How To Travel From Mumbai Central To Bangalore

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे माझा Mumbai Central To Bangalore ह्या मार्गावरील केलेल्या प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.

तर मित्रांनो नेहमीप्रमाणे मी अर्धा तास अगोदरच मुंबई सेंट्रल बस स्टैंड वर माझी बसची वाट पाहत थांबलो होतो.चारही बाजूने उंच उंच बिल्डीनगींच्या मधोमध असणार हा मुंबई सेंट्रल बस स्टैंड आहे.आता पावसाळी वातावरण सुरु झाला होता तेव्हा ह्या ठिकाणी जागे जागे पाणी साठलेला दिसला.

Mumbai Central To Bangalore Distance By MSRTC Bus

Mumbai Central to Bangalore Distance

Mumbai Central To Bangalore हा जवळ जवळ एक 1000 किलोमीटरचा प्रवास ठरला. हा माझा आयुष्यातील सर्वात लांब पल्याचा प्रवास झाला होता. ही हिरकणी गाडी असून मुंबई विभाग आणि परळ आगाराची होती.

ह्या गाडीचा मार्ग मुंबई सेंट्रल पासून मेगा एक्सप्रेस हायवे मार्गे सातारा, कराड, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, दावणगिरी, चित्रदुर्ग आणि शेवटी बेंगलोरु अशाप्रकारे होता.

Mumbai Central To Bangalore MSRTC Bus Timetable

मुंबई सेन्ट्रल ते बंगलोर जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात

From ToTimingsRoutes
Mumbai CentralBangalore9:30 Dadar,Kurla Nehru Nagar,Panvel,Satara, Karad, Kolhapur, Belagavi, Hubballi, Davanagere, Chitradurga

Mumbai Central To Bangalore Ticket Price

ह्या हिरकणी गाडीचा तिकीट दर Mumbai Central To Bangalore 1655 रुपये होता.ह्या गाडी मध्ये सीट भरपूर आरामदायी होते.

तर मित्रांनो मुंबई सेंट्रल वरून सकाळी 9:30 वाजता मुंबईच्या ट्राफिक मधून वाट काढत दादर ह्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पुढे कुर्ला नेहरूनगर बस स्टैंड वर पोहोचत नंतर हायवे वरून प्रवास करत जुना वाशी ब्रिज पार करत पुढे टोलनाका नंतर पनवेल बस स्टैंड वर सकाळी 11:47 वाजता पाहोचली.

इथून आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी परत एकदा हायवेवरून बराच काळ प्रवास करत आता माझी गाडी खालापूर टोल नाका पार करत दुपारी 12:30 वाजता राज ढाबा येथे जेवणासाठी थांबली. ह्या धाब्यावर बरेच गाड्यांचा रहदारी दिसली.आमची गाडी आल्यावर पाठोपाठ पुष्कळ आल्या.

150 रुपये देऊन मी माझ्यासाठी मागवली वेह्ज थाळी.ह्या थाळी मध्ये दोन तंदुरी रोटी,दाल,एक भाजी,

खालापूर येथून पुढे शिरवळ मार्गे सातारा, कराड आणि कोल्हापूरच्या दिशेने धावत अशा ह्या पावसाळी वातारणात सुंदर आणि रमणीय खंडाळा घाटाचे दृश्य बघत केला.खंडाला घाटाच्या रस्त्यावर पूर्ण धुंक परसली होती तसेच खंडाला घाटाच्या दऱ्या दिसायला अत्यंत सुंदर होते.

माझी बस खंडाला घाट पार केल्यानंतर पुढे वाकड नंतर वारजे कडून नंतर नवा कात्रज बोगद्यामधून प्रवास करत तसेच पुढे धनगरवाडी तसेच पारगाव नंतर खंबटगी घाट पार करत भुईंज ह्या ठिकाणी हॉटेल साई सेवा येथे जेवणासाठी दुपारी 3:45 वाजता माझी एसटी थांबली.

आतापर्यंत मुंबई सेंट्रल वरून 240 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता. इथून पुढे एक 29 किलोमीटरचा अंतर असलेला सातारा गाठण्यासाठी परत एकदा हायवेवरून धावू लागली.

पुणे बेंगलोर हायवे वरून धावत असताना आनेवाडी ह्या ठिकाणी टोलनाका पार करत सातारा बस स्टैंड वर दुपारी 4:30 वाजता पोहोचत पुढे नागठाणे नंतर कराड बस स्टैंड वर संध्याकाळी 5:30 वाजता पाहोचली.संध्याकाळची वेळ होती शाळा आणि कॉलेज सुटल्या होत्या म्हणून कराड बस स्टैंड वर मुलामुलींचे अफाट गर्दी पाहायला मिळाली.

कराड बस स्टैंड वरून परत एकदा पुढचा टप्पा गाठण्य्साठी नेरले येथून पुढे कोल्हापूर बस स्टैंड वर संध्याकाळी 7:30 वाजता फलट क्रमांक दहावर पोहोचली.

कोल्हापूर बस स्टैंड वर गाडीचे चालक आणि वाहक यांची बदली झाली. कोल्हापूर बस स्टँड वरून बेंगलोर हा 614 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे. हा अंतर गाठण्यासाठी जवळपास 12 तासांचा कालावधी लागतो.कोल्हापूर बस स्टैंड वर कायम गर्दी दिसेल.हळूहळू संध्याकाळ झाली होती आणि अंधार पसरलं होता.बाहेरचा आता कमीच दिसू लागला होता.

पंधरा मिनिटं कोल्हापूर बस स्टैंड वर थांबल्यानंतर माझी बास आता कोल्हापूर बस स्टँडवरून बाहेर पडत कागल बस डेपो इथे गाडीमध्ये डिझेल भरला गेला.

डिझेल भरून झाल्यानंतर माझी गाडी आता परत एकदा हायवेवरून प्रवास करत पुढे कोगनोळी येथे टोलनाका पार करत माझी बस आता निपाणी बस स्टैंड वर रात्री 8:50 वाजता पोहोचली .कोगनोळी येथे कर्नाटका राज्यची हद्द सुरु झाली.रात्रीचा प्रवास होता म्हणून बाहेरचा काहीच दिसत नव्हताच.

इथून पुढे हत्तरगी टोलनाका पार करत थोडासा अंतरावर राम धाबा येथे रात्री 10:15 वाजता जेवणासाठी थांबली .राम धाबाच्या अगदी समोरासमोर आणखीन एक धाबा दिसेल.धाबाचा बांधकाम जबरदस्त वाटला.

ह्या धाब्यावर बरेच गाड्या दिसले.इथून बेळगाव हा 28 किलोमीटरच्या अंतरावर होता.इथे तुम्हाला वेह्ज आणि नॉनव्हेज मिळेल.वेह्ज आणि नॉनव्हेज साठी वेगळेवेगळे बिल्डिंग आहेत.प्रवास करून जाम भूक लागली होती.

मी धाखल झालो वेह्ज सेक्शन मध्ये आणि एक वेह्ज थाळी मागवली.ह्या थाळी मध्ये मला दोन प्रकारचे दाल,एक भाजी,भात,दो चपात्या आणि कोशिंबीर,तळण अशा प्रकारे होते. एक पाण्याची बाटली आणि वेह्ज थाळीचा खर्च 170 रुपये पडला.

इथून पुढे संकेश्वर बेळगाव हायवे वरून प्रवास करत पुढे होणगा नंतर थोड्याच अंतरावर बेळगाव बस स्टैंड वर रात्री 11:00 वाजता फलट क्रमांक चारवर पोहोचली.बेळगाव बस स्टैंड अफाट मोठा आणि जबरदस्त वाटला.आतले रस्ते कॉंक्रीटच्या आहेत तसेच असंख्य फलाट आहेत.बस स्टैंडच्या वेगवेगळ्या ठिकाणी फलाट आहेत.

इथून पुढे हिरेबागेवाडी टोलनाका पार करत बराच काळ प्रवास केल्यानंतर पुढे हावेरी बस स्टैंड रात्री 3:00 वाजता पोहोचली.

पुढे नेवलगल नंतर चलगिरी कडे टोलनाका पार करत तुंगभद्रा नदीच्या पुलावरून होत तसेच हरिहर नंतर दावणगिरी बस स्टैंड वर सकाळी 4:30 वाजता पाहोचली .दावणगिरी बस स्टैंड सुद्धा खूपच मोठा आणि स्वच्छ आहे.

इथून पुढे चित्तदुर्ग मार्गे 265 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. हा अंतर गाठण्यासाठी जवळपास पाच तासांचा कालावधी लागला.दावणगिरी ते चित्रदुर्ग 61 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.

अनगडू ह्या ठिकाणावरून होत पुढे सीरा ह्या ठिकाणावरून थोडा अंतरावर वर हायवेच्या लागत असणारा हॉटेल कामात इथे सकाळी 6:45 वाजता चहापाण्यासाठी थांबा घेते.

हावेरी ह्या ठिकाणी गाडीचे चालक आणि वाहक यांची बदली झाली होती. येथून बेंगलोर 117 km चा अंतर शिल्लक राहिला होता.

Mumbai Central To Bangalore Final Destination

हा अंतर पार करण्यास जवळपास तीन तासांचा कालावधी लागतो.चहापाणी झाल्यानंतर पुढे करेजेवणहल्ली टोलनाका पार करत वसंतानरसापुर ह्या ठिकाणावरून होत तुमकुर नंतर चोक्कनहल्ली टोलनाका पार करत पुढे नीलमंगला नंतर यशवंतपुर तसेच राजाजी नगर येथून पुढे माझी बस आता बेंगलोर बस स्टैंड वर सकाळी 9:15 वाजता पोहोचली.हीच गाडी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता निघते.

  • Distance: 1000 Km
  • Routes: Dadar,Kurla Nehru Nagar,Panvel,Satara, Karad, Kolhapur, Belagavi, Hubballi, Davanagere, Chitradurga
  • Timings: सकाळी 9:30
  • Travel Duration: 24 Hours
  • Ticket Price: 1655 रुपये

अशाप्रकारे माझा Mumbai Central To Bangalore चा हा 1000 किलोमीटरचा आणि 14 तासांचा हा प्रवास पूर्ण झाला.

FAQs

What Are The Boarding Points From Mumbai Central To Bangalore?

मुंबई सेंट्रल पासून मेगा एक्सप्रेस हायवे मार्गे सातारा, कराड, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, दावणगिरी, चित्रदुर्ग आणि शेवटी बेंगलोरु

How Much Time Does It Take To Travel From Mumbai Central To Bangalore?

24 Hours approximately

1 thought on “How To Travel From Mumbai Central To Bangalore”

Leave a Comment