळ प्रवास केल्यानंतर तामखडी इथून होत पुढे माझी बस आता खानापूर बस स्टैंड वर सकाळी 11:00 वाजता पोहोचली.
खानापूर बस स्टँड सोडल्यानंतर माझी बस आता भिवघाट बस स्टँड वरून पुढे बर हायवेवरून प्रवास करत गोमेवाडी इकडून होत करगणी नंतर तळवडे इथून होत माझी बस आटपाडी बस स्टैंड वर सकाळी 11: वाजता पोहोचली. आटपाडी हा सांगली विभाग अंतर्गत मोडतो. या ठिकाणी माझी बस जेवणासाठी पंधरा मिनिटं थांबा घेतली.
इथून पुढे माझी बस आता 60 किलोमीटरचा अंतर गाठत पंढरपूरच्या दिशेने धावू लागली.आतापर्यंत कराड पासून आटपाडी हा जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता.
आटपाडी बस स्टँड सोडल्यानंतर माझी बस आता हायवे वरून प्रवास करत दिघांची या ठिकाणावरून होत पुढे महूद नंतर पंढरपूर बस स्टैंड वर दुपारी 1:30 वाजता पोहोचले.
आटपाडीनंतर पंढरपूर हा बस स्टॅन्ड आला होता. इथून पुढे मोहोळ मार्गे आता माझी बस धावायला सुरू करते.
पंढरपूर शहराच्या बाहेर चंद्रभागा नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे पंढरपूर सोलापूर हायवे वरून धावत पुढे तुंगत या ठिकाणावरून होत नंतर पेनुर तसेच मोहोळ बस स्टैंड वर दुपारी 2: वाजता पोहोचत पुढे परत एकदा हायवे वरून धावत लांबोटी या ठिकाणावरून होत तसेच सावळेश्वर या ठिकाणी टोलनाका पार करत माझी बस आता सोलापूर बस स्टैंड वर 2:45 वाजता पोहोचली.
Karad To Solapur Final Destination
ह्या मार्गावरील मला नऊ बस स्टॅन्ड वरून प्रवास करण्याची संधी मिळाली. या नऊ बस स्टँड कराड ,कडेगाव, कडेपुर, विटा, खानापूर, आटपाडी, पंढरपूर, मोहोळ आणि शेवटी सोलापूर अशा प्रकारे होते.
तर अशाप्रकारे माझा हा कराड ते सोलापूरचा प्रवास पूर्ण झाला. जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर आपला मित्र मैत्रिणींना या ब्लॉग बद्दल माहिती द्या.
FAQs
What is the Karad To Solapur Distance by road?
240 किलोमीटर
What are the boarding points from Karad?
विटा, भिवघाट, आटपाडी, पंढरपूर आणि शेवटी सोलापूर