How To Travel From Mumbai Central To Bangalore

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे माझा Mumbai Central To Bangalore ह्या मार्गावरील केलेल्या प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.

तर मित्रांनो नेहमीप्रमाणे मी अर्धा तास अगोदरच मुंबई सेंट्रल बस स्टैंड वर माझी बसची वाट पाहत थांबलो होतो.

Mumbai Central To Bangalore Distance By MSRTC Bus

Mumbai Central to Bangalore Distance

Mumbai Central To Bangalore हा जवळ जवळ एक 1000 किलोमीटरचा प्रवास ठरला. हा माझा आयुष्यातील सर्वात लांब पल्याचा प्रवास झाला होता. ही हिरकणी गाडी असून मुंबई विभाग आणि परळ आगाराची होती.

ह्या गाडीचा मार्ग मुंबई सेंट्रल पासून मेगा एक्सप्रेस हायवे मार्गे सातारा, कराड, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, दावणगिरी, चित्रदुर्ग आणि शेवटी बेंगलोरु अशाप्रकारे होता.

Mumbai Central To Bangalore Ticket Price

ह्या गाडीचा तिकीट दर Mumbai Central To Bangalore 1655 रुपये होता.

तर मित्रांनो मुंबई सेंट्रल वरून सकाळी 9:30 वाजता मुंबईच्या ट्राफिक मधून वाट काढत दादर ह्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पुढे कुर्ला नेहरूनगर बस स्टैंड वर पोहोचत नंतर हायवे वरून प्रवास करत जुना वाशी ब्रिज पार करत पुढे टोलनाका नंतर पनवेल बस स्टैंड वर सकाळी 11:47 वाजता पोहोचत आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी परत एकदा हायवेवरून बराच काळ प्रवास करत आता माझी गाडी खालापूर टोल नाका पार करत दुपारी 12:30 वाजता राज ढाबा येथे जेवणासाठी थांबली.

खालापूर येथून पुढे शिरवळ मार्गे सातारा, कराड आणि कोल्हापूरच्या दिशेने धावत खंडाळा घाट पार करत पुढे वाकड नंतर वारजे कडून नंतर नवा कात्रज बोगद्यामधून प्रवास करत तसेच पुढे धनगरवाडी तसेच पारगाव नंतर खंबटगी घाट पार करत भुईंज ह्या ठिकाणी हॉटेल साई सेवा येथे जेवणासाठी दुपारी 3:45 वाजता माझी एसटी थांबली.

आतापर्यंत मुंबई सेंट्रल वरून 240 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता. इथून पुढे एक 29 किलोमीटरचा अंतर असलेला सातारा गाठण्यासाठी परत एकदा हायवेवरून धावू लागली.

पुणे बेंगलोर हायवे वरून धावत असताना आनेवाडी ह्या ठिकाणी टोलनाका पार करत सातारा बस स्टैंड वर दुपारी 4:30 वाजता पोहोचत पुढे नागठाणे नंतर कराड बस स्टैंड वर संध्याकाळी 5:30 वाजता पोहोचत परत एकदा पुढचा टप्पा गाठण्य्साठी नेरले येथून पुढे कोल्हापूर बस स्टैंड वर संध्याकाळी 7:30 वाजता फलट क्रमांक दहावर पोहोचली.

कोल्हापूर बस स्टैंड वर गाडीचे चालक आणि वाहक यांची बदली झाली. बेंगलोर कोल्हापूर बस स्टँड वरून 614 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे. हा अंतर गाठण्यासाठी जवळपास 12 तासांचा कालावधी लागतो.

पंधरा मिनिटं कोल्हापूर बस स्टैंड वर थांबल्यानंतर माझी बास आता कोल्हापूर बस स्टँडवरून बाहेर पडत कागल बस डेपो इथे गाडीमध्ये डिझेल भरला गेला.

डिझेल भरून झाल्यानंतर माझी गाडी आता परत एकदा हायवेवरून प्रवास करत पुढे कोगनोळी येथे टोलनाका पार करत माझी बस आता निपाणी बस स्टैंड वर रात्री 8:50 वाजता पोहोचली .

इथून पुढे हत्तरगी टोलनाका पार करत थोडासा अंतरावर राम धाबा येथे रात्री 10:15 वाजता जेवणासाठी थांबली .

ह्या ठिकाणावरून बेळगाव हा 28 किलोमीटरच्या अंतरावर होता.

इथून पुढे संकेश्वर बेळगाव हायवे वरून प्रवास करत पुढे होणगा नंतर थोड्याच अंतरावर बेळगाव बस स्टैंड वर रात्री 11:00 वाजता फलट क्रमांक चारवर पोहोचली.

इथून पुढे हिरेबागेवाडी टोलनाका पार करत बराच काळ प्रवास केल्यानंतर पुढे हावेरी बस स्टैंड रात्री 3:00 वाजता पोहोचली.

पुढे नेवलगल नंतर चलगिरी कडे टोलनाका पार करत तुंगभद्रा नदीच्या पुलावरून होत तसेच हरिहर नंतर दावणगिरी बस स्टैंड वर सकाळी 4:30 वाजता पाहोचली .

इथून पुढे चित्तदुर्ग मार्गे 265 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. हा अंतर गाठण्यासाठी जवळपास पाच तासांचा कालावधी लागला.दावणगिरी ते चित्रदुर्ग 61 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.

अनगडू ह्या ठिकाणावरून होत पुढे सीरा ह्या ठिकाणावरून थोडा अंतरावर वर हायवेच्या लागत असणारा हॉटेल कामात इथे सकाळी 6:45 वाजता चहापाण्यासाठी थांबा घेते.

हावेरी ह्या ठिकाणी गाडीचे चालक आणि वाहक यांची बदली झाली होती. येथून बेंगलोर 117 km चा अंतर शिल्लक राहिला होता.

Mumbai Central To Bangalore Final Destination

हा अंतर पार करण्यास जवळपास तीन तासांचा कालावधी लागतो.चहापाणी झाल्यानंतर पुढे करेजेवणहल्ली टोलनाका पार करत वसंतानरसापुर ह्या ठिकाणावरून होत तुमकुर नंतर चोक्कनहल्ली टोलनाका पार करत पुढे नीलमंगला नंतर यशवंतपुर तसेच राजाजी नगर येथून पुढे माझी बस आता बेंगलोर बस स्टैंड वर सकाळी 9:15 वाजता पोहोचली.

अशाप्रकारे माझा Mumbai Central To Bangalore चा हा 1000 किलोमीटरचा आणि 14 तासांचा हा प्रवास पूर्ण झाला.

Leave a Comment