How To Travel From Khed To Jalgaon Via Tamhini Ghat

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये Khed To Jalgaon ताम्हिणी घाट मार्गे ह्या मार्गावरील केलेल्या प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.

Khed To Jalgaon Distance

Khed To Jalgaon Distance

Khed To Jalgaon चा अंतर जवळ जवळ 670 Km आहे.तर मित्रांनो बरोबर 9:30 वाजता खेड बस स्टँड मधून माझी बस आता आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी धावायला सुरू करते. खेड बस स्टॅन्ड हा रत्नागिरी जिल्हा अंतर्गत मोडतो.

ह्या गाडीचा मार्ग खेड पासून महाड, मुळशी, पुणे स्वारगेट, अहमदनगर, संभाजीनगर, सिल्लोड, अजंठा अशाप्रकारे होता.

Khed To Jalgaon MSRTC Bus Timetable

Khed Bus Stand वरून Jalgaon जाण्यासाठी ह्या वेळानुसार निघतात.

FromToTimingsRoutes
Khed  Jalgaon9:30Mahad, Mulshi, Pune Swargate, Ahmednagar, Shambaji Nagar,Sillod, Ajanta

Khed To Jalgaon Ticket Price

Khed To Jalgaon चा टिकीट दर जवळपास 600 रुपये होता जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे.

मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे वरून प्रवास करत कशेडी घाट पार करत माझी बस पोलादपूर बस स्टैंड वर सकाळी 10:30 वाजता पोहोचली.

ह्या ठिकाणी माझी बस चहापाणीसाठी 10 मिनिट थांबली. खेड ते पोलादपूर चा अंतर जवळपास 34 किलोमीटरचा अंतर पूर्ण झाला होता. पोलादपूर हा रायगड विभाग अंतर्गत मोडतो.

इथून पुढे 20 किलोमीटरच्या अंतरावर असणारा महाड गाठण्यासाठी माझी बस रवाना झाली.

कांबळे तर्फ महाड ह्या ठिकाणावरून होत माझी बस महाड बस स्टैंड वर सकाळी 10:50 वाजता पोहोचली.इथून पुढे परत एकदा हायवे वरून प्रवास करत लोणेरे नंतर माणगाव बस स्टैंड वर सकाळी 11:44 वाजता पोहोचली.

इथून पुढे निजामपूर नंतर भागाडे नंतर पुढे ताम्हिणी घाट पार केल्यानंतर माझी बस मुळशी जवळ हॉटेल शिव सागर इथे जेवणासाठी दुपारी 1:15 वाजता थांबली.

तर मित्रांनो बरोबर दुपारी 1:40 वाजता माझी बस आपल्या पुढचा टप्पा गाठण्यासाठी परत एकदा रस्त्यावरून धावू लागली.

बराच काळ धावल्यानंतर माझी बस मुळशी बस स्टैंड वर दुपारी 2:10 वाजता पोहोचल्यानंतर पुढे कोथरूड नंतर पुणे येथे स्वारगेट बस स्टँड इथे दुपारी 3:15 वाजता पोहोचल्या नंतर पुढे शिवाजीनगर बस स्टँडवर वर दुपारी 3:51 वाजता पोहोचली.

खेड पासून 195 किलोमीटर चा आतापर्यंतचा हा प्रवास माझा पूर्ण झाला होता.

इथून पुढे माझी बस आता अहमदनगर गाठण्यासाठी परत एकदा धावू लागली. अहमदनगर ह्या ठिकाणावरून 125 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे.

पुणे अहमदनगर हायवे वरून प्रवास करत पुढे शिक्रापूर ह्या ठिकाणावरून होत तसेच रांजणगाव नंतर शिरूर नंतर पुढे पालवे खुर्द ह्या ठिकाणी हॉटेल गंगासागर येथे जेवणासाठी संध्याकाळी 7:30 वाजता थांबली.

पुण्यापासून 87 किलोमीटरचा हा अंतर पार करत ह्या ठिकाणी पोहोचलो होतो.ह्या ठिकाणावरून अहमदनगर 35 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे.

जेवण झाल्यानंतर पुढे सुपा ह्या ठिकाणी टोल नाका पार करत माझी बस आता स्वास्तिक बस स्टैंड वर पोहोचत पुढे अहमदनगर अर्थात आहिल्या नगर तारकपूर बस स्टैंड वर रात्री 8:51 वाजता पोहोचली.

अहमदनगर छत्रपती संभाजी नगर हायवे वरून प्रवास करत पुढे घोडेगाव नंतर ढोरेगाव ह्या ठिकाणावरून होत माझी बस छत्रपती संभाजी नगर मध्यवर्ती बस स्टैंड वर रात्री 11:00 वाजता पोहोचली.

Khed To Jalgaon Final Destination

इथून पुढे परत एकदा हायवे वरून प्रवास करत फुलंब्री नंतर निल्लोड नंतर पुढे सिल्लोड जळगाव हायवे वरून धावत पुढे गोळेगाव इथून पुढे अजिंठा घाट पार केल्या नंतर पहुर नंतर माझी बस जळगाव बस स्तनाकावर रात्री 3:00 वाजता पोहोचली.

अशाप्रकारे माझा Khed To Jalgaonचा हा प्रवास पूर्ण झाला.

FAQs

What are the boarding points from Khed To Jalgaon Via Tamhini Ghat?

महाड, मुळशी, पुणे स्वारगेट, अहमदनगर, संभाजीनगर, सिल्लोड, अजंठा

How much time does it take to travel?

13 Hours

Leave a Comment