नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे माझा Pune Shivaji Nagar To Yavatmal ह्या मार्गावरील केलेला प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.
तर मित्रांनो पुणे शिवाजीनगर बस स्टँडवरून माझा हा प्रवासाची सुरुवात झाली. ह्या गाडीचा नंबर MH 40 CM 5450 होता.
Table of Contents
Pune Shivaji Nagar To Yavatmal Distance By MSRTC Bus

Pune Shivaji Nagar To Yavatmal हा जवळपास 700 किलोमीटरचा हा प्रवास झाला. हा खूप लांब पलाचा मार्ग आहे. ह्या गाडीचा मार्ग पुणे पासून छत्रपती संभाजीनगर, जालना, मेहकर, वाशिम, पुसद आणि शेवटी यवतमाळ होता.
Pune Shivaji Nagar To Yavatmal Ticket Price
Pune Shivaji Nagar To Yavatmal पर्यंत टिकीटच भाडं जवळपास 950 रुपये होता जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे ह्याची नोंद घ्यावी.
तर बरोबर 6:00 वाजता माझी बस पुणे शिवाजीनगर बस स्टँड वरून तिचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी पुणे शहरातून बाहेर पडत वाघोली ह्या ठिकाणावरून होत पुणे अहमदनगर हायवे वरून धावत पुढे शिरूर बस स्टैंड वर रात्री 8:00 वाजता फॉलेट क्रमांक पाचवर पोहोचली.
इथून पुढे माझी बस परत एकदा हायवेवरून प्रवास करत पुढे पुण्या पासून जवळजवळ 90 किलोमीटरचा प्रवास करत पुढे पालवे खुर्द ह्या ठिकाणी हॉटेल धनश्री इथे जेवण्यासाठी थांबते.
जवळपास 20 मिनिटं थांबल्यानंतर माझी गाडी परत एकदा आपला पल्ला गाठण्यासाठी बराच काळ धावत माळीवाडा बस स्टँड नंतर स्वास्तिक बस स्टँड येथून पुढे अहिल्यानगर तारकपूर बस स्टैंड वर रात्री 10:00 वाजता फलट क्रमांक एक वर पोहोचली.
इथून पुढे माझी बस अहमदनगर संभाजी नगर हायवे वरून प्रवास करत नेवासा फाटा कडून होत आता माझी बस बराच काळ प्रवास केल्यानंतर छत्रपती संभाजी नगर बस स्टैंड वर रात्री 12:00 वाजता पोहोचली.
इथून पुढे माझी बस पंधरा मिनिटे चा अंतरावर असणारा सिडको बस स्टैंड वर रात्री 12:15 वाजता पोहोचली.
परत एकदा संभाजीनगर नागपूर हायवे वरून प्रवास करत माझी बस जालना बस स्टैंड वर रात्री 1:15 वाजता पोहोचत पुढे देऊळगाव राजा बस स्टैंड वर रात्री 1:45 वाजता पोहोचत पुढे सिंदखेड राजा ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे किनगाव राजा नंतर दुसरबीड दिशेने धावत पुढे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर बस स्टँड वर रात्री 3:00 वाजता पोहोचली.
आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि पुढे विदर्भ ह्या सगळ्या विभागातून माझा प्रवास पूर्ण झाला. आतापर्यंत पुणे शिवाजीनगर बस स्टँडवरून जवळजवळ 400 किलोमीटरचा माझा प्रवास इथपर्यंत पूर्ण झाला होता.
इथून पुढे मला अजून 200 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करायचा शिल्लक राहिला होता.
छत्रपती संभाजी नगर नागपूर हायवे वरून पुढे बरंच काळ धावल्यानंतर अंजनी बुद्रुक ह्या ठिकाणी चहापाणीसाठी थोडा काळ थांबा घेतल्यानंतर पुढे परत एकदा धावत डोणगाव नंतर जहागीर मालेगाव ह्या ठिकाणावरून होत अकोला वाशिम हायवेवरून प्रवास करत वाशिम बस स्टैंड वर सकाळी 4:30 वाजता पोहोचली.
वाशिम बस स्टैंड वर ह्या गाडीचे चालक आणि वाहक यांची बदली झाली. आतापर्यंत पुणे जिल्हा, अहमदनगर छत्रपती संभाजी नगर, जालना, बुलढाणा आणि आता वाशिम जिल्हा ह्या सगळ्या जिल्हा मधून माझी एसटी धावली.
वाशिम बस स्टँडवरून पुसद जवळपास 60 किलोमीटरचा अंतर आहे आणि तसेच यवतमाळ 135 किलोमीटर चा अंतर आहे. वाशिम जिल्हा मध्ये कारंजा मंगळूर पीर मानोरा मालेगाव रिसोड आणि वाशिम अशा प्रकारे तालुके आहेत.
इथून पुढे माझी बस आता पुसद मार्गे यवतमाळच्या दिशेने धावत पुढे अनसिंग बस स्टँडवर सकाळी 6:30 वाजता पोहोचत मांजरजवळा ह्या ठिकाणावरून होत पुढे मारवाडी फाटा नंतर येलदरी ह्या गावावरून होत माझे एसटी आता पुसद बस स्टैंड वर 7:15 वाजता पोहोचले.
इथून पुढे माझी बस पुसद दिग्रस हायवेवरून प्रवास करत पुढे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस बस स्टैंड वर 8:00 वाजता पोहोचली. दिग्रस बस स्टैंड वर एकूण आठ फलट दिलेले आहेत.
Pune Shivaji Nagar To Yavatmal Final Destination
इथून पुढे माझी बस 75 किलोमीटर चा अंतर गाठण्यासाठी दारवा मार्गे यवतमाळच्या दिशेने धावत सिंधी ह्या ठिकाणावरून होत माझी बस आता दारवा बस स्टँडवर सकाळी 8:30 वाजता पोहोचत परत एकदा पुढे दारवा हायवेवरून प्रवास करत बोरी खुर्द नंतर तिवसा इथून पुढे दारवा घाट पार करत माझी बस आता दारवा बस स्टैंड वर सकाळी 9:15 वाजता पोहोचली.
अशाप्रकारे पुणे शिवाजीनगर ते यवतमाळ हा पंधरा तासांचा माझा प्रवास पूर्ण झाला.